औषधे आणि आरोग्य वैद्यकीय समस्या आरोग्य

अर्धांगवायू कशामुळे होतो? चरबीच्या गाठीवर घरगुती उपाय सांगा? चरबीची गाठ कशामुळे येते?

3 उत्तरे
3 answers

अर्धांगवायू कशामुळे होतो? चरबीच्या गाठीवर घरगुती उपाय सांगा? चरबीची गाठ कशामुळे येते?

4
*🤕अर्धांगवायू किंवा लकवा म्हणजे काय? जाणून घ्या सर्वकाही*


😳आपल्या देशात दर मिनिटाला सहा लोकांना अर्धागवायूचा कोणाला ना कोणाला झटका बसतो. प्रत्येक वर्षी पंधरा लाख लोक या आजाराने ग्रासतात, तर दर तीन मिनिटाला एक जण या आजाराने दगावतो. लक्षणे ओळखून लगेच या रुग्णाला रुग्णालयात नेणे आवश्यक आहे.

*👨‍⚕डॉक्टरांनी सल्ला दिल्यास टीपीए हे औषध झटका आल्यापासून साडेचार तासांपर्यंतच देता येते. त्यानंतर त्याचा उपयोग होत नाही.*

अर्धागवायू, पक्षाघात, लकवा, पॅरालिसीस आणि स्ट्रोक ही एकाच आजाराची वेगवेगळी नावे आहेत. त्याचे मुख्य दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ अडकते. ही गाठ हृदय किंवा मोठय़ा रक्तवाहिन्यांमध्ये तयार होऊन मेंदूमध्ये जाते किंवा मेंदूच्याच रक्तवाहिन्यांमध्ये तयार होते. दुसऱ्या प्रकारात मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. यालाच ब्रेन हॅमरेज असे म्हणतात. ब्रेन हॅमरेजच्या एका  प्रकारात रक्तवाहिनीला फुगा (अ‍ॅन्युरीजम) येऊन तो फुटतो आणि मेंदूच्या आजूबाजूला रक्त जमा होते. या प्रकारात काही वेळातच रुग्ण दगावू शकतो. म्हणून हा प्रकार हृदयविकारापेक्षाजास्त गंभीर आहे.

*▪समज-गैरसमज :*

अर्धागवायूची लक्षणे दिसल्यावरही बरेच रुग्ण थंडी वाढल्याने किंवा रक्तदाब वाढल्यामुळे हा त्रास वाटत असल्याचा समज करत उपचाराकडे दुर्लक्ष करतात. त्रास वाढून अर्धागवायूचा मोठा अ‍ॅटॅक येऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, हृदयरोग, स्थूलपणा, रक्तामध्ये कोलोस्ट्रोल वाढणे ही अर्धागवायू होण्याची मुख्य कारणे असू शकतात. आजही बरेच लोक अज्ञानामुळे अर्धागवायूसाठी गावठी उपचाराकडे वळतात. जे अतिशय घातक आहे.

*▪घ्यायची काळजी-*

वयाची चाळिशी उलटल्यावर प्रत्येक व्यक्तीने डॉक्टरांकडे नियमित वैद्यकीय तपासणी करायला हवी. मधुमेह, उच्च रक्तदाब आढळल्यास नियमित औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची गरज आहे. अनेक रुग्ण औषधांची सवय लागेल या गैरसमजुतीमुळे औषध घेण्यास टाळतात. हे चुकीचे आहे. तर रुग्णांनी मद्यपान, धूम्रपानासह इतरही चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. नियमित व्यायाम करण्यासह पोषक आहार घ्यावा. रक्ताच्या गाठी तयार होऊ नये, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त पातळ करण्याची औषधे नियमित घ्यावी, जेणेकरून अर्धागवायूसारखा घातक आजार टाळता येऊ शकतो. कुणाला अर्धागवायू झाल्यास तो आजार रुग्णापर्यंत सीमित न राहता, कुटुंबाचा आजार बनतो. म्हणून अर्धागवायू होऊ नये म्हणून आधीच काळजी घेण्याची गरज आहे.

