भूगोल सामान्य ज्ञान कुतूहल दिनविशेष खगोलशास्त्र

फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस का असतात?

5 उत्तरे
5 answers

फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस का असतात?

24
महिन्यांचा इतिहास खूप जुना आणि गुंतागुंतीचा आहे. सध्याचे कॅलेंडर हे रोमन कॅलेंडर पासून प्रेरित झालेले आहे. इसवी सन पूर्व रोमन कॅलेंडरमध्ये फक्त १० च महिने होते. आणि महिने मार्च पासून डिसेंबर पर्यंतच होते. डिसेंबर ते फेब्रुवारी थंडी खूप असल्याने त्या दिवसात कुठलेच कामे होत नसायची आणि शेवटचे ६० दिवस डिसेंबर मधेच जोडले जायचे.


नंतर रोमन राज्यकर्त्यांनी यात सुधार केला. आणि डिसेंबर नंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने टाकण्यात आले. अशा पद्धतीने फेब्रुवारी हा शेवटचा महिना झाला. आणि शेवटी उरलेले दिवस फेब्रुवारी मध्ये टाकण्यात आले. त्यावेळेस फेब्रुवारीत २८च दिवस उरले.

नंतर ज्युलियस सीजर या रोमन राजाने प्रथा बदलून जानेवारीपासून वर्षाची सुरवात केली. पण फेब्रुवारीमधील दिवसांची संख्या मात्र तीच राहिली. नंतर काही भौगोलिक कारणांनी लीप वर्षात एक दिवस जास्त असतो हा शोध लागला.  हा दिवस अड्जस्ट करण्यासाठी सोयीस्कर महिना फेब्रुवारी सापडला कारण यात आधीच कमी दिवस होते. म्हणून लीप वर्षी फेब्रुवारी २९ दिवसांचा असतो.

खालील व्हिडीओ मध्ये आणखी डिटेल्स तुम्ही पाहू शकता:

उत्तर लिहिले · 2/3/2017
कर्म · 283320
8
🧐
सध्याचे कॅलेंडर हे रोमन कॅलेंडर पासून प्रेरित झालेले आहे. इसवी सन पूर्व रोमन कॅलेंडरमध्ये फक्त 10 च महिने होते. मार्चपासून डिसेंबर पर्यंतच महिने होते.

👉 डिसेंबर ते फेब्रुवारी थंडी खूप असल्याने त्या दिवसात कुठलेच कामे होत नसायची आणि शेवटचे 60 दिवस डिसेंबरमध्येच जोडले जायचे.

👉 काही कालावधीनंतर रोमन राज्यकर्त्यांनी यात सुधार केला आणि डिसेंबर नंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने टाकण्यात आले.

👉 यानुसार फेब्रुवारी हा शेवटचा महिना झाला आणि शेवटी उरलेले दिवस फेब्रुवारीमध्ये टाकण्यात आले. त्यावेळेस फेब्रुवारीत 28च दिवस उरले.

👉 नंतर ज्युलियस सीजर या रोमन राजाने प्रथा बदलून जानेवारीपासून वर्षाची सुरुवात केली. पण फेब्रुवारीमधील दिवसांची संख्या मात्र तीच राहिली. नंतर काही भौगोलिक कारणांनी लीप वर्षात एक दिवस जास्त असतो हा शोध लागला.

👉 हा दिवस अॅडजस्ट करण्यासाठी सोयीस्कर महिना फेब्रुवारी सापडला कारण यात आधीच कमी दिवस होते. म्हणून लीप वर्षी फेब्रुवारी 29 दिवसांचा असतो.
उत्तर लिहिले · 8/12/2019
कर्म · 2660
0

फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असण्याचे कारण खालीलप्रमाणे आहे:

  1. रोमन कालगणना: प्राचीन रोमन साम्राज्यात, सुरुवातीच्या काळात फक्त १० महिन्यांचे वर्ष होते. ते वर्ष मार्चमध्ये सुरू होऊन डिसेंबरमध्ये संपत असे. त्यानंतर, राजा नुमा पॉम्पिलियस (Numa Pompilius) याने जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने वर्षात जोडले.
  2. दिवसांची संख्या: नुमा पॉम्पिलियसला सम संख्या अशुभ वाटत असल्याने त्याने प्रत्येक महिन्याला विषम সংখ্যক दिवस ठेवले. पण वर्षाचे गणित जुळवण्यासाठी एका महिन्याला सम दिवस ठेवणे आवश्यक होते, त्यामुळे फेब्रुवारीला २८ दिवस ठेवले गेले.
  3. लीप वर्ष (Leap Year): जुलियस सीझरने (Julius Caesar)calendar मध्ये सुधारणा केल्या आणि लीप वर्षाची (Leap Year) संकल्पना आणली. पृथ्वीला सूर्याभोवती প্রদক্ষিণ করতে लगभग 365.25 दिवस लागतात. त्यामुळे दर ४ वर्षांनी फेब्रुवारीमध्ये एक दिवस वाढवला जातो, ज्यामुळे वर्षातील दिवसांचे गणित जुळते. त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात.

त्यामुळे, फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असणे ही एक ऐतिहासिक आणि खगोलशास्त्रीय घटना आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5180

Related Questions

सूर्यमालेत किती ग्रह आहेत?
कोठा म्हणजे काय?
खोली म्हणजे काय?
पूळन म्हणजे काय?
सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता?
सूर्यमालेतील ग्रह क्रमाने लिहा?
मध्यरात्र कशाला म्हणतात?