शब्दाचा अर्थ कायदा दत्तक

दत्तक बद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

दत्तक बद्दल माहिती मिळेल का?

4
*_⭕ मूल दत्तक घेण्या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी ⭕_*


'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*_🌹तारीख  10  एप्रिल 2017 🌹_*
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
हिंदू दत्तकाचा कायदा 1956 मध्ये संसदेने मंजूर केला. या कायद्यातील दिलेल्या तरतुदींच्या आधारेच फक्त दत्तक घेता येईल. या कायद्यातील तरतुदीविरुद्ध दत्तक घेतले गेल्यास सदर दत्तकनामा/ पत्र हे पूर्णपणे बेकायदेशीर व मुळात झालेलेच नव्हते असे कायदा समजेल आणि असे झालेले दत्तक पत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे कोणतेही हक्क हिरावून घेऊ शकणार नाही.
*हिंदू पुरुषांची दत्तक घेण्यासाठी पात्रता*
कोणताही मानसिक दृष्ट्या व सज्ञान व जोमुलगा किंवा मुलगी दत्तक घेण्यास पात्र आहे मात्र त्यासाठी त्याला त्याचे पत्नीची संमती आवश्यक मात्र अशी पत्नी हिंदू राहिली नाही किंवा तिने संन्यास घेतल्यास किंवा कोर्टाने वेडी म्हणून जाहीर केल्यास अशा संमतीची गरज पडणार नाही. तसेच एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास सर्वांनी संमती आवश्यक ठरते.
*हिंदू स्त्रीची दत्तक घेण्याबद्दल पात्रता* तंदुरुस्त मनाची व सज्ञान स्त्री.* अविवाहित वा घटस्फोटित वा विधवा.* किंवा जिच्या नवऱ्याने अंतिम संन्यास घेतला आहे.* किंवा जिचा नवरा हिंदू राहिलेला नाही.* किंवा जिचा नवरा कोर्टाने वेडा म्हणून जाहीर केला आहे.फक्त अशाच स्त्रीला मूल दत्तक घेता येईल.
*दत्तक पत्र करून देणाऱ्या व्यक्तीची पात्रता*
(अ) फक्त नैसर्गिक व कायदेशीर मुलाची आई, वडील व पालकासच दत्तक पत्र लिहून देता येईल किंवा मुलाला दत्तक म्हणून देण्याचा अधिकार असेल.(ब) फक्त वडिलांना मूल दत्तक धेण्याचा अधिकार असेल, मात्र त्यासाठी आईची संमती आवश्यक; मात्र अशी आई जिने कायमचा संन्यास घेतला आहे किंवा जी हिंदू राहिलेली नाही किंवा जिला कोर्टाने वेडे म्हणून जाहीर केले आहे. तिचे संमतीची गरज नाही.(क) मात्र वडील जिवंत असताना आई मुलाला दत्तक देऊ शकत नाही किंवा वडिलांनी कायमचा संन्यास घेतला असल्यास वा कोर्टाने वडिलांना वेडे म्हणून जाहीर केले असल्यास किंवा ते हिंदू न राहिल्यास आई मुलाला दत्तक म्हणून देऊ शकते.(ड) मात्र दोघेही नैसर्गिक आई-वडील मृत्यू पावल्यास किंवा दोघांनीही कायमचा संन्यास घेतल्यास किंवा दोघेही हिंदू न राहिल्यास किंवा दोघांनाही मुलाला कायमचे सोडल्यास किंवा दोघांनाही कोर्टाने वेडे म्हणून जाहीर केल्यास किंवा ज्या मुलाचे आई-वडील कोण हे माहिती नसल्यास अशा मुलास त्याचे कायदेशीर पालक दत्तक म्हणून देऊ शकतात. मात्र त्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने कोर्टाची परवानगी आवश्यक ठरते; मात्र अशी परवानगी देताना कोर्ट फक्त मुलाच्या भविष्याचा वा कल्याणाचाच विचार करेल व पालकाने याकामी दत्तक मुलासाठी कोणताही मोबदला स्वीकारला नाही याची खातरजमा करेल.
*कोणती व्यक्ती दत्तक म्हणून जाऊ शकते?*
(अ) फक्त हिंदू व्यक्ती.(ब) जी व्यक्ती पूर्वी दत्तक गेलेली नाही.(क) अविवाहित मात्र तशी रूढी, परंपरा सदर जाती/जमातीत असल्यास चालू शकते.(ड) 15 वर्षांचे आतील मूल मात्र तशी रूढी परंपरा सदर जाती जमातीतील असल्यास 15 वर्षांवरील चालू शकते.
*कायदेशीर दत्तकासाठी इतर तरतुदी*
