केस गळती कशी रोखावी व केस काळे करण्याचे घरगुती उपाय काय आहेत?
केस गळती कशी रोखावी व केस काळे करण्याचे घरगुती उपाय काय आहेत?
_________________
आजकाल केस पांढरे होण्यासाठी वयाची मर्यादा राहिलेली नाही. प्रदूषण, बदललेली जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वेळा यामुळे केस वेळेआधीच पांढरे होतात. पण सफेद केस लपवण्यासाठी लोक अनेक केमिकल्स आणि ट्रीटमेंटची मदत घेतात. पण पैसे खर्च न करता सफेद केस काळे करण्याचा हा सोपा उपाय माहित आहे का? मग जाणून घ्या...
*सोपा उपाय*
केस काळे करण्यासाठी एका गोष्टीची गरज असते आणि ती आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होते. आपल्या सर्वांच्या घरात चहापावडर असतेच. यात टॅनिक अॅसिड असते त्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. यासाठी ६ चमचे चहापावडर ३० मिनिटे पाण्यात उकळवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यावर केसांना लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात कॉफीही मिसळू शकता.
केस काळे करण्याबरोबरच चहापावडरच्या पाण्याचे इतर अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया...
👉🏻 केसगळती कमी होण्यास मदत होते.
👉🏻 केसांची वाढ उत्तम होते.
👉🏻 केसांचा कोरडेपणा, रफनेस दूर होतो.
👉🏻 निस्तेज केस चमकदार, मुलायम होण्यास मदत होते.
केस गळणे समस्या / उपाय
===================
नवीन केस येण्यासाठी उपाय काय?केस का गळतात?केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय सांगा !केस जाड होण्यासाठी काय करावे ?केस पांढरे आहे ,उपाय काय ? केसातील कोंडा उपाय? केस वाढवण्यासाठी काय करावे ?केस वाढीसाठी उपाय?
असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात
बदलती लाइफ स्लाइल आणि खाणे-पिणे हे अनेक समस्यांचे कारण आहे. जेव
णात मसाल्याच्या पदार्थांचा जास्त उपयोग, अशुध्द तेल, भेसळयुक्त खाद्य पदार्थ आणि प्रदूषणामुळे आरोग्यासबंधीत अनेक समस्या निर्माण होत आहेत.
Loading...
या कारणामुळे आपल्याला केसांसंबधीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे डेंड्रफ, हेयर फॉल, दोन तोंडी केस या समस्या उद्भवत आहे.
Loading...
हीच समस्या दूर करण्यासाठी काही हर्बल उपाय सांगत आहोत, ज्याचा वापर केल्याने तुमच्या केसांच्या समस्या दूर होतील…
*लिंब
अवेळी पांढ-या होणा-या आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी पातालकोटचे अदिवासी लिंबाचा वापर करतात.
ते लिंबाच्या बीयांपासुन तेल तयारा करतात, ते तेल रात्री डोक्याला लावुन सकाळी डोके धुतात.
एक महिना नियमित लिंबाच्या तेलाचा वापर केल्याने केस गळीत थांबते. डँड्रफ झाल्यावर 100 मिली खोब-याच्या तेलात 20 ग्राम लिंबाच्या बियांचे चुर्ण चांगल्या प्रकारे मिसळा.
या तेलाने आठवड्यातुन दोन दिवस केसांची मसाज केल्याने कोंडा कमी होतो.
*अमरवेल
अमरवेलाचा रस काढा आणि एक आठवडा हे केसांना नियमित लावा. डँड्रफ नष्ट होईल आणि केस गळती थांबेल.
मानले जाते की, आंब्याच्या झाडावरील अमरवेल पाण्यात उकळुन त्या पाण्याने स्नान केल्याने टकलेपणाची समस्या दूर होते.
*जास्वंद
जास्वंदाच्या फुलांना बारीक करा आणि अंघोळीच्या 10 मिनिट अगोदर हे डोक्यांच्या त्वचेवर घासा. हे केसांना काळे करण्यास मदत करते. सोबतच कंडीशनरचे काम करते.
