व्यायाम आरोग्य

सूर्य नमस्कार बद्दल माहिती?

4 उत्तरे
4 answers

सूर्य नमस्कार बद्दल माहिती?

6
हि घ्या सविस्तर माहिती सूर्यनमस्काराबद्दल खालच्या दोन्ही images मध्ये



उत्तर लिहिले · 19/4/2017
कर्म · 2010
5
⚀        🌞सूर्यनमस्कार व्यायामाचा आणि उपासनेचा एक प्रकार. याने माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम मिळून सर्वत्र रक्ताचा पुरवठा होतो. आकुंचन-प्रसरणाच्या क्रिया सलग व सुलभ होत असल्याने हा व्यायामाचा शास्त्रोक्त प्रकार मानतात. प्राचीन काळापासून ते आजतागाय त उपासनेचा व व्यायामाचा हा प्रकार परंपरेने चालत आला आहे. त्यामागे अनेक धार्मिक समजुती व श्रद्घा आहेत.🌞सूर्यामुळे सृष्टीला उत्साह, उष्णता, आनंद आणि जीवन मिळत असल्यामुळे प्राचीन काळापासून हिंदू धर्मीय सूर्याला एक देवता मानतात. चलाचल सृष्टीचा सूर्य हाआत्मा आहे, असे वेदवचन आहे. भारतात धर्म आणि आरोग्य यांची सांगड घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून आढळते. त्यामुळे सूर्यनमस्कार हा एक उपासनेचा मार्ग बनलेला असावा. भारतात या आरोग्यदायक उपासनेला शास्त्रीय स्वरुप देण्याचे प्रयत्न झाले. त्यातून अनेक स्तोत्रे, संकल्प आणि पद्घती तयार झाल्या. भारतात अनेक ठिकाणी सूर्योदयाच्या पूर्वी सूर्योपासनेकरिता नित्यनेमाने नमस्कार घालणे, हे एक धार्मिक कर्तव्य मानले जाते. याला ‘अष्टांग’ वा ‘साष्टांग’ नमस्कार किंवा ‘अष्टांग दंड’ असेही म्हणतात.
आबालवृद्घ, स्त्री-पुरुषांना उपयुक्त व फलदायी असा हा व्यायाम व उपासनाप्रकार आहे.सूर्यनमस्कारासाठी स्वच्छ, शांतव हवेशीर जागा योग्य असते. त्यासाठी सु. २–३ मी. लांब आणि सु. पाऊण ते एक मीटर रुंद जागा पुरेशी असते. अंगावर सैल व हलकी वस्त्रे घालून व जमिनीवर सतरंजी वा चटई पसरुन नमस्कार घातले जातात. सतरंजी वा चटई न वापरता नुसत्या जमिनीवरही सूर्यनमस्कार घालता येतात; मात्र ती जमीन फार गुळगुळीत नसावी, जेणेकरुन त्यावरुन हातपाय घसरु नयेत. थंड पाण्याने स्नान करुन नमस्कार घालताना सूर्याचे कोवळे किरण अंगावर पडले, तर त्याचा चांगला उपयोग होतो.
कोणत्याही साधनावाचून थोड्या जागेत व थोड्या वेळात पुरेसा व्यायाम मिळतो, हे सूर्यनमस्कारांचे एक वैशिष्ट्य होय.
🌞“उरसा, शिरसा, दृष्ट्या, वचसा, मनसा तथा । पद्भ्याम्, कराभ्याम्, जानुभ्याम् प्रणामोऽष्टांग उच्यते ॥ ” 🌞
योगाच्या आधारे सूर्योपासना करणे हे उद्दिष्ट मानून बीजमंत्रासहित केलेला सूर्यनमस्कार हा व्यायामाबरोबरच उपासना देखिल घडवून आणतो. ह्या उपासनेतून ईश्वराला शरण जाण्याची जाणीव होते. ह्याचा पुढील आयुष्यात खूपचांगला परिणाम अनुभवास येतो. सूर्यनमस्कारामुळे शारिरीक संवर्धनास मदत होते. सूर्यनमस्कारात योगासनांचा अभ्यास असून प्राणायमांची साधनाआहे. सूर्यनमस्काराच्या मदतीने सूर्यनारायणाची उपासना होते. व त्याचबरोबर मंत्रांचे सामर्थ्य आहे. म्हणून त्याला सर्वांगसुंदर व्यायाम म्हटले अहे. ह्या सूर्यनमस्करात समाविष्ट असलेल्या सहा आसनांचा आपण अभ्यास करणार आहोत. ह्या सहा आसनाची साखळी म्हणजेच सूर्यनमस्कार होय.सूर्यनमस्कार घालणेकोवळया किरणांत पूर्वेला तोंड करून सूर्यनमस्कार घालावेत.
🌞सूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे : –*.सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.*.हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.*.बाहू व कंबर यांचे स्नायू बळकट होतात.*.पाठीचा मणका व कंबर लवचिक होतो.*.पोटाजवळची चरबी वितळून वजन कमीहोण्यास मदत होते.*.पचनक्रिया सुधारते.*.मनाची एकाग्रता वाढते.
🌞सूर्यनमस्कार घालतांना करावयाचे विविध नामजप
१. ॐ मित्राय नम: ।२. ॐ रवये नम: ।३. ॐ सूर्याय नम: ।४. ॐ भानवे नम: ।५. ॐ खगाय नम: ।६. ॐ पूष्णे नम: ।७. ॐ हिरण्यगर्भाय नम:।८. ॐ मरिचये नम: ।९. ॐ आदित्याय नम: ।१०. ॐ सवित्रे नम: ।११. ॐ अर्काय नम: ।१२. ॐ भास्कराय नम: ।१३. ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम: ।
🌞सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत : –एकूण दहा योगस्थिती मिळून एक सूर्यनमस्कार बनतो. प्रत्येक सूर्यनमस्कारापूर्वी क्रमाने `ॐमित्राय नम: ।’ पासून क्रमाने एकेक नामजप करून सूर्यनमस्कार घालावा व शेवटी `ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम: ।’ हा समालोचनात्मक नामजप म्हणावा. प्रत्येक योगस्थिती हे एक वेगळे आसन आहे. सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक स्थितीबरोबर आलटून पालटून `पूरक’ व `रेचक’ अशा पद्धतीने श्वसनक्रिया सुरू ठेवावी, उदा. `स्थिती २’ ला `पूरक’, `स्थिती ३’ ला `रेचक’, पुन्हा `स्थिती ४’ ला `पूरक’ याप्रमाणे. सूर्यनमस्काराचे शारीरिक लाभ पुरेपूर मिळावेत, यासाठी प्रत्येक स्थितीत १० ते १५ सेकंदस्थिर रहाता आले पाहिजे.
0