- जर मुलाला दत्तक घेतल्यास दत्तक घेणाऱ्या आई किंवा वडिलास स्वतःचा वा दत्तकाचा मुलगा, नातू किंवा पणतू नसावा.- जर मुलीला दत्तक घ्यावयाचे असल्यास दत्तक घेणाऱ्या आई-वडिलास स्वतःची व दत्तकाची मुलगी किंवा नात नसावी.- जर स्त्रीने मुलाला दत्तक घ्यावयाचे असेल तर स्त्रीचे (दत्तक आईचे) वय मुलापेक्षा कमीत कमी 21 वर्षांनी जास्त हवे.- जर पुरुषांनी मुलीला दत्त घ्यावयाचे असेल तर दत्तक मुलीपेक्षा पुरुषाचे (दत्तक वडिलांचे) वय कमीत कमी 21 वर्षांनी जास्त हवे.- एकच मूल दोन पेक्षा वेगळ्या व्यक्तींना दत्तक घेता येत नाही. थोडक्यात, आई-वडील या व्यतिरिक्त नाते असलेल्या दोन व्यक्तींना एक मूल दत्तक घेता येत नाही.- दत्तक जाणारे मुलांचे हस्तांतरण जन्मदात्या आई-वडिलांनी वा व्यक्तीने प्रत्यक्षात करणे आवश्यक ठरते.
*दत्तकाचे परिणाम*
- दत्तक मूल, दत्तक घेणाऱ्या दत्तक आई-वडिलांचे दत्तक घेतल्यापासून कायदेशीर दत्तक मूल सर्व हक्कांस हित पकडले जाईल.-  दत्तक म्हणून गेल्यानंतरसुद्धा दत्तक जाण्यापूर्वीचे हिश्श्याचे मिळकतीचे हक्क त्यावरील बोजासहित शाबूत राहतात. अशा वेळी जन्मदात्याचे/नातेवाइकाचे जबाबदारीही त्यास कायद्याने सांभाळावी लागते.-
*_💖 माहिती  सेवा ग्रूप पेठवड़गाव  💖_*
दत्तक गेल्याने दत्तक कुटुंबातील हक्क मिळत असले तरी इतर मुलांचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही.- मूल दत्तक घेतल्यानंतर सुद्धा दत्तक आई-वडिलांचे त्यांची व त्यांचे हिश्श्याची मालमत्ता ते विकू शकतात किंवा मृत्युपत्र करू शकतात.- पत्नीने मुलास दत्तक घेतल्यास तो दत्तक माता ठरते. मात्र एका पेक्षा जास्त पत्नींचे संमतीने मुलास दत्तक घेतल्यास सर्वांत वरिष्ठ माता दत्तक माता ठरते.- विधुर किंवा अविवाहित पुरुषाने मूल दत्तक घेतल्यानंतर विवाह केल्यास त्याची पत्नी मुलाची सावत्र आई होते.- विधवेने किंवा अविवाहित स्त्रीने मूल दत्तक घेतल्यानंतर विवाह केल्यास तिचा पती मुलाचा सावत्र वडील ठरतो.- एकदा मूल दत्तक गेल्यावर दत्तकपत्र कोणासही रद्द करता येत नाही.- नोंदणीकृत दत्तकपत्राने केलेला दस्तकोर्ट ग्राह्य पुरावा धरते.दत्तकनाम्यास आर्थिक व्यवहारावर बंदीदत्तक मुलाच्या बदल्यात कुणालाही मोबदला स्वीकारता येणार नाही किंवा स्वीकारण्याचा करार करता येणार नाही. तसे आढळल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास वा दंड वा दोन्हीही शिक्षेस पात्र राहील. मात्र शासनाचे पूर्वपरवानगी शिवाय शिक्षेची अंमलबजावणी करता येणार नाही. दत्तकनामा व दत्तक विधी हे पवित्रतम मानले जाते. यात व्यवहाराचा भाग नसून भावनेचा संदर्भ असतो. मात्र अनिष्ट प्रवृत्तींनी याचा वृथा लाभ घेऊ नये म्हणून कायद्याचे सोपस्कार पाळणे आवश्यक.
वैध दत्तक पत्र कोण करू शकतो?-
जी व्यक्ती मूल दत्तक घेण्यास सक्षम असते व तसे अधिकार असतात.- जी व्यक्ती दत्तक देते तिला सदर कायदेशीर अधिकार असतात.- जी व्यक्ती दत्तक जाते ती दत्तकास पात्र हवी.- इतर कायदेशीर तरतुदींचे पालन होणे अनिवार्य.
*'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖_*  *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*✆ ░9░8░9░0░8░7░5░4░9░8░*
*_'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''_*
0

दत्तक म्हणजे काय, त्याचे प्रकार, आणि कायदेशीर प्रक्रिया याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे:

दत्तक म्हणजे काय? (What is Adoption?)

