मंदिर हिंदु धर्म तीर्थक्षेत्र धर्म

कुलदेवतेचे नाव व त्याचे मंदिर कसे शोधावे?

2 उत्तरे
2 answers

कुलदेवतेचे नाव व त्याचे मंदिर कसे शोधावे?

1




कुलदैवता कोण आपली ?
 आम्हाला आमची कुलदेवता माहीत नाही किंवा मूळ गाव माहीत नाही.त्यामुळे मूळ पुरुष कसा शोधावा?? 
        या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्याआधी सर्वप्रथम जाणून घ्या की मूळपुरुष म्हणजे कोण?? मुळपुरुष म्हणजे तो पुरुष ज्याने आपल्या कुळाची रचना केली. आपल्या कुळाची वंशवेल ज्या पुरुषा पासून तयार झाला. आणि ज्याने तो राखून ठेवला तो पुरुष. म्हणजेच तुमच्या कुळाची पहिली व्यक्ती ज्याने साधना करून देवी ला प्रसन्न केलं .ज्या देवी ची त्याने उपासना केली ती त्या मूळपुरुषची देवी म्हणजेच आपली कुलदेवता. 
         जेव्हा तुम्ही अडचणीत असता. तुम्हाला जे काही हवं असत. तुम्ही देवाकडे जे जे मागता.तुमची गाऱ्हाणी थेट देवी ऐकते असे नाही. तर तुमची स्वर्गवासी झालेली पितरगत ही तुमची अडचण मूळपुरुष कडे मांडतात. तुमच्या इच्छा आकांशा मूळपुरुषाकडे व्यक्त करतात.सुख समृद्धी ची मागणी करतात.की माझ्या लेकराला नोकरी दे,आयुष्य दे, संतती दे, सुख दे. त्या प्रमाणे मूळ पुरुष तुमची सर्व गाऱ्हाणी देवी समोर मांडत असतो.आणि जेव्हा मूळपुरुष तुमची गाऱ्हाणी ऐकायचं आणि देवी पर्यंत पोहोचवायचा बंद करतो तेव्हा तुम्ही त्रासात पडता. म्हणून पितृ दुःखी तर मूळपुरुष दुःखी.आणि जर मूळपुरुष दुःखी तर कुलदेवी दुःखी.
  
कुलदेवी कोण???? साडेतीन शक्ती पीठ आहेत त्या पैकी एक देवी म्हणजे आपली कुलदेवी. कोल्हापूरच्या अंबाबाईचे, तुळजापूरच्या तुळजाभवानीचे आणि माहूरच्या रेणूकादेवीचे मंदिर अशी ही तीन पूर्ण पीठे तर सप्तःशृंगीचे हे अर्ध पीठ आहे. नावे अनेक असतील पण स्वरूप मात्र एक असत.
पहीली संपूर्ण भारताचे आराध्य दैवत व महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापुरची ’भवानी माता“ भव म्हणजे शंकर व भवानी म्हणजे पार्वती भारतात भवानीची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत व त्या ठिकाणी विविध नावांनी भवानी प्रसिद्ध आहे. त्यापैकी काही नावे उमा, गौरी, काली, कात्यायनी, हैमावतीधरी, शिवा, भवानी, रुद्राणी, शर्वाणी, सर्व मंगला, अपर्णा, पार्वती, दूर्गा, मृडानी, चंडिका, अंबिका, आर्या, दाक्षायणी, चैव, गिरीजा, मेनकात्मजा.सातेरी,माऊली,

 सप्तशृंगीदेवी -
वणी (नाशिक)
सप्तशृंगगडावर दुर्गा अठराभुजाधारी अवतिर्ण झाली आहे. हे साडेतीन पैकी ½ पिठ असून महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीचे ओंकाररुप समजण्यात येते.
अंबाबाई (ब्रम्हमाया) -
कोल्हापुर ः-
महालक्ष्मी ही आदीशक्ति महामाया जगदंबा ह्या नावाने प्रसिद्ध आहे. जगाच्या उद्धारासाठी व दृष्टांच्या संहारासाठी वेळोवेळी अवतार घेऊन अवघ्या जगाला सुखी करणारी आदिशक्ती भुवनेश्वरी महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर येथे आहे.
रेणुका/ येल्लुआई/ येल्लम्मा,
ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला "संपूर्ण जगाची आई" किंवा "जगदंबा" मानतात.

यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. खाली चित्रात दाखविलेले मंदिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर या गावाजवळील गडावर आहे.
 मांढरगड येथील काळुबाई. कालीका देवीच्या भक्तांसाठी देवीने या ठिकाणी अवतार घेतला म्हणून ह्या कालिकामातेला मांढरची काळूबाई म्हणतात.

जर मूळ गाव चा विसर पडला किंवा माहीत नसेल तर??? 
      मूळ गाव मूळ घर माहीत नसेल तरी हरकत नाही पण जिथे तुम्ही राहता त्या घरी तुमचा वास्तू पुरुष हवा.जिथे वास्तूपुरुष तिथे मूळ आणि जिथे मूळ तिथे कुळ. मूळपुरुष हा सदैव अंश रुपी आपण जिथे राहतो तेथेच असतो. त्याच्या कृपा छाये मुळे आपण जगत असतो. 
   एक तप म्हणजेच बारा वर्ष. बारा वर्षे कोठेही वास्तव्य केल्यास तिकडच्या ग्रामदेवते कडे आपली कुलदेवता एकरूप होते. आपला मूळपुरुष त्या सद्य स्थिती च्या ग्रामदेवते जवळ असतो.फक्त ज्या गावात किंवा शहरात तुम्ही राहता त्या घरी तुमचा वास्तूपुरुष हवा. त्यामुळे ज्यांना आपली कुलदेवता आणि गाव माहीत नाही अशा साधकांनी घाबरू नये. फक्त साडेतीन शक्ती पीठतील कोणत स्वरूप आपली देवी आहे याचा अभ्यास करावा. तिच्या नावाने ग्रामदेवी कडे सेवा करावी.  