सूर्य नमस्कार:

सूर्य नमस्कार हा एक योगासनांचा क्रम आहे. 'सूर्य' म्हणजे 'सूर्य' आणि 'नमस्कार' म्हणजे 'अभिवादन' करणे.

हे १२ वेगवेगळ्या आसनांचे एक चक्र आहे, जे सूर्याला आदराने समर्पित आहे.

सूर्य नमस्कार करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सूर्य नमस्काराचे फायदे:

  • शारीरिक फायदे:
    • शरीरातील लवचिकता वाढवते.
    • वजन कमी करण्यास मदत करते.
    • पचनक्रिया सुधारते.
    • रक्त परिसंचरण सुधारते.
    • शरीराला ऊर्जा मिळते.
  • मानसिक फायदे:
    • तणाव कमी होतो.
    • एकाग्रता वाढते.
    • मानसिक शांती मिळते.
    • सकारात्मकता वाढते.

सूर्य नमस्कार करण्याची पद्धत:

  1. प्रणामासन: सरळ उभे राहा, हात छातीजवळ नमस्कार मुद्रेत ठेवा.
  2. हस्तउत्तानासन: श्वास घेत हात वरच्या दिशेने ताणा.
  3. पादहस्तासन: श्वास सोडत खाली वाका आणि हातांनी पाय स्पर्श करा.
  4. अश्व संचालनासन: श्वास घेत एक पाय मागे घ्या, दुसरा पाय पुढे ठेवा आणि नजर वर ठेवा.
  5. पर्वतासन: श्वास सोडत दोन्ही पाय मागे घ्या आणि शरीर त्रिकोणाच्या आकारात आणा.
  6. अष्टांग नमस्कार: श्वास रोखून ठेवून गुडघे, छाती आणि हनुवटी जमिनीला स्पर्श करा.
  7. भुजंगासन: श्वास घेत छाती वर उचला आणि मागे वाका.
  8. पर्वतासन: श्वास सोडत पुन्हा शरीर त्रिकोणाच्या आकारात आणा.
  9. अश्व संचालनासन: श्वास घेत एक पाय पुढे आणा, दुसरा पाय मागे ठेवा आणि नजर वर ठेवा.
  10. पादहस्तासन: श्वास सोडत खाली वाका आणि हातांनी पाय स्पर्श करा.
  11. हस्तउत्तानासन: श्वास घेत हात वरच्या दिशेने ताणा.
  12. प्रणामासन: श्वास सोडत हात छातीजवळ नमस्कार मुद्रेत ठेवा.

टीप:

सूर्य नमस्कार करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1100

Related Questions

कानाच्या मशीनचे फायदे काय आहेत?
नर्सिंग ब्युरो रजिस्ट्रेशन कुठे होते?
नर्सिंग स्टाफ रजिस्ट्रेशन कुठे होते?
सकारात्मक मानसिक आरोग्यात कोणत्या घटकांचा समावेश होतो?
लहान मुलाला दात येत असताना त्रास झाल्यास काय करावे?
बी. फार्मसी विषयी माहिती?
हातपाय व पाठ कंबर दुखण्याचे काय कारण असू शकते?