
दत्तक
दत्तक पुत्र नामंजूर कधी होऊ शकतो याची माहिती खालीलप्रमाणे आहे:
- कायदेशीर प्रक्रियांचे पालन न करणे: दत्तक घेण्याची प्रक्रिया कायदेशीररित्या योग्य नसेल, तर दत्तक विधान नामंजूर होऊ शकते. उदाहरणार्थ, आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असणे, न्यायालयाची परवानगी न घेणे, किंवा इतर नियमांचे उल्लंघन करणे.
- पालकांची अपात्रता: जर दत्तक घेणारे पालक अपात्र ठरले, जसे की ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील, त्यांचे चारित्र्य चांगले नसेल, किंवा ते मुलाला योग्य वातावरण देऊ शकत नसतील, तर दत्तक विधान नामंजूर होऊ शकते.
- मुलाचे हित: जर दत्तक घेतल्याने मुलाचे हित सुरक्षित नसेल, तर न्यायालय दत्तक विधान नामंजूर करू शकते. मुलाला योग्य शिक्षण, आरोग्य सुविधा, आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे.
- खोटेपणा किंवा फसवणूक: जर दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत पालकांनी खोटी माहिती दिली, फसवणूक केली, किंवा तथ्ये लपवली, तर दत्तक विधान रद्द होऊ शकते.
- संमतीचा अभाव: काही प्रकरणांमध्ये, जर मूल मोठे असेल, तर त्याची संमती आवश्यक असते. जर मुलाने दत्तक जाण्यास नकार दिला, तर दत्तक विधान नामंजूर होऊ शकते. त्याचप्रमाणे, जैविक पालकांची संमती देखील आवश्यक असते.
दत्तक विधान नामंजूर होऊ नये यासाठी कायदेशीर प्रक्रियांचे योग्य पालन करणे, सत्य माहिती देणे, आणि मुलाचे हित जपणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
दत्तक वडील म्हणजे कायदेशीर प्रक्रियेद्वारे ज्या पुरुषाने मुलाला त्याचे जैविक वडील नसतानाही पितृत्वाचा दर्जा दिला आहे.
दत्तक विधान ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे एका व्यक्तीला (Adult) दुसऱ्या व्यक्तीचे (Child) कायदेशीर पालक म्हणून घोषित केले जाते. दत्तक घेतल्यानंतर, दत्तक घेतलेल्या मुलाचे/मुलीचे त्याच्या जैविक पालकांशी असलेले सर्व संबंध संपुष्टात येतात आणि दत्तक घेतलेल्या पालकांना ते मुल जैविक असल्याप्रमाणे सर्व अधिकार आणि कर्तव्ये मिळतात.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
बहिणीची मुलगी नात्याने भाची असते व वंशाने ती परकी असते.
पण शक्यतो सगोत्र विवाह टाळावा.
👧 *कोणत्या सरकारी खात्याच्या अखत्यारीत दत्तक घेण्याची प्रक्रिया चालते?*
महिला आणि बाळ कल्याण या खात्याद्वारे स्थापित केलेल्या Central Adoption Resource Authority तर्फे मूल दत्तक घेण्याच्या सर्व कायदेशीर बाबींवर लक्ष ठेवण्यात येते. यानुसार बनवलेल्या नियमावलीप्रमाणेच दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते.
🥳 *दत्तक घेण्यासाठी मूलतः कुठल्या अटी आणि नियम लागू होतात?*
१. परदेशस्थ भारतीय नागरिक किंवा परदेशी नागरिक भारतात जन्माला आलेले मूल दत्तक घेऊ शकतो. या तिन्हीसाठी वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.
२. मुल दत्तक घेणे यासाठी विवाहित असण्याची सक्ती नाही.
३. स्त्री किंवा पुरुष कोणीही मूल दत्तक घेऊ शकतं. जर एखादे जोडपे मूल दत्तक घेऊ इच्छित असेल तर त्यांच्या लग्नाला कमीतकमी २ वर्ष पूर्ण झालेली असावीत. आणि दत्तक घेण्यासाठी दोघांचीही संमती असावी.
४. पालकांचे वय आणि बाळाचे वय यामध्ये कमीतकमी २५ वर्षाचे अंतर असावे.
५. दत्तक घेणाऱ्या व्यक्ती शारिरिक, मानसिकरीत्या सामान्य स्थितीत असाव्यात. किंवा त्यांना आर्थिक स्थैर्य असावे. दांपत्यापैकी कोणालाही गंभीर आजार नसावा.