*▪आजाराची लक्षणे :*

●अचानकपणे आवाजात बदल
●शरीराच्या एका बाजूला कमजोरी
●हाता-पायाला मुंग्या येणे
●चेहरा वाकडा होणे
●भोवळ येणे
●चालताना तोल जाणे
●नजर कमी होणे
●एका वस्तूच्या दोन-तीन प्रतिमा दिसणे
●बेशुद्ध अवस्था येणे

*▪रुग्णांसाठी आवश्यक :*

एकदा अर्धागवायू झाल्यावर पुन्हा ते होऊ नये, याकरिता प्रत्येक रुग्णाने  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. या आजाराचा अ‍ॅटॅक आल्यावर उपचारात सुरुवातीचे काही तास आणि दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. या काळात मेंदूच्या त्या भागाला कायमस्वरूपी इजा होऊ नये म्हणून वेगवेगळे उपाय केले जातात. औषधोपचारासोबत फिजीओथेरपी (व्यायाम) करणे तितकेच आवश्यक असते.
उत्तर लिहिले · 6/10/2019
कर्म · 569225
2
अर्धोंगवायु अथवा पक्षाघात म्हणजे डाव्या अथवा उजव्या बाजूचें अर्धं अंग लटकें पडणें;एक हात व त्याच बाजूचा एक पाय लटका पडणें. मेंदूंत फाजील रक्तसंचय होऊन विकृत धमन्यांपैकीं एखाददुसरी धमनी फुटून त्यामुळें रोगी एकदम बेशुध्द पडतो व कांहीं वेळानें शुध्दींवर आल्यावर एका बाजूच्या हाताची व पायाची चलनशक्ति नष्ट झाल्याचें आढळतें. कित्येक रोगी बेशुध्द न होता हळू हळू त्यांचा एक हात व पाय जड पडत जाऊन शेवटीं लुला पडतो. अगर कित्येकजण झोपेंतून जागे होतात तों अर्धांगाचा झटका आलेला त्यांस आढळतो. याशिवाय एकच हात अगर फक्त एकच पाय किंवा एका बाजूचा हात आणि त्याच्या उलट बाजूचा पाय हेहि पण या रोगांत लुले पडल्याचे प्रकार आढळतात. लटका पडलेला हात अगर पाय मृत मनुष्याच्या हातपायाप्रमाणें ताठ व जड होतो. रोग्यास तो हलवितां अगर उचलतां येत नाहीं. त्याचें स्पर्शज्ञान प्रथम कमी अथवा नष्ट होऊन कांही दिवसानंतर पुन:येतें. अगर कधीं, तें अर्ध्या भागांतून पूर्णपणें नाहींसें होतें, आणि मग जीभ, नाक, कान आणि डोळे हीं ज्ञानेद्रियेंहि कार्यहीन होतात. त्यांस हात लाविला असतां दुसर्‍या बाजूच्या अंगापेक्षां हात पाय अंमळ गार लागतात. कधीं कधीं चेहरा जशाचा तसाच रहातो; परंतु बहुतकरून चेहर्‍याचा उजव्या अगर डाव्या बाजूकडील मांसल भाग वर ताणल्यासालखा अगर ओढल्यासारखा दिसतो. चेहर्‍याची जी बाजू लटकी पडलेली असते त्या बाजूचा गाल सैल व गोळ्यासारखा दिलतो. दोन्ही ओठांमधील कोंपरा खालीं लोंबल्यासारखा दिसून त्यांतून लाळ गळते. व याचें कारण त्या बाजूचे ओंठ रोग्यास नेहमींप्रमाणें मिटून धरितां येत नाहींत. शीळ घालावयास अगर गाल फुगविण्यास सांगितलें असतां रोग्यास तसें करतां येत नाहीं व जीभ दाखविण्यास सांगितलें असतां ती वाकडी झालेली व जी चेहर्‍याची बाजु लुली आहे तिकडे वळलेली नजरेस पडते. डोळ्याची विकृत बाजूची पापणी सदां अर्धवट उघडी रहाते. कारण ती त्यास मिटतां येत नाहीं व नेत्रांतून पाणी गळत असतें. अगर याच्या उलट असें होतें कीं, रोगी पापणी जी एकदां मिटून धरितो ती त्यास उघडतांच येत नाहीं. आंतील बाहुली विस्तृत झालेली दिसल्यास मेंदूंतून निघणार्‍या तिसर्‍या मज्जातंतूस इजा पोचली आहे असे समजावें व पापिणी सदा उघडी रहाणें म्हणजे सातव्या मज्जातंतूची विकृति होय. जेव्हां उजव्या बाजूचें अर्धांग लुलें पडतें तेव्हांच बहुतकरून तोंड वांकडें होतें व त्या विकृतीस अर्दितवायु म्हणतात.

