शब्दाचा अर्थ
मानसशास्त्र
समजूतदारपणा
झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही, या म्हणीचा अर्थ काय होतो?
4 उत्तरे
4
answers
झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही, या म्हणीचा अर्थ काय होतो?
3
Answer link
अर्थात जो माणूस झोपलेला असतो त्याला उठवल्यावर त्वरित जाग येते. आणि जो झोपेचं नाटक करतो त्याला तुम्ही कितीही आवाज किंवा स्पर्श करा तो त्याच्या रिस्पॉन्स देणार नाही. म्हणून त्या व्यक्तीला गुदगुल्या कराव्यात तो पहिला रिस्पॉन्स नाही देणार, नंतर उठला की मात्र फालतू कारण देईल की मी झोपलो होतो, इत्यादी... त्या मागचं कारण असं आहे की त्याला आपण काम सांगणार आहोत म्हणून तो टाळाटाळ करतो यावं म्हणून हे सगळं नाटक करतो.
2
Answer link
तुम्हाला ह्या म्हणीचा अर्थ इंग्रजी मधून हवा आहे की दुसऱ्या कुठल्या भाषेमधून? कारण मराठीतला अर्थ ह्या म्हणीच्या वाक्यात स्पष्ट आहे.
0
Answer link
या म्हणीचा अर्थ असा आहे:
म्हण: झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही.
अर्थ: जो माणूस खरोखरच झोपलेला आहे, त्याला जागे करणे शक्य आहे. मात्र, जो माणूस झोपल्याचे नाटक करत आहे, त्याला उठवणे शक्य नसते. कारण तो माणूस मुळातच उठण्याची इच्छा दाखवत नाही.
तात्पर्य: ज्या व्यक्तीला काही गोष्ट समजून घ्यायची नसेल किंवा बदलायचे नसेल, त्याला कोणीही मदत करू शकत नाही.