*शेवगा किंवा मुळा
याच्या पानांना कुस्करुन याचा रस तयार करा. हा रस अंघोळी अगोदर केसांवर लावा. हे केसांतुन कोंड्याची समस्या नष्ट करते. या रसाचा वापर कमीत कमी एक आठवडा करावा.
शेवग्याच्या शेंगांना उकळुन पल्प तयार करा. डोके धुताना या पल्पचा वापर शाम्पू प्रमाणे करा.
हे बाजारातील एखाद्या व्हिटॅमिन र्ई युक्त शाम्पूपेक्षा चांगले आहे.
*जटामासी
जटामासीच्या मुळांना खोब-याच्या तेलात उकळुन घ्या. थंड झाल्यानंतर हे बॉटलमध्ये भरुन ठेवा.
रोज झोपण्याअगोदर या तेलाने मालिश करा. अवेळी पांढ-या होणा-या केसांची समस्या दूर होईल.
*कन्हेर
कन्हेराची पाने दुधात कुस्करून केसांना लावल्याने केस गळती थांबते. सोबतच अवेळी पांढ-या होणा-या केसांची समस्या दूर होते.
*प्राजक्त
प्राजक्ताची पाणे आणि बीजांचे चूर्ण तेलात मिळवुन रोज रात्री झोपताना मालिश करा. केस दाट होतील.
*तिळ
तिळाच्या तेलाने केसांची मालिश करणे चांगले असते. तिळाच्या तेलात थोड्या प्रमाणात गायीचे तुप आणि अमरवेलचे चूर्ण मिळवा. रात्री झोपण्याअगोदर हे तेल लावा. नियमित असे केल्याने केस चमकदार आणि सुंदर होतील.
*बहेडा
याच्या बीजांच्या चूर्णला खोब-याच्या किंवा जैतुनच्या तेलात मिळवुन कोमट करा आणि केसांची मसाज करा. असे केल्याने केस चमकदार होतात. सोबतच केसांची मुळे मजबूत होतात. अदिवासी जानकारांच्या मते केसांच्या समस्येसाठी त्रिफळाचे सेवन हितकारक मानले आहे.
*मेथी
मेथीच्या भाजीचे सेवन निरोगी केसांसाठी फायदेशीर मानले जाते. मेथीच्या बीयांचे चुर्ण तयार करुन पाण्यासोबत मिळवुन पेस्ट बनवा. ही पेस्ट अर्धा तास केसांवर लावुन ठेवा. हा उपाय केल्याने केसांमधील डँड्रफ नष्ट होतो. आठवड्यातुन कमीत कमी दोन दिवस असे करावे.
*टोमॅटो
पिकलेले टमाटे कुस्करुन केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. अंघोळीच्या 15 मिनिट अगोदर असे करणे फायदेशीर असते.
*झेंडू
झेंडूच्या फुलांना कुस्करुन खोब-याच्या तेलात मिळवा. डोक्यात झालेली कोणत्याही प्रकारचे सक्रमन, फोडं दूर करण्यासाठी ह मदत करते.
*ऐरंडी
ऐरंडीच्या बीयांच्या वापराने केस काळे होतात. आठवड्यातुन दोन वेळा हे केसांना लावल्याने फायदा होते.
कमी वयात केस गळणे हे सर्वांसाठी तनाव आणि चिंतेचे कारण असते. केस गळण्याची समस्या जर अनुवांशिक असेल तर त्याला एंड्रोजेनिक एलोसेसिया म्हटले जाते.
अशा वेळी केस गळण्याची समस्या ही किशोरावस्थेपासुनच असु शकते. तर महिलांमध्ये ही समस्या 30 वर्षांनंतर निर्माण होते.
