भूगोल स्थलांतर लिखाण

स्थलांतरणाचे परिणाम या विषयावर 200-300 शब्दांत वर्णन सांगा.

2 उत्तरे
2 answers

स्थलांतरणाचे परिणाम या विषयावर 200-300 शब्दांत वर्णन सांगा.

3
↙कुणीही आपले गाव, घर सोडून आनंदाने बाहेर जात नाही. परिस्थितीच त्यांना तसे करण्यास मजबूर करते. गेल्या काही वर्षांतील हवामान बदल, हवा, पाण्याचे प्रदूषण, साथीचे रोग, दुष्काळ, गरिबी, भूकंप, सुनामी, महापूर तसेच ज्वालामुखीच्या राखेने शेती आणि पिकांचे होणारे नुकसान ही लोकांच्या स्थलांतराची महत्त्वाची कारणे आहेत.
🕯स्थलांतराची कारणे 🕯
1) पाण्याचे प्रदूषण -जगभरात पाण्याच्या प्रदूषणाने गंभीर समस्या निर्माण केली आहे. कीटकनाशके, तणनाशके आणि रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर; याशिवाय शहरी भागातील दूषित घाण पाणी नदीपात्रात सोडल्याने वाहते पाणीदेखील प्रदूषित होत आहे. या पाण्याच्या वापराने रोगराईपसरण्यास सुरवात झाली आहे. देशातील विविध भागांत कॉलरा, गॅस्ट्रोच्या साथी पसरत आहेत. पिण्यासाठी चांगले स्वच्छ, निर्जंतुक पाणी उपलब्ध होत नसल्यानेदेखील स्थलांतरात वाढ होतानादिसते. पाण्यामध्ये शिसे, ऍल्युमिनियम आणि इतर घातक घटक मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्याचाही परिणाम मानवाच्या मज्जासंस्थांवर होतो. पाण्याच्या प्रदूषणातून किडनीचे रोग, रक्तवाहिन्यांवर परिणाम होणे, डोळ्यांवर परिणाम होणे, आतड्यांवर परिणाम झाला आहे.2) भूकंप - किल्लारीसारखे भूकंप जगभर अधूनमधून होतात. त्यातून स्थलांतर होते. जपानमध्ये सातत्याने भूकंप होतात.3) सुनामी - सुनामीमुळे अनेक वेळा मानवी वस्त्यांचे नुकसान होते. त्यातून स्थलांतर होते. सन 2005 मध्ये आलेल्या सुनामीने सुमात्रा, भारताच्यादक्षिण किनारपट्टीवरील मानवी वस्तीवरपरिणाम झाला.4) आवाजाचे प्रदूषण - काही भागात खाणींच्या स्फोटाचे आवाज, विमानतळामुळे विमानांचे, आगगाडीचे, वाहतुकीचे आवाज याचा त्रास होण्यामुळे स्थलांतर होते. निद्रानाशासारखे विकार जडतात.5) महापूर - महापुराने नुकसान होण्याचेप्रकार वाढत असून, लोक विस्थापित होतात.6) ज्वालामुखी - ज्वालामुखीमुळे मोठ्या प्रमाणात राख हवेत मिसळते. काहीभागातील शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची उदाहरणे जगभर आहेत. त्यामुळे ज्या भागात ज्वालामुखी होतात, तेथे स्थलांतर होते. तेथील शेती नापिक होते.7) अणुभट्टीद्वारे बाहेर पडणारी राख त्या त्या भागातील हवेत प्रदूषण वाढवते. त्याचा काही लोकांना प्रचंड त्रास होतो. श्वसनाचे आजार वाढतात.9) भटक्या विमुक्त जातींचे स्थलांतर - मेंढपाळ आणि नंदीवाले आणि इतर काही लोकआपल्या चरितार्थासाठी वेगवेगळे व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना स्थलांतर करावे लागते.10) ऊस तोडणी कामगार - काही दुष्काळी पट्ट्यातील लोक बागायत क्षेत्राकडे ऊस तोडणीसाठी आपली गावे सोडून जातात, ते काही कालावधीसाठी दरवर्षी स्थलांतर करतात.
0

स्थलांतर (Migration) म्हणजे लोकांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. हे स्थलांतर अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की चांगले जीवनमान, नोकरीच्या संधी, शिक्षण, नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा राजकीय अशांतता. स्थलांतराचे अनेक चांगले आणि वाईट परिणाम होतात, ज्यांचा समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडतो.

स्थलांतराचे सकारात्मक परिणाम:

  • आर्थिक विकास: स्थलांतरामुळे शहरांमध्ये मनुष्यबळ वाढते, ज्यामुळे उत्पादन आणि सेवा क्षेत्रात वाढ होते.
  • सांस्कृतिक विविधता: वेगवेगळ्या ठिकाणचे लोक एकत्र आल्यामुळे संस्कृतीची देवाणघेवाण होते आणि समाज अधिक सहिष्णू बनतो.
  • ज्ञान आणि कौशल्ये: स्थलांतरित लोक त्यांच्यासोबत नवीन ज्ञान आणि कौशल्ये घेऊन येतात, ज्यामुळे स्थानिक लोकांनाही फायदा होतो.

स्थलांतराचे नकारात्मक परिणाम:

  • शहरांवर ताण: जास्त लोक शहरांमध्ये आल्यामुळे पाणी, वीज, वाहतूक आणि घरांची समस्या वाढते.
  • बेरोजगारी: काहीवेळा स्थलांतरितांमुळे स्थानिक लोकांमध्ये बेरोजगारी वाढू शकते, कारण जास्त लोक नोकरीसाठी स्पर्धा करतात.
  • सामाजिक समस्या: स्थलांतरित लोक नवीन ठिकाणी लवकर रुळू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

स्थलांतर ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. शासनाने स्थलांतरितांसाठी योग्य योजना बनवून त्यांना मदत केली, तर स्थलांतराचे सकारात्मक परिणाम वाढवता येऊ शकतात.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1040

Related Questions

इटलीच्या कोणत्या गावात राहण्यासाठी पैसे व घर दिले जाते?
मॉरिशसमध्ये भारतीय वंशाचे लोक कसे व कधी स्थायिक झाले?
संकल्पना स्पष्ट करा: स्थलांतर?
अंतर्गत स्थलांतर व बहिर्गत स्थलांतर यातील फरक कोणता आहे?
लोक आपले गाव सोडून दुसरीकडे का जात नाहीत याची कारणे कोणती आहेत?
रोहित पक्षी कोणत्या प्रदेशात स्थलांतर करतात?
स्थलांतराची व्याख्या देऊन स्थलांतराची कारणे स्पष्ट करा?