3 उत्तरे
3
answers
आळंदी देवस्थानाबद्दल माहिती मिळेल का?
4
Answer link
☙आंळदी ☙
आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी खेडच्या ( राजगुरुनगर ) दक्षिणेस वसले आहे. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले,त्यावरून हे नाव पडले. कुबेरगंगा असेही नाव होते. कुबेराने इंद्रायणीच्या काठी धन पुरून ठेवले होते. ज्ञानदेवांच्या पासून पुढे देहूला श्री तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठीच राहिले. तेव्हा ती ज्ञानोबा तुकारामाची"इंद्रायणी" म्हणून आबालवृद्धांच्या तोंडी बसली.साधुहे तीर्थांना तीर्थत्वप्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मुळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे.पौराणिक उल्लेख :-आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. ताम्रपटात'आळंदीस'म्हणून जे उल्लेख सापडतात ते मात्र या आळंदीचे नाहीत.ते थेऊरच्या पूर्वेस असणाऱ्या दुसऱ्या आळंदी चे आहे. तिला चोरांची आळंदी म्हणतात. ही देवाची आळंदी म्हणून प्रसिद्ध आहे.स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या ६४ व्या अध्यायात आळंदीची वरुणा,अलका,कणिका,आनंदवसिद्ध क्षेत्र अशी नावेआली आहे.मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे. ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीही सिद्धेश्वर हे शंकराचे स्थान प्रसिद्ध होते. म्हणून या आळंदीस'सिद्धेश्वर'म्हटले असावे.यादवकालीन उल्लेख :-ज्ञानेश्वर महाराजांच्या देवळाला लागून पश्चिमेस हरिहरेंद्र ह्या नाथपंथीय स्वामींची समाधी आहे. तेथे त्यानंतर देऊळही बांधले आहे.तेथे स्वामींचे पूर्वज गुरुंच्या आणखीसमाधी आहेत. त्यापैकी एका समाधीवरयादव काळातील काही पुसट उल्लेख आढळतात.या समाधीवर चंद्र सूर्य हीकाढले आहेत. सूर्य व चंद्र ही नाथपंथीय चिन्हे आहेत. इतिहासकार यांनी जे संशोधन केले आहे,त्यावरून आळंदी हे गाव मध्ययुगीन ठरते.ऐतिहासिक आळंदी उल्लेख:-अलीकडील काळातील उल्लेख सांगायचाम्हटले म्हणजे शिवाजी महाराजांनीएका सनदेच्या द्वारा आळंदी येथील सव्वा दीडशे वारखे याजिराफ शेताचे १ खंडी २ मण धान्य श्री ज्ञानदेवांकडे देऊन टाकले आहे. आळंदी ही त्यावेळी चाकण प्रांतात समाविस्ट होती. या जमिनीचे व्यवस्थापक रामचंद्र गोसावी हे होते. शके १६१३ मध्ये आळंदी चे कुलकर्णी मोरो भास्कर यांच्या विनंतीवरून राजाराम महाराजांनी समाधीच्या बाबतीत ज्या व्यवस्था केल्या त्या पुढे चालविण्याबद्दलबाळाजी नारायण यांना आज्ञा केलीआहे.शके १६४५ मध्ये बाळाजी जाधव यांनी आळंदी यात्रा केल्याचा उल्लेख आहे शके १६६१ साली श्रीमंतपेशवे यांनी श्रींचे पूजा नैवद्यनंदादीपाचा खर्च अपुरा पडतो म्हणून आळंदी गाव श्रींकडे इनाम करून दिले आहे.देवळासमोर गरुड पाराजवळ एक दीप माल आहे त्यावरील शिलालेख पुसलेला आहे. परंतु त्याचा उल्लेख'कान्होजी आंग्रे'यांच्यापत्नी लक्ष्मिबाई यांनी ती दीपमाळ शके १६६५ मध्ये बांधलीआहे.पेशवे सरकार शके १६७२ व १६७५ मध्ये कार्तिक यात्रेस आले होते. पेशवे सरकारांनी हे गाव ज्ञानेश्वर महाराज संस्थानाला इनाम दिले आहे.त्यातील वसुलापैकी १७२५ रुपये समाधीसाठी खर्च करावा,असे म्हटले आहे.शके १६८१,१६९६ मध्ये पेशवे सरकारांनी यात्रेत रखवालीसाठी माणसे पाठवण्याबद्दल दिलेले हुकुम आढळतात.