कायदा हिंदू कोड बिल

हिंदू कोड बिल काय आहे?

3 उत्तरे
3 answers

हिंदू कोड बिल काय आहे?

9
स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती कि तमाम स्त्रियांना या जाचक रूढी आणि परंपरा मधून मुक्त करावे आणि ते आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले.
स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे-


१. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.


२. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार


३. पोटगी


४. विवाह


५ . घटस्फोट


६. दत्तकविधान


७. अज्ञानत्व व पालकत्व.





हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच ! भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगीकार केलेला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला, हे अतिशय दुर्दैवी होते. या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला.


या बिल द्वारे बाबासाहेबांनी एक-विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता, स्त्रियांना संपती मध्ये समान वाटा आणि सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधीची तरतूद केली होती परंतु कडवे हिंदू नेते आणि विचारवंत यांना स्त्रियांना समान अधिकार देण्याची तयारी नव्हती. "हिंदू धर्मावरील आक्रमण" अशा प्रतिक्रिया देऊन अशा नेत्यांनी प्रखर विरोध केला होता.

हिंदू कोड बील लोकसभेत मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला.

पण बाबासाहेबांचे कष्ट निरर्थक ठरले नाहीत. ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे-


१) हिंदू विवाह कायदा.


२) हिंदू वारसाहक्क कायदा


३) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा


४) हिंदू दत्तक व पोटगी कायदा.

हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होय. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली.
उत्तर लिहिले · 14/4/2017
कर्म · 10255
4
*_⭕ हिंदू  कोड़ बिल आणि बाबासाहेब ⭕_*


'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*_🌹तारीख  14 एप्रिल 2017 🌹_*
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
२७ सप्टेंबर इतिहासातील 'स्वाभिमानी दिवस' याच दिवशी १९५१ साली स्वतंत्र भारताच्या नेहरूंच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारली आणि राजीनामा दिला होता याच दिवशी १९५१ साली भारताचे प्रधानमंत्री नेहरू यांनी डॉ. बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक आणि धाडसाने मांडलेले "हिंदू कोड बिल" बरखास्तकेले. हे सर्व मान्य आहे कि हिंदू संस्कृतीत स्त्रियांचा दर्जा हा दुय्यम प्रतीचा आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकार नाकारणारा होता. हिंदू धर्माच्या, स्त्रियांबद्दलच्या अनिष्ट रूढी आणि बंधने झुगारून देऊन स्त्री-पुरुष समानतेच्या आणि योग्य सन्मान मिळण्याच्या सोनेरी संधी ला भारत कायमचा मुकला होता.
*_░मा░░हि░░ती░░ ░ ░से░░वा░░ ░ ░ग्रू░प░ ░पे░ठ░व░ड़░गा░व░_*
डॉ. आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवले आहेत. आज सुद्धा प्रसारमाध्यमे आणि स्त्रीवादी लेखक / लेखिका सोयीस्कररीत्या बाबासाहेबांच्या या एकहाती लढया बद्दल लिहित नाहीत. बाबासाहेबांना एक "राष्ट्र निर्माते" म्हणून न मानता फक्त दलित नेता असे भारतीय समाजावर कायमचे बिंबवण्याचे हे षड्यंत्र आहे. भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल आणू पाहणा-या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची म्हणावी तशी दखल आपल्याभगिनीवर्गाने घेतलेली नाही.
समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे होय. हिंदू कोड बिलाला मी हे महत्त्व देते. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवसबाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते. स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले.
*'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖_*  *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*✆ ░9░8░9░0░8░7░5░4░9░8░*
*_'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''_*
0

हिंदू कोड बिल हे कायद्यांचे एक संच होते, ज्याचा उद्देश हिंदू धर्माशी संबंधित असलेल्या कायद्यांना सुधारित करणे आणि त्यांचे संहिताकरण करणे हा होता.

या कायद्यामध्ये खालील सुधारणा प्रस्तावित होत्या:

  1. विवाह (Marriage)
  2. उत्तराधिकार (Succession)
  3. दत्तकविधान (Adoption)
  4. देखभाल (Maintenance)

१९५० च्या दशकात हे विधेयक भारतीय संसदेत सादर केले गेले. या विधेयकाचा उद्देश स्त्रियांचे अधिकार वाढवणे, जातीय भेदभावाला विरोध करणे आणि हिंदू कायद्यांमध्ये एकसमानता आणणे हा होता.

या विधेयकाला काही लोकांकडून विरोध झाला, परंतु progressive विचारांच्या लोकांनी या विधेयकाचे समर्थन केले. या विधेयकामुळे हिंदू स्त्रियांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा झाली, त्यांना संपत्तीमध्ये समान अधिकार मिळाले आणि घटस्फोट घेणे सोपे झाले.

हिंदू कोड बिलामध्ये खालील कायदे समाविष्ट आहेत:

  1. हिंदू विवाह कायदा, १९५५ (Hindu Marriage Act, 1955)
  2. हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ (Hindu Succession Act, 1956)
  3. हिंदू दत्तक आणि निर्वाह कायदा, १९५६ (Hindu Adoptions and Maintenance Act, 1956)
  4. बाल विवाह प्रतिबंधक कायदा, २००६ (Prohibition of Child Marriage Act, 2006)

हे कायदे हिंदू समुदायातील व्यक्तींच्या जीवनातील विविध पैलूंचे नियमन करतात आणि सामाजिक न्याय आणि समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5220

Related Questions

मला सांगा की हिंदू कोड बिल म्हणजे काय आणि यामध्ये काय काय विशेष आहे?
हिंदू कोड बिलातील ७ मुद्द्यांवर माहिती मिळेल का?