याव्यतिरिक्त खाणे-पिणे, पर्यावरण प्रदुषण आणि औषधींच्या रिअॅक्शन किंवा अशा अनेक कारणांमुळे टक्कल पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर ही समस्या दूर करण्याचे काही घरगुती उपाय आज सांगणार आहोत.
जटामांसीला खोब-याच्या तेलात उकळुन घ्या. हे तेल थंड करुन एखाद्या बॉटलमध्ये भरा. रोज रात्री झोपण्याअगोदर या तेलाने मालिश करा. केसांचे अवेळी गळणे आणि पांढरे होणे दूर होईल.
मीठाचे अधिक सेवन केल्यानेही टक्कलपणा येतो. मीठ आणि मीरे पावडर एक-एक चमचा आणि पाच चमचे खोब-याचे तेल मिक्स करा. हे टक्कल असलेल्या ठिकाणी लावा. असे केल्याने केस पुन्हा येतील.
कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकुन पेस्ट बनवा. अंघोळी अगोदर ही पेस्ट डोक्यावर लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या. काही दिवसांनंतर केस गळण्याची समस्या दूर होईल.
आवळ्याचे चुर्ण दह्यात मिळवा. ही पेस्ट हलक्या हातांनी केसांच्या मुळांना लावा. एका तासानंतर हे धुवून घ्या. आठवड्यातुन दोन वेळा नियमित असे केल्यास केस गळती कमी होईल.
दोन लीटर पाण्यात थोडा आवळा टाका आणि लिंबाचे पाने टाकुन पाणी उकळुन घ्या. आठवड्यातुन एक वेळा या पाण्याने केस धुवा. केस गळती थांबुन जाईल.
जर तुम्ही मादक पदार्थांचे सेवन किंवा धू्म्रपान करत असाल तर ते कमी करा. केस गळणे लवकर कमी होईल. जास्तित जास्त पाणी प्या. चहा-कॉफीचे सेवन कमी करा.
मोहरीच्या तेलात मेहेंदीची पाने टाकुन गरम करा. हे थंड करुन केसात लावा. नियमित हे लावल्याने केसांचे गळणे कमी होईल.
रात्री मेथीचे बीज पाण्यात भीजवा आणि हे सकाळी बारीक करुन केसांवर लावा. एका तासांनंतर केस धुवून घ्या. असे केल्याने काही दिवसात नवीन केस येतील.
खोब-याच्या तेलात कापूर मिळवा. केस धुन्याच्या एक तास अगोदर हे केसांना चांगल्या प्रकारे लावा. केस गळती थांबेल.
1 शिकाकाईच्या बीयांना पाण्यात टाकुन पेस्ट बनवा. ही पेस्ट रात्रभर तशीच राहु द्या. सकाळी ही पेस्ट केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. हे नॅचरल शाम्पूचे काम करते. याचा वापर केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. सोबतच केस निरोगी आणि चमकदार होतात.
अमरवेलला बारीक करुन त्याचा रस काढा. हा रस तिळाच्या तेला टाकुन उकळुन घ्या. जोपर्यंत पुर्ण रस तेलात मिक्स होत नाही तोपर्यंत तेल उकळा. रोज रात्री झोपण्याअगोदर हे तेल केसांना लावा. यामुळे टक्करपणाची समस्या दूर होते आणि केस सिल्की होतात.
मेथीच्या भाजीचे जास्त सेवन केसांसाठी चांगले मानले जाते. मेथीचे दाने रात्री पाण्यात भीजवा. सकाळी याची पेस्ट बनवुन घ्या. ही पेस्ट केसांमध्ये लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातुन दोनवेळा असे केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते.
झेंडूच्या फुलांना बारीक करुन त्याचा रस काढा. हा रस खोब-याच्या तेलात मिळवुन उकळुन घ्या. यानंतर हे तेल थंड करुन बॉटलमध्ये भरुन ठेवा. असे केल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल.
ऑलिव्ह ऑइल थोडे गरम करा. या तेलात बहेडा चूर्ण टाका. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. एक तासांनंतर केस धुवून घ्या. केस दाट होतील.