पक्षाघात झाल्यावर रोग्याची वाचा, अक्कल, हुशारी. आणि स्मरणशक्ति यांतहि कांहींसा फरक झाल्याचें दिसून येतें. बोलण्यास तीन साधनांती जरूरी असते. मेंदूच्या आंत विचार उत्पन्न होतो, नंतर कंठांतून स्वर निघतो, व त्याचा मुखामध्यें शब्द होऊन उच्चार निघतो. मेंदूचा डावा अर्धभाग बिघडून जर पक्षाघात झाला असेल तर उजव्या बाजूचा हात व पाय लुला पडतो, व रोग्याचा शब्दोच्चार नीट होत नाही. यासच ‘अँफेसिआ’ (वाचाभंग) म्हणतात. रोगी अडखळत बोलतो व कधीं कधीं त्याचें बोलणें दुसर्‍यास समजत नाहीं. यांत पुष्कळ प्रकारचीं बोलण्यांत व्यंगें होऊं शकतात . रोग्याची स्मरणशक्ति मंद होते व त्याची हिंमतहि नाहींशीं होते. सहज बोलतांना त्याच्या डोळ्यांतून पाणी येतें. त्याचा स्वभाव चिडखोर बनत जातो व त्याची प्रकृति बिघडते.

पक्षाघातांतून रोगी बरा होतो अगर कांहीं दिवसांनीं मरण पावतो. कधीं कधीं कित्येक महिने अगर वर्षें त्यास पराधीन स्थितींत खितपत पडून मग मरण येतें. रोगी बरा होणें असेल तर कदाचित थोड्या दिवसांत अथवा आठवड्यांत त्याचे प्रथम चेहरा, नंतर पाय व शेवटीं हात या क्रमानें हे अवयव पुन्हां सुधारतात. कोणाच्या हातापायांत थोडेसें व्यंग आणि कमकुवतपणा कायमचा राहून जातो. पक्षाघात बरा न होण्याचें चिन्ह म्हणजे लुल्या पडलेल्या स्नायूंचें संकोचन सुरू होतें. हाताचीं बोटें वळून तीं थोट्यासारखीं वांकडीं होतात, व कोंपर वांकडें राहतें. रोगी लंगडत व पाय फरपटत चालतो. पुष्कळ दिवसांनीं बोटें, हात आणि पाय आपोआप मधून मधून थरारल्यासारखे हलतात अगर उडतात. कोणाचें तोंड व डोळे एका बाजूसच फिरतात. अर्धांगाचा झटका येतांना मेंदूचा जो अर्धभाग विकृत झालेला असतो, त्या बाजूकडे डोळ्यांची नजर फिरते. लटका पडलेला पाय रोग्यास आपल्या इच्छाशक्तिनें हलवितां येत नाही. पण जर त्याच्या पायाच्या तळव्यास किंचित दाबून धरलें तर पाय थरारून दाब सोडीपर्यंत एकसारखा कंपित होतो.

कारणें - मेंदूंतील विकृत धमनी लहान असो अगर मोठी असो; अतिरक्तसंचयामुळें ती फुटते व त्यामुळें ते नाजूक मज्जातंतू दुखावतात व तारायंत्राची तार तोडल्याप्रमाणें त्यांतून स्नायूंवर हुकमत चालविणारे संदेश इच्छाशक्तीनेंहि पुढें जात नाहींत; व हात, पाय निर्जीव असे दिसतात. या तर्‍हेचा पक्षाघात एकदम होतो. मेंदू शुध्द रक्ताचे अभावीं नरम झाल्यामुळें, किंवा त्यांत एखादा ‘विद्रधि’ झाल्यानें. अथवा त्यावर एखाद्या नवीन उत्पन्न झालेल्या गाठीचा दाब पडून, किंवा उपदेशानें मेदूंतील मज्जाद्रव्य विकृत होऊन जो पक्षाघात होतो, तो हळू हळू होतो. याशिवाय मूत्रपिंडाचे व वायूचे रोग यामुळेंहि हा रोग होतो. उतारवयांत हा रोग विशेष करून होण्याचे कारण हें आहे कीं, त्या वयांत मेंदूचें शुध्द रक्ताच्यायोगें पोषण बरोबर न झाल्यामुळें त्याचा तो विशिष्ट भाग नरम होऊं लागतो व धमन्या कमजोर होऊन फुटतात. अगर या धमन्यांतील रक्त थिजतें व त्यामुळें त्यांतील प्रवाह बंद पडून मेंदूचा तो भाग नरम पडतो, व पक्षघात होतो मेंदूचा डावा अर्धा भाग येणेंप्रमाणें बिघडला असतां उजव्या बाजूचें अर्धांग व मेंदूचा उजवा अर्धभाग विकृत झाला असतां डाव्या बाजूचें अर्धांग लुलें पडतें. यास थोडे अपवाद आहेत त्यांचा विस्तार येथें करणें शक्य नाहीं 

