पैसा
शब्दाचा अर्थ
आयकर
कागदपत्रे
अर्थ
कर
फॉर्म 16 - A व फॉर्म 16 - B म्हणजे काय? सविस्तर माहिती मिळेल का?
3 उत्तरे
3
answers
फॉर्म 16 - A व फॉर्म 16 - B म्हणजे काय? सविस्तर माहिती मिळेल का?
4
Answer link
तुम्ही इन्कम टॅक्स फॉर्म १६ बद्दल बोलत आहेत असे मला वाटते.
पहिली गोष्ट फॉर्म १६ हा एकच फॉर्म आहे A आणि B हे त्याचे दोन पार्ट आहेत.
पार्ट A मध्ये तुमच्या कंपनीने कापलेला TDS ची माहिती असते. तसेच यात कंपनीचे काही महत्वाचे टॅक्स संबंधित नंबर (TAN PAN etc.) आणि कंपनीचा ऍड्रेस तुमचे नाव आणि ऍड्रेस असते.
पार्ट B मध्ये तुमची टॅक्सेबल सॅलरी, इतर पगारातून कापलेले पैसे यांचा उल्लेख असतो.
इन्कम टॅक्स रिटर्नम भरताना ही माहिती सरकारच्या उपयोगी पडते. तसेच फॉर्म १६ वरून तुम्ही नोकरीला आहात हा ठोस पुरावा भेटतो. म्हणून बँक, लोन इत्यादी कामात फॉर्म १६ फार महत्वाचा असतो.
4
Answer link
फॉर्म 16
-A व 16-B बद्दल माहितीसाठी ही लिंक उघडा.
https://www.uttar.co/answer/59618e54a55eda1067d80875
नोकरदारांसाठी फॉर्म १६ महत्त्वाचे; जाऊन घ्या…
नोकरी करणाऱ्यासाठी कायमच महत्वाचा ठरतो तो फॉर्म-१६. हा फॉर्म नोकरी देणाऱ्या संस्थाकडून देण्यात येतो. हा फॉर्म रिटर्न भरण्यासाठी फार गरजेचा ठरतो. तसेच यांचा वापर इनकम दाखवण्यासाठी ही उपयोगी ठरतो. तसेच हा फॉर्म १६ जून पर्यंत मिळायचा, पण आतापासून १० जुलैपर्यंत फार्म मिळेल.
फॉर्म १६ भरताना ?
◆फॉर्म १६ भरण्याआधी तो आधी वाचून घ्या, जर कामगार फॉर्म १६ भरुन देत नाही तर उद्योजक त्याला दंड ठोठावू शकतो. सेक्शन २७२ नुसार १०० रुपये रोजचा दंड आकारला जातो.
◆फॉर्म १६ मध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास तुम्ही त्याची माहिती उद्योजकाला देऊ शकतात, फॉर्म १६ मध्ये झालेली चूक दुरुस्त करुन मगच रिटर्न फाइल करा फॉर्म १६ मध्ये पार्ट A आणि B TRACES मधून डाऊनलोड होतो.
◆फॉर्म १६ मध्ये आणि रिटर्नमध्ये कोणताही फरक नको. फॉर्म १६ मिळाल्यावर पॅन नंबर, पगार आणि टॅक्समधील सूटसाठी असलेले पर्यायांची पडताळणी करा. एवढेच नाही तर उद्योजकाच्या पॅन, स्वाक्षरी आणि स्टॅम्पची देखील पडताळणी करा.
◆नव्या गुंतवणूकीची माहिती उद्योजकाला नक्की द्या. उद्योजकाला माहिती दिली नाही तर रिटर्न मध्ये फरक दिसून येईल. नोकरी बदलल्यावर जुन्या आणि नव्या उद्योजकाकडून २ फॉर्म १६ मिळतील. पण २ फॉर्म १६ मिळाल्याने टॅक्स बचत दोनवेळा करता येणार नाही.
नेमक काय आहे फॉर्म १६?
■हा एक सर्टिफिकेट आहे. हा फॉर्म कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना देतात. हा फॉर्म कर्मचाऱ्यांचे पगारातून कापल्या गेलेल्या TDS चे सर्टिफिकेट असते. यावरून हे देखील लक्षात येते की, संस्थेने टीडीएस कापून सरकाराला जमा केला आहे.
■फॉर्म १६ आयकर रिटर्न करताना लाभदायक ठरतो. याचा वापर इनकमचा पुरावा म्हणून करता येतो. कर्ज घेताना आणि मंजूर करताना त्याची एक प्रत जोडण्यात येते.

0
Answer link
फॉर्म 16 (Form 16) हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो भारतातील कोणताही नियोक्ता (Employer) आपल्या कर्मचाऱ्याला जारी करतो. हा फॉर्म कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापलेल्या कराचा (Tax Deducted at Source - TDS) पुरावा असतो.
फॉर्म 16 चे दोन भाग असतात:
- फॉर्म 16 - भाग A (Form 16 - Part A):
हा भाग नियोक्ता (Employer) जारी करतो. यात खालील माहिती असते:
- नियोक्त्याचे नाव आणि पत्ता (Employer's Name and Address)
- कर्मचाऱ्याचे नाव आणि पत्ता (Employee's Name and Address)
- पॅन नंबर (PAN Number)
- टॅन नंबर (TAN Number)
- Assessment Year
- नोकरीचा कालावधी (Employment Period)
- वेतन आणि इतर देयके (Salary and Other Payments)
- TDS भरल्याची माहिती (Details of TDS Deposited)
- फॉर्म 16 - भाग B (Form 16 - Part B):
हा भाग देखील नियोक्ता (Employer) जारी करतो. यात खालील माहिती असते:
- एकूण करपात्र उत्पन्न (Gross Taxable Income)
- कलम 80C, 80D अंतर्गत वजावट (Deductions under Section 80C, 80D)
- देय असलेला एकूण कर (Total Tax Payable)
- भरलेल्या कराची माहिती (Details of Tax Paid)
फॉर्म 16 चे महत्त्व:
- आयकर रिटर्न भरण्यासाठी उपयुक्त (Useful for filing Income Tax Return)
- TDS चा पुरावा (Proof of TDS)
- कर्ज घेण्यासाठी उपयुक्त (Useful for taking loans)
- गुंतवणुकीचा पुरावा (Proof of Investment)
टीप:
- जर तुमचा TDS कापला गेला असेल, तर तुमच्या नियोक्ताकडून (Employer) फॉर्म 16 घेणे आवश्यक आहे.
- फॉर्म 16 मधील माहिती तुमच्या आयकर रिटर्नमधील माहितीशी जुळणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: आयकर विभाग