६. ज्यांना ३ किंवा अधिक मुलं आहेत त्यांना दत्तक घेण्याची परवानगी मिळत नाही.
७. एकल पालकत्व
एकल पालकत्वामध्ये स्त्री मुलगा किंवा मुलगी कोणालाही दत्तक घेऊ शकते. पण पुरुष पालकाला मुलगी दत्तक घ्यायचा अधिकार नाही. यासोबत एकल पालक ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा अशीही अट आहे.
८. दांपत्य जर एखादे मूल दत्तक घेत असेल तर त्यांच्या वयाची बेरीज ११० वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
👍 *३. कोणते मुल दत्तक जाण्यास पात्र असते?*
अनाथ बालक, आईवडिलांनी सोडून दिलेले मूल किंवा जन्मदात्यांनी सांभाळण्यासाठी सोडून दिलेले मूल (surrendered) हे कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर हे मूल दत्तक घेता येतं. यासाठी ते मूल legally free असावे लागते. वर दिलेल्या तीन प्रकारांत न बसणारी मुले legally free आहेत की नाहीत हे District Child Protection Unit (DCPU) ठरवते. यासाठी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून मुलाचे फोटो प्रकाशित करण्यात येतात. दिलेल्या मुदतीत कोणीही पालकत्व सिद्ध करण्यास पुढे न आल्यास पोलीस खात्यातर्फे ‘पालक मिळत नाहीत’ असे प्रमाण पत्र दिले जाते. त्यानंतरच मूल दत्तक जाण्यास पात्र असते.
☺ *दत्तक घेण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या पायऱ्या कोणत्या?*
१. सर्वप्रथम पालकांनी त्यांचे नाव Recognised Indian Placement Agencies (RIPA) किंवा Special Adoption Agency (SPA) या संस्थांकडे दत्तक घेण्यासाठी इच्छुक असे नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. या नोंदणीकरणात अनेक सामाजिक कार्यकर्ते मदत करू शकतात.
२. RIPA किंवा SPA या संस्थेत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते इच्छुक पालकांच्या घरी जाऊन त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करतात. याचसोबत पालकांनी मार्गदर्शनपर वर्गात जाऊन पालकत्वाची मानसिक तयारी करायची असते. नोंदणी केल्यानंतर ३ महिन्याच्या आत हा भाग पूर्ण करावा लागतो.
३.यानंतर RIPA किंवा SPA संस्था दत्तक जाण्यासाठी तयार असललेल्या मुलांची भेट इच्छुक पालकांशी करून देतात. या दरम्यान या मुलांसोबत काही वेळ देखील घालवण्याची परवानगी दिली जाते. दत्तकपात्र मुलाचे वैद्यकीय कागदपत्र इच्छुकांना अभ्यासासाठी दिले जातात.
😊 ओळख झालेल्या आणि लळा लागलेल्या मुलाला दत्तक घेण्याची मानसिक तयारी झाल्यावर एक स्वीकृती अर्ज पालकांना सही करावा लागतो.
⚖ *कोर्टासमोर अर्ज करणे.*
सर्व कागदपत्र तयार झाल्यानंतर कोर्टासमोर मूल दत्तक घेण्यासाठी वकिलामार्फत अर्ज करावा लागतो. हा अर्ज कोर्टाने मान्य केल्यावर कोर्टासमोर पालकांना अर्जावर पुन्हा एकदा सह्या कराव्या लागतात.
*⃣ *foster care किंवा तात्पुरतं पालकत्व*
कोर्टाने परवानगी दिल्यावर मुलाला आणि पालकांना एकमेकांची सवय व्हावी आणि पालकांना मुलाच्या अंगभूत सवयी कळाव्यात यासाठी काही काळ मुलाचा ताबा पालकांना दिला जातो. कालांतराने पालकांना कोर्टासमोर मुलासोबत हजर व्हावे लागते. न्यायाधीशासमोर बंद खोलीत दत्तक घेण्याबद्दल सुनावणी होते. यावेळी काही प्रश्न पालकांना विचारले जातात आणि काही रक्कम मुलाच्या नावाने गुंतवण्याचे आदेश दिले जातात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गुंतवणुकीचा पुरावा दाखवल्यावर कोर्ट adoption order देतं. परंतु, पुढची दोन वर्षे कोर्टातर्फे पाठपुरावा केला जातो.