अधिक माहिती आणि योग्य उपचारांसाठी माझ्याशी सम्पर्क करा :-
वैभव सुरेश राऊत
8378863861
उत्तर लिहिले · 26/4/2017
कर्म · 10245
0

अर्धांगवायू (Paralysis) होण्याची कारणे:

अर्धांगवायू म्हणजे शरीराच्या एखाद्या भागाचीpartial or complete strength गमावणे. ह्याची काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • Stroke (घात): मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यास किंवा रक्तस्त्राव झाल्यास अर्धांगवायू होऊ शकतो. NIH स्त्रोत
  • Spinal Cord Injury (पाठीच्या कण्याला दुखापत): यामुळे मेंदू आणि शरीराचा संपर्क तुटतो आणि अर्धांगवायू होऊ शकतो. Christopher Reeve Foundation स्त्रोत
  • Brain Injury (मेंदूला दुखापत): अपघात किंवा इतर कारणांमुळे मेंदूला इजा झाल्यास अर्धांगवायू होऊ शकतो.
  • Nerve Damage (नसांना इजा): मज्जातंतूंना (nerves) इजा झाल्यास स्नायू कमजोर होतात आणि अर्धांगवायू होऊ शकतो.
  • Genetic Disorders (अनुवांशिक विकार): काही अनुवांशिक विकारांमुळे अर्धांगवायू होऊ शकतो.
  • Infections (संसर्ग): काही प्रकारचे संक्रमण, जसे की पोलिओ, अर्धांगवायूला कारणीभूत ठरू शकतात.

चरबीच्या गाठी (Lipoma) आणि घरगुती उपाय:

चरबीच्या गाठी या त्वचेखाली तयार होणाऱ्या चरबीच्या पेशींच्या गाठी असतात. त्या सामान्यतः धोकादायक नसतात.

घरगुती उपाय:

  • हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन (curcumin) असते, ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म (anti-inflammatory properties) आहेत. हळद आणि ऑलिव्ह ऑईल (olive oil) मिक्स करून पेस्ट तयार करा आणि गाठीवर लावा. NIH स्त्रोत
  • ग्रीन टी (Green Tea): ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट्स (antioxidants) असतात, जे चरबीच्या गाठी कमी करण्यास मदत करतात. NIH स्त्रोत
  • ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar): चरबीच्या गाठीवर ऍपल सायडर व्हिनेगर लावल्याने गाठ कमी होण्यास मदत होते.
  • नारळ तेल (Coconut Oil): नारळ तेलाने मालिश केल्याने चरबीची गाठ कमी होऊ शकते.

महत्वाचे: हे उपाय वैद्यकीय उपचारांना पर्याय नाहीत. चरबीची गाठ मोठी असल्यास किंवा दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

चरबीची गाठ होण्याची कारणे:

चरबीची गाठ होण्याची नेमकी कारणे अजून पूर्णपणे स्पष्ट नाहीत, तरीही काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • Genetic Factors (अनुवांशिक घटक): जर कुटुंबातील सदस्यांना चरबीच्या गाठी असतील, तर तुम्हाला होण्याची शक्यता वाढते.
  • Age (वय): चरबीच्या गाठी कोणत्याही वयात होऊ शकतात, पण साधारणतः 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये जास्त आढळतात.
  • Medical Conditions (वैद्यकीय स्थिती): काही वैद्यकीय स्थिती, जसे की गार्डनर सिंड्रोम (Gardner's syndrome), मॅडेलुंग्स रोग (Madelung's disease), आणि कौडेन सिंड्रोम (Cowden syndrome), चरबीच्या गाठींशी संबंधित आहेत.
  • Lifestyle Factors (जीवनशैली घटक): लठ्ठपणा आणि उच्च चरबीयुक्त आहार देखील कारणीभूत असू शकतात, पण ह्यावर अजून संशोधन चालू आहे.

ह्या उपायांमुळे आराम न मिळाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 980

Related Questions

पायांवर सूज येण्याचे मुख्य कारण काय आहे?
हाताला पाणी का सुटते?
माझ्या बायकोला कानाच्या बाजूला एक गाठ आहे, त्याच्या आजूबाजूचा भाग दुखत नाही आणि ती गाठ वाढत पण नाही, तर ती कशाची असेल? तिच्यामुळे काही त्रास होईल का?
सलाईन लावलेला हात का सुजतो?
जिभेला चट्टे का पडले? कोणता उपाय करावा?
रक्तात यूरिक ऍसिड वाढल्यास काय होते?
सर्वाइकल स्पॉन्डिलोसिसमुळे जेव्हा दुखायला लागते त्यावेळी शरीरात वात निर्माण होतो का/झालेला असतो का?