आळंदीनजीक केळगाव येथील रानात श्री पांडूरंगाश्रम स्वामी यांनी देवालय बांधले व गोपाळकाला करू लागले. तेव्हा गोपाळपुराची वस्ती झाली.हा काळ शके १६७० चे सुमाराचा आहे.आळंदीत प्रवेश करतांना जो दगडी पूल आहे,तो पुण्याच्या ठाकूरदास अग्रवाल नावाच्या श्रीमंत सावकाराने १८२० मध्ये बांधला त्यास ८० हजार रुपये खर्च आला. आता या नदीवर नवीन पूलही बांधला गेला आहे. या पुलावर आल्यावर गावातील देवळांची शिखरे दिसतात.यात्रेकरुंच्या मुखातून'श्री ज्ञानेश्वर महाराज की जय'असेम्हणून नामाचा गजर होतो. दोन्ही हात जोडले जातात आणि मस्तक शिखराच्या दिशेकडे झुकून विनम्र होते.॥अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र,जिथे नांदतॊ ज्ञानराजा सुपात्र॥शुभमंगला इंद्रायणी नदीच्या काठीबसलेले गाव म्हणजे आळंदी.सुमारे ७२५ वर्षापूर्वी इथे एक दिव्य-चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याच परम पावन क्षेत्रांत. त्याच्यां खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत. श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घॆतल्याने,ह्या गावाचे मह्त्व अमर होऊन गेले आहे. गेल्या ७०० वर्षात अनेक संतांच्या आणि ऎतिहासिक घटनांच्या पाऊल खुणा येथे उमटलेल्या आहेत. पौराणिक काळापासून हे गाव प्रसिध्द आहे. इतिहासकार राजवाडे य़ांच्या मते आळंदी हे गाव मध्ययुगातले आहे. इ. स. ७६८ च्या कृष्णराज राष्ट्रकूटांच्या तळेगाव ताम्रपटात आळंदी गावाचा उल्लेख आढळ्तो. इंद्राने पृथ्वीवर येऊन महायाग केला तो इथेच.स्कंद पुराणातील सहयाद्रि खंडाच्या ६४ व्या अध्यायात या गावाची वारुणा,अलका,कर्णीका,आनंद व सिध्दक्षेत्र अशी नावे आलीआहेत. मराठी संतांनी या गावाचे नाव लडीवाळ्पणे अलंकापुरी ठेवले आहे. हरिहरेंद्र स्वामींच्या समाधीवर यादव काळातील उल्लेख सापडतात.श्री शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानदेवांच्या समाधी स्थानास दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज,बाळाजी बाजीराव पेशवे,पहिले बाजीराव वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले. क्षेत्राच्या सौदर्यांत भर पडली. त्यानंतर अनेक धनिकांनी या गावातील वास्तू बांधल्या. इ. स.१८६७ साली येथे नगरपालिका स्थापन झाली.एस.टी. व महानगरपालिका बसेस अनेक ठिकाणांहून या गावी नियमित जात येत असतात. आळंदीस अनेक देशी परदेशी भाविक लोक भेट देतात.ज्ञानेश्वरांची समाधीअनेक ग्रंथ संपदांची निर्मिती केल्यानंतर एके दिवशी आपले अवतारकार्य संपले असून जिवंत समाधी घेण्याचा आपला मनोदय ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे व्यक्त केला. निवृत्तीनाथांना भरून आले. आपल्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान असलेला आपला हा भाऊआपल्यासमोर लहानाचा मोठा झाला. आपल्यासमोर बाबांचा हात पकडून धुळपाटीवर मुळाक्षरे गिरवलेल्या या ज्ञानाने बघता बघता भगवतगीतेवर टीका करणारा अजरामर असा ग्रंथ लिहिला. लोकांनी प्रेमापोटी ज्ञानदेवाला ज्ञानेश्वर माऊली केलं आणि या वेडयाने मात्र सारं कर्तुत्व आपल्यावर ओवाळून टाकले. निवृत्तीनाथांचे डोळे भरुन आले. त्यांच्यातला ज्ञानाचा नाथदादा जागा झाला. आपला हा लाडका छोटा भाऊ,आपला हा लाडका शिष्य आपल्याला कायमचा सोडून जाणार या जाणिवेने निवृत्तीनाथ गहीवरले. भावनांना आवर घातला आणि जड अंतकरणाने आपल्या लाडक्या ज्ञानाला समाधी घेण्यास परवानगी दिली.