दत्तक म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायदेशीररित्या आपले मूल म्हणून स्वीकारणे, जे जैविकदृष्ट्या त्याचे मूल नाही. दत्तक घेतल्यानंतर, त्या मुलाला कुटुंबात ते जैविक मूल असल्यासारखेच अधिकार आणि कर्तव्ये मिळतात.

दत्तकचे प्रकार (Types of Adoption):
  1. देशांतर्गत दत्तक (Domestic Adoption):

    जेव्हा एखादे कुटुंब आपल्याच देशातील मुलाला दत्तक घेते, तेव्हा त्याला देशांतर्गत दत्तक म्हणतात.

  2. आंतरराष्ट्रीय दत्तक (International Adoption):

    जेव्हा एखादे कुटुंब दुसऱ्या देशातील मुलाला दत्तक घेते, तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय दत्तक म्हणतात. यात दोन देशांमधील कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.

  3. नातेवाईकांचे दत्तक (Relative Adoption):

    जेव्हा एखादे कुटुंब त्यांच्या नातेवाईकांमधील मुलाला दत्तक घेते, तेव्हा त्याला नातेवाईकांचे दत्तक म्हणतात.

दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया (Legal Process of Adoption):
  1. अर्ज करणे (Application):

    दत्तक घेण्यासाठी इच्छुक असलेल्या कुटुंबाला competent adoption agency मध्ये अर्ज करावा लागतो.

  2. घराची तपासणी (Home Study):

    अर्ज केल्यानंतर, दत्तक संस्थेचे अधिकारी तुमच्या घराची आणि कुटुंबाची पाहणी करतात. यामध्ये कुटुंबाची आर्थिक स्थिती, आरोग्य, आणि मुलाला वाढवण्याची क्षमता तपासली जाते.

  3. मुलाची निवड (Child Selection):

    तपासणीत पात्र ठरल्यानंतर, संस्थेकडून कुटुंबाला दत्तक घेण्यासाठी मुलाची माहिती दिली जाते.

  4. कोर्टाची प्रक्रिया (Court Process):

    मुलाची निवड झाल्यानंतर, कोर्टात याचिका दाखल करावी लागते. कोर्टात सर्व कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, कोर्ट दत्तक घेण्याचा आदेश देते.

  5. दत्तक प्रमाणपत्र (Adoption Certificate):

    कोर्टाच्या आदेशानंतर, कुटुंबाला दत्तक प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्राने मूल कायदेशीररित्या त्या कुटुंबाचा भाग बनतो.

भारतातील दत्तक घेण्यासाठी नियम (Rules for Adoption in India):
  • दत्तक घेणारे पालक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावे.
  • त्यांचे आर्थिक उत्पन्न स्थिर असावे.
  • एका विवाहित जोडप्याला मूल दत्तक घ्यायचे असल्यास, दोघांचीही संमती आवश्यक आहे.
  • एका अविवाहित व्यक्तीला मुल दत्तक घ्यायचे असल्यास, काही विशेष नियम आणि अटी लागू होऊ शकतात.
CARA (Central Adoption Resource Authority):

CARA ही भारत सरकारची एक संस्था आहे, जी देशातील आणि आंतरराष्ट्रीय दत्तक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवते. CARA च्या माध्यमातूनच दत्तक घेण्याची प्रक्रिया कायदेशीर ठरते.
अधिक माहितीसाठी CARA च्या वेबसाइटला भेट द्या: CARA Website

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2200

Related Questions

दत्तक पुत्र नामंजूर?
माझे दत्तक वडील?
बहिणीची मुलगी दत्तक घेता येते का?
वही हम दिव्य आय संतान?
मूल दत्तक कसे घ्यावे? दत्तक घेण्याची प्रक्रिया काय असते? कोणीही दत्तक घेऊ शकतं का?
रजिस्टर दत्तक पत्र करायला किती खर्च येतो?
मला डॉग (dog) घ्यायचा आहे, कोणाकडे आहे? माझा नंबर ७०२८८९९१२१.