जास्वंदाच्या फुलांचा रस काढा. या रसाने केसांची मसाज करा. एका तासांनंतर केस धुवून घ्या. केस दाट, काळे आणि मजबूत होतील.
मेथी नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते. यात अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट हे गुण असतात. केसांच्या वाढीसाठी हे गुण अतिशय उपयुक्त असतात. मेथीमुळे केस गळणे कमी होते. मेथीची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवा.
कडुनिंबामध्ये अँटीबायोटिक, अँटी फंगल, जखम भरुन काढण्यासारखे गुण असतात. केसांशी संबंधित अनेक समस्यांवर कडुनिंब फायदेशीर ठरतो. केसांच्या त्वचेला खाज येत असेल तर त्यावर कडुनिंबाच्या वापराने फायदा मिळतो. कडुनिंबाची पाने आणि साल एकत्रित वाटून केसांना लावा. यामुळे केसांची योग्य वाढ होईल.
आवळ्यामध्ये व्हिटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे कोलॅजन वाढीस मदत होते. कोलॅजनमुळे केस वाढतात. आवळ्याची पावडर पाण्यात मिक्स करुन केसांच्या मुळांना लावा. अर्धा तास तसेच ठेवा. थंड पाण्याने केस धुवा.
*(वरील माहिती संकलित आहे)
केस गळती रोखण्यासाठी आणि केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे:
- तेल मालिश: नियमितपणे केसांना तेल लावल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि केस मजबूत होतात.
तेल: खोबरेल तेल, बदाम तेल, एरंडेल तेल (castor oil) वापरू शकता.
कसे करावे: तेल थोडे गरम करून केसांच्या मुळांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तेल तसेच ठेवा आणि सकाळी धुवा.
- आवळा: आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस मजबूत होतात आणि गळती कमी होते.
कसे करावे: आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर केसांना लावा.
अधिक माहितीसाठी हे पहा. - मेथी: मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक ऍसिड असते, जे केस गळती रोखण्यास मदत करतात.
कसे करावे: मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर धुवा.
संशोधन पहा. - कांद्याचा रस: कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केस गळती कमी होते.
कसे करावे: कांद्याचा रस काढून केसांना लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा.
अधिक माहितीसाठी - कोरफड (Aloe vera): कोरफड केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो आणि केस गळती थांबते.
कसे करावे: कोरफडीचा गर (gel) केसांना लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा.
- आवळा आणि মেহেंदी: आवळा आणि মেহেंदी एकत्र लावल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होतात.
कसे करावे: आवळा पावडर आणि মেহেंदी एकत्र मिसळून केसांना लावा आणि 2-3 तासांनंतर धुवा.
- नारळ तेल आणि लिंबू: नारळ तेल आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने केस काळे होतात.
कसे करावे: 2 चमचे नारळ तेल आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळून केसांना लावा आणि 1 तासानंतर धुवा.
- चहा किंवा कॉफी: चहा किंवा कॉफीच्या पाण्याने केस धुतल्याने केसांना नैसर्गिक रंग येतो.
कसे करावे: चहा किंवा कॉफी उकळून थंड करा आणि त्या पाण्याने केस धुवा.
- कढीपत्ता: कढीपत्ता केसांसाठी खूप चांगला असतो. कढीपत्त्यामुळे केस काळे आणि मजबूत होतात.
कसे करावे: कढीपत्त्याची पाने तेलात उकळून ते तेल केसांना लावा किंवा कढीपत्त्याची पेस्ट केसांना लावा.
इतर महत्वाचे उपाय:
- आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. आहारात प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन आणि खनिजे भरपूर असावीत.
- तणाव कमी करा: तणावामुळे केस गळती वाढू शकते, त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
- पुरेशी झोप घ्या: दररोज 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
हे सर्व उपाय घरगुती आहेत आणि त्यांचे परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.