2 उत्तरे
2 answers

मेल्यावर दहावा का करतात?

14
हिंदूधर्मशास्त्राच्या कल्पनेनुसार  मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो.त्याची हा लोक सोडून जाण्याची अजिबात इच्छा नसु शकते. पण त्याला दुसरा जन्म घ्यायला जाणे अपेक्षित असते. म्हणून दहाव्या दिवशी पिंड करून सर्व इच्छा तृप्त होऊन आत्मा परलोकी दुसरा जन्म घेण्यासाठी मुक्त होतो.
दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न राहिल्यास त्याला मुक्ति मिळत नाही अस मानलं जातं. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो असे समजतात.
तेरावा हा विधी नाही तर एक कृतकृत्य समारंभ असतो. मनुष्यप्राणी मृत पावल्यावर पहिल्या दिवशी लोक प्रेत घेऊन स्मशानात जातात. तिसरा दिवस अस्थि गोळा करून पाण्यात विसर्जित करतात. दहाव्या दिवशी पाणी घालण्यासाठी जमा होतात, त्या मृत मनुष्यासाठी वेळ, पैसा खर्च करतात. मृत मनुष्य या सर्वांच्या ऋणात राहू नये, त्याला मोक्ष प्राप्त व्हावा, म्हणून त्याच्या नावाने लोकांना जेवण देतात, जेणेकरून त्या आत्म्यावर ॠण राहू नये. शिवाय यादिवशी ज्यांना दुःख झाले आहे अशांचा दुखवटा काढतात.
संदर्भ : http://m.transliteral.org
उत्तर लिहिले · 17/6/2017
कर्म · 99520
0

मेल्यावर दहावा करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. या प्रथेमागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • आत्म्याला शांती: दहाव्याच्या दिवशी पिंडदान आणि तर्पण केले जाते. यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि तो पुढील प्रवासासाठी सज्ज होतो, अशी मान्यता आहे.
  • कुटुंबाला आधार: दहाव्याच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येते. दु:खाच्या काळात एकमेकांना आधार मिळतो.
  • सामाजिक ऋण: मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी ब्राह्मण भोजन दिले जाते. यातून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली जाते.
  • शुद्धिकरण: दहाव्याच्या दिवशी घरातील वस्तू आणि जागा शुद्ध केल्या जातात. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते.
  • परंपरा: ही प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे आजही अनेक लोक या परंपरेचे पालन करतात.

दहाव्याच्या विधीमध्ये पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोजन आणि प्रार्थना यांचा समावेश असतो.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1040

Related Questions

माणूस मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो, तिथून घरी आल्यानंतर आंघोळ करावी का?
मेलेल्या माणसांना का जाळतात?
श्रद्धांजली कशी वाहावी?
इंडोनेशियामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचे शरीर का जपून ठेवतात?
अंत्यविधीला काय बोलायचं?
सुतकात असताना दुसऱ्या ठिकाणी उत्तरकार्याला जाऊ शकतो का?
प्रेताला खांदा कोणी द्यावा आणि दिल्यावर काय विधी असतात? अनेक जण पुढे येत नाहीत.