शब्दाचा अर्थ कायदा गुन्हेगारी

मोक्का लावणे म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

मोक्का लावणे म्हणजे काय?

5
मोक्का हा महाराष्ट्र शासनाने १९९९ साली गुन्हेगारी ला आळा घेण्यासाठी केलेला कायदा आहे. मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. मोक्का हा शब्द या कायद्याच्या इंग्रजीच्या नावाच्या संक्षिप्त रुप आहे. Maharashtra Control of Organised Crime Act, 1999 (MCOCA).

या कायद्याने गुन्हेगाराला अटक झाल्यावर 6 महिने जामीन मिळत नाही. तसेच इतरही अनेक तरतुदी आहेत ज्याने गुन्हेगाराला लवकर जास्तीस्त जास्त शिक्षा होईल आणि गुन्हेगारीला आळा बसेल. मोक्का लावणे म्हणजे या कायद्याअंर्गत गुन्हा दाखल करणे.
उत्तर लिहिले · 23/7/2017
कर्म · 48240
1
मोक्का लावणे मोक्का कायद्या अंतर्गत कार्यवाही करणे : मोक्का म्हणजे ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’. २२ फेब्रुवारी १९९९ रोजी महाराष्ट्रात ‘टाडा’ऐवजी हा कायदा लागू करण्यात आला. महाराष्ट्रापुरताच तो मर्यादित असला तरी दिल्ली पोलिसांनी यापूर्वीही संघटित गुन्हेगारी प्रकरणात हा कायदा लागू केला आहे.  

* कोणाला लागू होतो? : संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध प्रस्थापित झाल्यास मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. या कायद्यातील तरतुदीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षांत दोन गुन्ह्य़ांत आरोपपत्र सादर झालेले असणे बंधनकारक आहे. त्यामुळेच या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाऊद आणि छोटा शकीलला आरोपी बनविले असावे. त्यांच्यामुळे इतर आरोपींना मोक्का लावणे शक्य झाले आहे. 

* तरतुदी : ‘मोक्का’ कायद्यातील २१ (३) या कलमानुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. तोपर्यंत मोक्काअंतर्गत आरोपींना जामीन मंजूर होत नाही. आरोपीविरुद्ध पोलिसांना ठोस पुरावा सादर करता न आल्यास त्यानंतर जामीन मिळतो. परंतु बऱ्याचवेळा वर्षभरही आरोपींना जामीन मंजूर होत नाही.

* दोषींना जन्मठेप आणि पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद

* दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद

* आरोपपत्र दाखल करण्याची मुदत सहा महिन्यांपर्यंत.

* जामीन मिळण्यातही अडचणी
उत्तर लिहिले · 23/7/2017
कर्म · 99520
0

मोक्का (MCOCA) म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999.

  • हा कायदा महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी बनवला गेला आहे.
  • संघटित गुन्हेगारी म्हणजे दोन किंवा अधिक लोकांनी एकत्र येऊन गुन्हेगारी करणे, ज्यात हिंसा, धमकी किंवा गैरमार्गाने फायदा मिळवणे इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.
  • मोक्का कायद्यानुसार, जर कोणी संघटित गुन्हेगारी करताना आढळला, तर त्याला कठोर शिक्षा होऊ शकते.
  • या कायद्यानुसार, आरोपीला जामीन मिळणे देखील कठीण असते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1040

Related Questions

1969 पासून वारस नोंद नाही, वहीवाट नाही, आज तिसऱ्या पिढीस जमीन मिळेल का?
गहाण खत म्हणजे काय?
Sale deed म्हणजे काय?
इच्छापत्र म्हणजे काय?
दस्तऐवजांची नोंदणी - कलम १७, १८ भारतीय नोंदणी कायदा?
विश्वस्तपत्र म्हणजे काय?
खरेदी प्रमाणे माझी जागा १५ फूट पूर्व पश्चिम २८ फूट आहे, तरी मला माझी जागा पूर्णपणे मिळू शकते का?