6 उत्तरे
6
answers
यशस्वी होणे म्हणजे नेमकं काय?
7
Answer link
मला वाटत यशस्वी होणे म्हणजे तुम्ही जीवनात जे ध्येय ठरवलं होतं ते गाठने व त्याचा आनंद घेणे,यशस्वी होण्याचा नेम ,फेम,मनी शी काहीही संबंध नाही उदा.कुण्य व्यतिने चित्रकार होन्याचे ध्येय ठरवले होते,आणि तो चित्रकार झाला,कुणी आई होण्याचे स्वप्न पहात असेल तिने ते मिळवले तरी ती यशस्वीच झाली अस म्हणता येईल कारण त्यानी तेच होण्याच निश्चित केल होतं.थोडक्यात सांगायच झाल तर तुम्ही ठरवलेली ध्येय मिळवणे म्हणजेच यशस्वी होणे होय....
"मंजिल तो मिल हि जायेगी भटक कर हि सही। गुंमराह तो वो हैं जो घर से निकले हि नही"
YouTube
"मंजिल तो मिल हि जायेगी भटक कर हि सही। गुंमराह तो वो हैं जो घर से निकले हि नही"
YouTube
6
Answer link
☙यशस्वी होणे म्हणजे काय? कित्येक वेळ मीही विचार करत असतो की यशस्वी नक्की कोण असतो? हार्डवर्क करणारा की स्मार्ट वर्क करणारा? माझ्या मते हार्ड वर्क विथ स्मार्ट वर्क असावे. तसे पाहिले तर आपल्या पुराणामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यानुसार विचार केला तर भारतीय माणसाला अगदी ५००० वर्षांपासून आळशी बनविण्याची जाणूबूजून प्रयत्न केले आहेत असे मला वाटते.. बघाना गणपतीने एक प्रदक्षिणा आईवडिलांना घातली आणि लगेच गणपतीने जगप्रदक्षिणा घातली असे म्हणून त्यांना देवाचादर्जा दिला तर बिचारा कार्तिकेयाने पुण जगभ्रमंती करून थकून भागून आला तरी त्याला अपमानच सहन करावा लागला देवत्व तर दुर त्याला साधा सन्मानही मिळाला नाही......! प्रतिकूल परिस्थितीत शिकून कोणाचे विशेष मार्गदर्शन नसणारा कर्णच बघाना त्याने ईतर सर्वांपेक्षा जास्त ज्ञान मिळवूनही ईतिहासात त्याला दुय्यम दर्जाच मिळाला. तर एकलव्याने लपूनछपून शिक्षण घेऊनही अर्जुनापेक्षा जास्त ज्ञानी व युद्धकौशल झाला तर त्याला ईतिहासात काय स्थान मिळाले तर त्याला जाणूनबुजून अपंग केले केले व त्याची कुशलता नष्ट केली गेली? हे सर्व का? आणि ह्याचा शेवटी परिणाम आपल्या संस्कारांवर झाला असे मी मानतो...! त्याचमुळे म्हणा धाडस करतांना आपल्याला आपले गुरू व आईवडील ह्यांची आठवण येतेआणि शॉर्टकट म्हणून आपण त्यांचा आसरा घेतो नि गणपतीसारखा शॉर्टकट मारून यश मिळविण्याचा विचार करतो असे तर नाही ना?म्हणूननच मला म्हणावयाचे आहे ईतिहास बदला मग पहा देशही बदलेल...! तुमचे काय म्हणणे आहे?
0
Answer link
यशस्वी होणे म्हणजे काय? हा एक मोठा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर व्यक्तिपरत्वे बदलते.
सर्वसाधारणपणे, यश म्हणजे:
- धैर्य: ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे.
- प्रगती: सतत सुधारणा करणे आणि पुढे वाटचाल करणे.
- परिणाम: अपेक्षित परिणाम मिळवणे.
- समाधान: केलेल्या कामाबद्दल आणि साध्य केलेल्या ध्येयाबद्दल समाधान असणे.
यशस्वी होण्याची व्याख्या:
- आत्म-समर्पण: स्वतःला पूर्णपणे कामात झोकून देणे.
- सातत्य: प्रयत्न करत राहणे, हार न मानणे.
- शिकण्याची तयारी: नवीन गोष्टी शिकत राहणे.
- वेळेचे व्यवस्थापन: वेळेचा योग्य वापर करणे.
शेवटी, यश म्हणजे तुमच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे, हे ठरवणे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे.