3 उत्तरे
3
answers
विकिपीडिया म्हणजे काय, त्याबद्दल माहिती द्या?
7
Answer link
जिमी वेल्स आणि वेदांत ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत. विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषेतील शाखा आहे.
मराठी विकिपीडियावर (या पानानुसार)सध्या यात ४७,८९९ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.
विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीयाइतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी शोधयंत्रे वापरून शोधता येतो.
विकिपीडिया हा महाजालावरील एक मुक्त ज्ञानकोश आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. विकी हे सॉफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.
0
Answer link
विकीपीडियावरती एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती मिळते, म्हणजे जन्म ठिकाण, जन्म दिनांक, शहर, देश, वय इत्यादी.
0
Answer link
विकिपीडिया हे एक मुक्त ज्ञानकोश आहे, जो स्वयंसेवकांनी तयार केला आहे आणि तो जगातील सर्वात मोठ्या ज्ञानकोशांपैकी एक आहे.
विकिपीडियाची काही वैशिष्ट्ये:
हे एक मुक्त (Open) ज्ञानकोश आहे, म्हणजेच तो कोणालाही वाचायला आणि संपादित करायला उपलब्ध आहे.
हा सहयोगी (Collaborative) आहे, म्हणजे अनेक लोक एकत्र येऊन यात भर घालतात.
विकिपीडिया बहुभाषिक (Multilingual) आहे, जो विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे.
यातील माहिती तटस्थ (Neutral) दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न केला जातो.
विकिपीडियाची सुरुवात जानेवारी १५, २००१ रोजी झाली. जिमी वेल्स (Jimmy Wales) आणि लॅरी सॅंगर (Larry Sanger) यांनी ह्याची स्थापना केली.
तुम्ही मराठी विकिपीडिया (Marathi Wikipedia) येथे अधिक माहिती मिळवू शकता.