ढेकूण मारण्यासाठी जालीम उपाय सांगा? खूप त्रास आहे रात्रीला..
_____________________
घरातील ढेकूण अत्यंत त्रासदायक कीटक…अल्पावधीतच त्यांची फौज तयार होण्यास वेळ लागत नाही… रात्रीच्या वेळेस तर त्यांचा विशेष त्रास जाणवतो. ते चावले तर त्वचाविकार होतात.हा त्रास दूर करण्यासाठी नियमित पेस्ट कंट्रोल करणे हा उपाय असला तरी यामुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात. याकरिता ढेकणांना घराबाहेर काढण्यासाठी काही सुरक्षित घरगुती उपाय…
*पुदिना*
ढेकणांना पुदिन्याचा वास असह्य होतो. त्यामुळे या वासाने ते दूर पळतात. यासाठी झोपताना अंथरुणाजवळ पुदिन्याची ताजी पानं पसरवून ठेवा. लहान मुलांच्या पाळण्यातही पुदिन्याची पानं ठेवू शकता. पुदिन्याची पानं चुरून त्याचा रस शरीराला लावून झोपल्यानेही ढेकूण लांब राहतील.
*कडुलिंबाचे तेल*
कडूलिंबामध्ये दाहशामक आणि कीटकनाशक क्षमता आहे. तसेच कडूलिंबातील ऍन्टी मायक्रोबायल गुणधर्म घरातील अनेक कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. ढेकणांवर कडूलिंबाच्या तेलाचा शिडकाव करा. या प्रयोगामुळे अवघ्या आठवडाभरात ढेकणांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. कपडे धुताना डिटर्जंट पावडरसोबत कडुलिंबाच्या तेलाचा समावेश केल्याने ढेकणाचा त्रास कमी होईल.
*टी ट्री ऑईल*
टी ट्री ऑइलमध्ये ऍन्टी मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे ढेकणांचा त्रास दूर ठेवण्यास मदत होते. टी ट्री ऑईल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे बनवा. हा प्रे भिंती, पलंग, कपाटं, पडदे, फर्निचर गाद्यांवर शिंपडा. आठवडाभर जेथे ढेकणांचा हमखास वावर असतो तेथे टी ट्री ऑईलचा स्प्रे केल्याने ढेकणांचा त्रास कमी होईल.
*निलगिरी*
ढेकूण दिसल्यास त्यावर निलगिरीचे काही थेंब शिंपडा. यामुळे ढेकूण दूर जातील. शिवाय रोजमेरी, लॅवेंडर या तेलांमध्ये निलगिरीचे तेल मिसळून त्याचा वापर करा. सर्दी पडशाच्या त्रासाला दूर ठेवण्यासोबतच ढेकणांचा त्रास टाळण्यासाठीही निलगिरी फायद्याची आहे.
*लॅवेंडर तेल*
ढेकणांना दूर ठेवण्यासाठी लॅवेंडरच्या पानांचा वापर करा. लॅवेंडरची पाने कपडय़ांवर घासा. लॅवेंडर परफ्युम शिंपडल्यानेही ढेकूण दूर राहू शकतात. पुदिन्याप्रमाणेच लॅवेंडर तेलाचा वासही ढेकणांना सहन होत नाही. या तेलाच्या सुगंधामुळे प्रसन्नता वाटतेच. शिवाय डास, ढेकूण असे कीटकही दूर राहतात.

१. रॉकेल स्प्रे
२. कांद्याच्या रसाचा स्प्रे
३. सर्व कपडे धुवून कडक उन्हात वाळू घाला
४. सर्व ढेकूण लागलेल्या वस्तू फेकून द्या किंवा कडक उन्हात आठवडाभर वाळू द्या
ढेकूण घालण्यासाठी सर्वात महत्वाची प्रिकॉशन स्वच्छता आहे. जर तुम्ही रोज दोनदा रूमची सफाई करत असाल तरच वरील उपायांचा फायदा होईल.
ढेकूण मारण्यासाठी काही जालीम उपाय खालीलप्रमाणे आहेत:
-
गरम पाण्याची वाफ:
गरम पाण्याची वाफ ढेकणांना मारण्यासाठी खूप प्रभावी आहे. ज्या ठिकाणी ढेकूण आहेत, तिथे गरम पाण्याची वाफ दिल्यास ते मरतात.
-
व्हॅक्यूम क्लिनर:
व्हॅक्यूम क्लिनरने नियमितपणे तुमच्या पलंगाजवळील आणि आसपासची जागा स्वच्छ करा. यामुळे ढेकणांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
-
उच्च तापमान:
ढेकूण उच्च तापमानात जगू शकत नाहीत. त्यामुळे, ज्या वस्तू infested आहेत, त्या उन्हात ठेवा किंवा ड्रायरमध्ये गरम करा.
-
कीटकनाशके:
बाजारात ढेकणांसाठी अनेक प्रभावी कीटकनाशके उपलब्ध आहेत. Permethrin किंवा Pyrethrin असलेले स्प्रे वापरा. लेबलवरील सूचनांचे पालन करा.
-
नैसर्गिक उपाय:
- नीम तेल: नीम तेल ढेकणांना मारण्यासाठी आणि त्यांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
- लवेंडर तेल: लवेंडर तेलाचा वास ढेकणांना आवडत नाही, त्यामुळे ते वापरणे फायदेशीर ठरू शकते.
- डायटोमेसियस अर्थ (Diatomaceous Earth): हे नैसर्गिक कीटकनाशक असून ते ढेकणांच्या शरीरावर ओरखडे पाडून त्यांना मारते.
-
बेड कव्हर:
तुमच्या पलंगाला बेड कव्हरने व्यवस्थित झाका, ज्यामुळे ढेकूण आत प्रवेश करू शकणार नाहीत.
टीप: जर ढेकणांचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल, तर व्यावसायिक Pest Control service घेणे अधिक फायद्याचे ठरू शकते.