2 उत्तरे
2
answers
स्टेनोच्या कोर्सला महत्त्व आहे का?
16
Answer link
Steno म्हणजे Stenographer. स्टेनोग्राफर हा असा पेशा आहे ज्यात शब्दांचे सांकेतिक भाषेत भाषांतर केले जाते. आणि हीच सांकेतिक भाषा परत मूळ स्वरूपात बदलली देखील जाते. बऱ्याचदा हे भाषांतर २०० शब्द प्रति मिनिट इतक्या जास्त वेगाने देखील करावे लागते.
याला महत्व आहे का ?
आजमितीला तरी कुठलेही तंत्रज्ञान इतके विकसित झालेले नाही कि भाषांतर एखादे मशीन करू शकेल. त्यामुळे स्टेनोग्राफर व्यक्तीला कायम मागणी राहते.
कुठे नोकरी मिळू शकते ?
१. कोर्ट
२. प्रेस मिटींग्स
३. सरकारी कार्यालये
४. एखाद्या कंपनीच्या CEO चा सेक्रेटरी किंवा असिस्टंट
स्टेनोग्राफरचे कौशल्य जर चांगले असेल तर बऱ्याचदा महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतदेखील त्यांचा सहभाग करून घेतात आणि बऱ्यापैकी कमाई यातून तुम्ही करू शकता.
स्टेनोग्राफर होण्यासाठी काय करावे हे खालील लिंक वर तुम्ही पाहू शकता:
0
Answer link
स्टेनो (Steno) कोर्सला नक्कीच महत्त्व आहे. आजकाल अनेक सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये कुशल स्टेनोग्राफरची मागणी असते.
स्टेनो कोर्सचे फायदे:
- नोकरीच्या संधी: सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात स्टेनोग्राफर, पर्सनल असिस्टंट (Personal Assistant), डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) म्हणून नोकरी मिळू शकते.
- कौशल्ये: या कोर्समध्ये तुम्हाला लघुलेखन (Shorthand) आणि टायपिंग (Typing) शिकवले जाते, ज्यामुळे कामामध्ये अचूकता आणि वेग येतो.
- पगार: अनुभवानुसार तुमचा पगार वाढू शकतो.