औषधे आणि आरोग्य धडे घरगुती उपाय वाचा दोष आरोग्य

माझा चुलत भाऊ १९ वर्षांचा आहे. तो थोडे तोतरे बोलतो, म्हणजे त्याला "र" आणि "ळ" हे अक्षर असणारे शब्द बोलण्यास अडचण येते, तरी काही उपाय आहे का?

4 उत्तरे
4 answers

माझा चुलत भाऊ १९ वर्षांचा आहे. तो थोडे तोतरे बोलतो, म्हणजे त्याला "र" आणि "ळ" हे अक्षर असणारे शब्द बोलण्यास अडचण येते, तरी काही उपाय आहे का?

16
 तोतरेपणा/अडखळत बोलणे
_______________________

* वेखंड व अक्कलकाढा चूर्ण दिवसातून तीन वेळा मधातून देणे.

* पाच काळीमिरी रोज चावून खाणे.

* पाच बदाम रोज लोण्याबरोबर खाणे.

* पिंपळाची पिकलेली चार ताजी फळे अथवा या फळांचे एक चमचा चूर्ण किंवा पिंपळाच्या सालीचे चूर्ण, मधाबरोबर सलग सहा महिने घेतल्यास वाणी स्पष्ट होते व तोतरेपणा, बोबडेपणा जातो.

* दोन चमचे अख्खे धणे रात्री काचेच्या ग्लासमध्‍ये पाण्यात भिजवून ठेवावे, सकाळी ते पाणी धण्यासह अर्धे होईल इतपत उकळावे, कोमट झाल्यावर गाळून या पाण्याने गुळण्या(Gargles) कराव्या.

* अंगठा व तर्जनी यांना मध लावावे. जीभ बाहेर काढून अंगठा जिभेखाली व तर्जनी जिभेवर ठेवून जिभेला आतून बाहेर अशी आठ-दहा वेळा मधाने मालीश (मसाज) करावी, या वेळेस मनात ‘ॐ’ चा उच्चार करावा.

* वेखंडाचा (Sweet flag root) एक ग्रॅम तुकडा दिवसातून दोनदा एक महिना चोखल्याने हा विकार दूर होतो.

* पाच बदाम रात्री पाण्यात भिजवुन ठेवावे, सकाळी त्याची साले काढुन पांढर्‍या लोण्याबरोबर किंवा गायीच्या तुपाबरोबर चावुन खावीत.

* एक चमचा ब्राम्ही चूर्ण, मधातून किंवा दुधातून, दोनवेळा घ्यावे.
उत्तर लिहिले · 26/6/2018
कर्म · 458580
2
रोज आवळा खाल्ल्याने तोतरपणा लवकरच कमी होऊन परिणाम दिसून येईल.
उत्तर लिहिले · 23/5/2017
कर्म · 1955
0
१९ वर्षांच्या मुलाला तोतरे बोलण्याची समस्या आहे आणि त्याला "र" आणि "ळ" हे अक्षर असलेले शब्द बोलण्यात अडचण येते आहे, तर खालील उपाय उपयुक्त ठरू शकतात:
  • speech therapy (speech and language pathologist): speech therapy मध्ये speech and language pathologist काही व्यायाम आणि तंत्र वापरून बोलणे सुधारण्यास मदत करतात.
  • तोंडी आणि जिभेचे व्यायाम: काही तोंडी आणि जिभेचे व्यायामspeech therapist च्या मार्गदर्शनाखाली नियमित केल्यास तोतरेपणा कमी होऊ शकतो.
  • धैर्य आणि सराव: त्याला हळू आणि स्पष्ट बोलण्याचा सराव करण्याचा सल्ला द्या. सुरुवातीला त्याला अवघड वाटेल, पण हळूहळू तो अधिक आत्मविश्वासपूर्ण होईल.
  • टेक्नोलॉजीचा वापर: आजकाल speech therapy साठी अनेक apps आणि सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, ज्यामुळे बोलण्याचा सराव करणे सोपे होते.
  • मानसिक आधार: त्याला मानसिक आधार देणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या बोलण्यावर हसणे किंवा त्याला टोमणे मारणे टाळा.
  • तज्ञांचा सल्ला:speech therapist आणि मानसोपचार तज्ञांचा (psychologist) सल्ला घ्या. ते योग्य मार्गदर्शन करू शकतील.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुमचा चुलत भाऊ त्याच्या बोलण्यात सुधारणा करू शकेल.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2360

Related Questions

तोटारी न बोलू येण्यासाठी काही उपाय ?
लकव्यामध्ये बोलणे बंद झाल्यास काय उपाय करावे?
माझा भाऊ बारावीमध्ये आहे. तो अजून तोतरा बोलतो तर यासाठी काय उपाय करावे, स्पीच थेरपिस्टचा काही उपयोग असतो का?
भावाला बोलताना अडथळा येतो, 'र' ऐवजी 'ळ' येतं, म्हणजे तो तोतरा बोलतो, वय १७ आहे, मला काही उपाय सांगा?
मला 'ळ' शब्द बोलताना 'ल' हा शब्द बाहेर पडतो, कृपया मार्गदर्शन करा?
मी अडखळत बोलतो, उपाय सुचवावा?
मला स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम आहे तो कसा कमी केला जाईल?