3 उत्तरे
3 answers

मला EPFO विषयी माहिती सांगा?

4
_📣 *EPFO! तुम्हाला PF मधून पैसे काढायचे असतील तर जाणून घ्या प्रक्रिया*_


_कर्मचारी भविष्य निधी संघटना ( EPFO ) लवकरच नोकरदारांसाठी खास भेट देणार आहे. लवकरच तुम्हाला तुमचा PF काढणं सोपं जाणार आहे._

_*PF चं सेटलमेंट अवघ्या 3 दिवसांमध्ये होणार आहे.* EPFO कमिशनर सुनील बर्थवाल यांच्या माहितीप्रमाणे, आता नव्या पद्धतीनं तुम्ही 3 दिवसांत PF काढू शकता. EPF नं ई इन्स्पेक्शन सुरू केलंय._

_💁 *कर्मचाऱ्यांच्या डेटाबेसच्या मदतीनं सेटलमेंट*_
_सुनील बर्थवाल म्हणाले, काही बाबतीत आकड्यांच्या घोटाळ्यामुळे कर्मचाऱ्यांचा युनिव्हर्सल नंबर जनरेट होत नाहीय. हे लक्षात घेता ईपीएफओ कर्मचारी डेटाबेसद्वारे पर्यायी व्यवस्थेचा विचार करतायत. ईपीएफओ असं ठरवतायत की KYC चा वापर करणाऱ्यांना तीन दिवसात PF चे पैसे मिळतील._

_📝 *पूर्ण व्हायला हवं KYC*_
_EPFO च्या निर्णयानंतर तुम्ही सहज ऑनलाइन PF काढू शकता. फक्त PF अकाउंटची KYC पूर्ण झाली पाहिजे आणि आधारशी लिंक असलेली हवी._

_📱 *डेटाबेसमध्ये मोबाइल नंबर अपडेट हवा*_
_ईपीएफओ सर्व अकाउंट होल्डर्ससाठी एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर प्रसिद्ध करतं. हा नंबर अॅक्टिवेट असणं गरजेचं आहे. तसंच कर्मचाऱ्यांचा मोबाइल नंबर डेटाबेसमध्ये अपडेट असणं जरुरी आहे. तुमचा पॅन नंबर ईपीएफओ डेटाबेसमध्ये अपडेट असायला हवा. कर्मचाऱ्यांच्या बँकेची माहिती UAN मध्ये असायला हवी._

_🧐 *कसा करणार अर्ज?*_
_तुम्हाला PF काढायचा असेल तर तुम्ही EPFO च्या ई पोर्टलवर लाॅग इन करा. त्यानंतर तुम्हाला आधार बेस्ट ऑनलाइन क्लेम सबमिशन टॅब निवडावा लागेल. पुढची स्टेप म्हणजे तुमचे KYC डिटेल्स वेरिफाय करावे लागतील. त्यानंतर क्लेम विथड्राॅल करण्यासाठी दिलेल्या पर्यायांना निवडावं लागेल._

_📌 *रजिस्टर्ड बँक खात्यात होईल ट्रान्सफर :*_
_EPFO तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP पाठवेल. हा OTP एंटर करून क्लेम फाॅर्म सबमिट करावा लागेल. क्लेम प्रोसेस पूर्ण झाल्यावर रक्कम तुमच्या रजिस्टर्ड बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल._
उत्तर लिहिले · 14/9/2019
कर्म · 569265
2
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही १९५२ मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. वीसहून अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच दोन अतिरिक्त लाभही आहेत.

कर्मचारी निवृत्तिवेतन योजना (Employees Pension Scheme)
कर्मचारी ठेवीशी निगडित विमा योजना (Employees Deposit Linked Insurance Scheme)
कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबित व्यक्तीस पेन्शनचा लाभ या योजनेंतर्गत दिला जातो
उत्तर लिहिले · 24/6/2017
कर्म · 9050
0

EPFO (Employee Provident Fund Organisation): कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना.

EPFO ही भारत सरकारद्वारे स्थापित एक संस्था आहे, जी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करते.

उद्देश:

  • कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे.
  • कर्मचाऱ्यांच्या बचतीला प्रोत्साहन देणे.

EPFO चे कार्य:

  1. निधी व्यवस्थापन: कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणे आणि त्यावर व्याज देणे.
  2. दावे निकाली काढणे: कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे दावे (claims) निकाली काढणे.
  3. सदस्यांना सेवा: सदस्यांना त्यांच्या खात्यासंबंधी माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देणे.

EPFO मध्ये नोंदणी कोण करू शकते?

  • ज्या कंपनीमध्ये 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, त्या कंपनीला EPFO मध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे, ते EPFO चे सदस्य बनू शकतात.

EPFO चे फायदे:

  • निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा.
  • बचतीवर आकर्षक व्याज.
  • गरजेच्या वेळी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याची सुविधा.

अधिक माहितीसाठी:

EPFO Website
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5280

Related Questions

वृत्ती सारूप्यमितरत्र यांचा अर्थ काय आहे?
सलमाला म्हणजे काय?
SWP साठी सर्वात चांगले फंड कोणते?
मी एचडीएफसीचा कर्जदार होतो, शेतीवर कर्ज घेतले होते पण मी ते सेटलमेंट केले. तर मला दुसरी बँक कर्ज देत नाही, काही पर्याय?
बजाज फायनान्स तीन लाख रुपये लोन देत आहे आणि त्याचे हप्ते हजार रुपये आणि ईएमआय मध्ये कपात अशी जाहिरात आहे, हे खरे आहे का?
सिप कोणत्या कोणत्या बँकेत सुविधा असते?
प्रॉपर्टीवर वार्षिक हप्ता लोन कोणती बँक देते?