मूळपुरुष कोठे व कसा शोधावा??
काही लोकांच्या घरी पूजेला देवांचे टांक किंवा छाप(पतव)असतात.
तिथेच मूळपुरुष वावरत असतो. ही टाक कुणाजवळ नसेल त्यानी आपल्या कुलदेवीच्या नावाने घट(कलश) स्थापन करावा. तो घट म्हणजे साक्षात आपली कुलदेवता. तिची रोज सेवा करावी. जेव्हा कुळाचा तुमच्या वरचा राग कमी होईल तेव्हा मूळपुरुष स्वतः घरच्या कोणी योग्य पुरुष अथवा सुहासिनी स्त्री ला स्वप्न दृष्टांत देऊ शकतो.आपल्या कुळाचा आकार दाखवू शकतो.आपल्या कुलदेवतेचे स्वरूप दाखवू शकतो.किंवा अशा व्यक्ती ला समोर आणून उभं करू शकते जे तुम्हला तुमचं कुलाचार कोठे आहे? कसा आहे ? हे सांगू शकतो. त्या घटा (कलश)समोर डोळे बंद करून नामस्मरण आणि सेवा जरी केली तरी तुमच्या देवी च स्वरूप समजू शकत.
महिषासुर मर्दिनी दिसली तर भवानी , अठरा भुजा दिसली तर सप्तशृंगी, हिरवी साधी आणि तेजस्वी चेहरा दिसला तर महालक्ष्मी, रौद्र स्वरूपात दिसली तर काली, त्याशिवाय रेणुका कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने तुम्हाला दर्शन देऊ शकते.
  घट( कलश) कसा स्थापन करावा या संबंधी आपण आपल्या ब्राम्हण चे मार्गदर्शन घ्या. (स्थापन करताना चुकी चे शालन करण्यासाठी 7 विडे, 5 तुळशीपत्र आणि दातात गवताची काडी घ्यावी) आपल्या पूर्वजांकडे चूक मागावी. मूळ पुरुषकडे मार्गदर्शन मागावे. सद्य ग्रामदेवी ला आपली कुलदेवी समजून आपली सेवा चालू ठेवावी.( वरील उपाय योग्य व्यक्ती अथवा आपल्या गुरू ना विचारून करावे. ) 


कृपया उत्तर नीट व्यवस्थित वाचा ज्यांना कुलदेवता माहिती नाही  गाव माहिती नाही आणि गावांमध्ये राहून हि त्यांची कुलदेवता आणि मंदिर माहिती नसेल तर सर्वांनीच वाचा उपयोग होईल कारण पुजा विवाह सोहळा इतर देवांच्या कार्यक्रमात कुलदेवता गोत्र विचारले जातं
     
उत्तर लिहिले · 19/5/2022
कर्म · 53710
0

कुलदेवतेचे नाव आणि तिचे मंदिर शोधण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता:

  1. घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधा:

    घरातील वयस्कर व्यक्तींना तुमच्या कुलदेवतेबद्दल माहिती असू शकते. ते तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचे नाव, मंदिर आणि परंपरेबद्दल माहिती देऊ शकतात.

  2. जुनी कागदपत्रे आणि नोंदी तपासा:

    घरातील जुनी कागदपत्रे, जसे की पूजा-अर्चाची पुस्तके, धार्मिक विधींची नोंदवही किंवा जमिनीच्या नोंदी तपासा. यांमध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवतेबद्दल माहिती मिळू शकते.

  3. कुलवृत्तांत (Family Tree) तपासा:

    कुलवृत्तांतामध्ये तुमच्या पूर्वजांची माहिती दिलेली असते. त्यात तुमच्या कुलदेवतेचा उल्लेख असण्याची शक्यता आहे.

  4. ऑनलाइन शोध:

    आजकाल इंटरनेटवर अनेक माहिती उपलब्ध आहे. तुम्ही Google search engine चा वापर करून तुमच्या आडनावावरून कुलदेवतेची माहिती शोधू शकता. उदाहरणार्थ, "मराठी आडनावानुसार कुलदैवत" किंवा "Your surname Kuldaivat" असे सर्च करा.

  5. मंदिरांना भेट द्या:

    महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध कुलदेवतांची मंदिरे आहेत. तिथे भेट देऊन तुम्ही माहिती मिळवू शकता.

  6. गावातील जाणकार व्यक्ती:

    तुमच्या मूळ गावी जाऊन तेथील जाणकार व्यक्ती किंवा गावकऱ्यांकडून तुमच्या कुलदेवतेबद्दल माहिती मिळवा.

  7. सामाजिक संस्था आणिDatabase:

    आजकाल काही सामाजिक संस्थांनी Database बनवले आहेत, जसे की Kuldaiwat.com. त्यांच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही माहिती मिळवू शकता.

या उपायांनी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचे नाव आणि मंदिर शोधण्यात मदत होईल.

टीप: कुलदेवतेची माहिती मिळवणे ही एकresearch process आहे. त्यामुळे तुम्हाला त्वरित माहिती नाही मिळाली तरी निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा.


उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

देवाचे गुरू बृहस्पति यांचे मंदिर कोठे आहे?
कामाख्या देवीचे वैशिष्ट्य काय आहे?
बोलणारी देवीची मूर्ती कोठे आहे?
दक्षिण काशी कोणत्या तीर्थक्षेत्राला म्हणतात?
आजोळचा मंदिर अजून आहे का?
श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कोठे आहे?
जोतीबा देवस्थान बद्दल माहिती द्या?