भूगोल कुतूहल समुद्रशास्त्र विज्ञान

समुद्राचं पाणी खारं का असतं?

2 उत्तरे
2 answers

समुद्राचं पाणी खारं का असतं?

6
नदी, तलाव यांचे पाणी खारट लागत नाही. परंतु नदी समुद्राला मिळाल्यानंतर पाणी खारट बनते आणि समुद्राचे पाणी मूलतः खारट असते. याला वैज्ञानिक कारण आहे. 

जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो त्या पाण्यात काही प्रमाणात क्षार असतात. परंतु त्यांचे प्रमाण कमी असते. म्हणून त्यांची चव आपल्या जिभेला जाणवत नाही.  म्हणून हे पाणी आपल्याला खारट लागत नाही. 

नदीला मिळणारे पाणी हे पावसापासून मिळालेले पाणी असते आणि हे पाणी पाऊस पडल्यानंतर जमिनीतून, खडकांतून वाहते. असे होत असताना मातीतील, खडकांतील काही खनिजे, क्षार या पाण्यात मिसळतात आणि विरघळतात. हेच पाणी पुढे जाऊन समुद्राला मिळते. जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा अश्या नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळत राहिले. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते. भाष्पीभवन होताना फक्त पाण्याचीच वाफ होते परंतु त्या पाण्यात मिसळलेले क्षार आणि इतर खनिजे मात्र समुद्राच्या पाण्यात कायम राहतात. त्यांचे बाष्पीभवन होत नाही. हजारो वर्षे हि प्रक्रिया चालू राहिल्यामुळे या पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढत राहिले आणि यामुळे समुद्राचे पाणी खारट बनले. 


समुद्राच्या पाण्यातील क्षारांच्या प्रमाणानुसार खारटपणा कमी जास्त असतो. जगात मृत समुद्रात सर्वात जास्त क्षारांचे प्रमाण आहे. म्हणून या समुद्राचे पाणी सर्वात खारट आहे. क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या पाण्याची घनता इतकी जास्त आहे कि या पाण्यावर माणूस तरंगू शकतो. 



उत्तर लिहिले · 1/1/2017
कर्म · 48240
0
समुद्राचे पाणी खारे असण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • नद्या आणि जमिनीवरून वाहून येणारे क्षार: नद्या जमिनीवरून वाहताना मातीतील आणि खडकांतील क्षार आपल्यासोबत घेऊन येतात. हे क्षार समुद्रात जमा होतात.
  • समुद्रातील ज्वालामुखी: समुद्राच्या तळाशी असलेल्या ज्वालामुखींमुळे रासायनिक क्रिया होऊन समुद्राच्या पाण्यात क्षार मिसळतात.
  • पाण्याचे बाष्पीभवन: समुद्रातील पाण्याची वाफ होते, पण क्षार समुद्रातच राहतात. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यावर क्षार अधिक प्रमाणात जमा होतात.
  • समुद्रातील जलचर: समुद्रातील जीव आणि वनस्पती यांच्यामुळे देखील क्षार वाढतात.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 980

Related Questions

गाव हे समुद्राचा भाग आहे का?
महासागरापासून कोणकोणत्या गोष्टी मिळवतो?
स्त्री समुद्र तोय प्रतिवाहन म्हणजे काय ते स्पष्ट लिहा?
किती खोलीत सागर जलाचे कमाल तापमान सर्वत्र स्थिर राहते?
समुद्राची क्षारता (Salinity) सांगताना चिन्हाचे वाचन कसे करतात?
वाऱ्याच्या वेगावर लाटेचे कोणते घटक अवलंबून असतात?
वाऱ्याच्या वेगावर लाटेचे घटक अवलंबून असतात का?