ज्ञानेश्वरांची समाधी हे आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर आळंदीचे प्रवेशद्वार मानले जाते. अमृतानुभव लिहुन झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी काही काळ आळंदी येथील एका गुहेत व्यतीत केला. नंतर याच गुहेत त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्या जागी मंदीर बांधून आता सर्व वारकऱ्यांसाठी आळंदी हे तिर्थक्षेत्र झाले आहे. अमृतानुभव लिहून संपल्यानंतर ज्ञानदेव उत्तर भारतात संत नामदेवांबरोबर गेले. तेथे धार्मिक कार्य केल्यानंतर त्यांना आपल्या जन्माचे लक्ष्य साध्य झाल्याचे जाणवले. त्यांनी समाधी घेण्यची इच्छा व्यक्त केली.शके १२१८ मध्ये कार्तीक पक्षाच्या त्रयोदशी दिवशी ज्ञानेश्वरांनी समाधी अवस्थेत प्रवेश केला. या पुर्ण प्रसंगाचे वर्णन अभंग रुपात संग्रहित केले आहेत. हे अभंग नामदेवांनी लिहीले असून’समाधीचे अभंग’या नावाने ते प्रसिद्ध आहे.

2
Answer link
महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे.
आळंदी घाट
आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. (चित्र पहा.)
ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७०(की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते.
आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे १५० किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
Its not my own information..its take from Wikipedia.

0
Answer link
आळंदी देवस्थान हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. येथे संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे, त्यामुळे या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
इतिहास:
- आळंदी हे ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान नाही, परंतु त्यांची समाधी येथे आहे.
- ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या २१ व्या वर्षी १२९६ मध्ये येथे समाधी घेतली.
- दरवर्षी लाखो भाविक ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आळंदीला भेट देतात.
मंदिराची रचना:
- आळंदीतील ज्ञानेश्वर मंदिराची रचना साधी असून ती भाविकांना शांती आणि भक्तीचा अनुभव करून देते.
- मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांची सुंदर मूर्ती आहे.
- मंदिराच्या परिसरात अनेक लहान मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत.
उत्सव आणि सोहळे:
- आळंदीमध्ये वर्षभर अनेक उत्सव आणि सोहळे साजरे केले जातात, ज्यात ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी (समाधी दिन) सर्वात महत्त्वाचा आहे.
- या सोहळ्यात महाराष्ट्रभरून लाखो भाविक आळंदीत येतात.
- आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला सुद्धा येथे मोठी यात्रा भरते.
आळंदीला कसे जायचे:
- आळंदी पुणे शहराच्या जवळ आहे आणि येथे जाण्यासाठी अनेक सोपे मार्ग आहेत.
- पुणे विमानतळ सर्वात जवळचा विमानतळ आहे.
- पुणे आणि मुंबईहून आळंदीसाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहे.
आळंदी हे एक पवित्र आणि ऐतिहासिक शहर आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमुळे या স্থানের মাহাত্ম্য আরও বেড়েছে।
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: