उत्तर अभिप्राय उत्तर मराठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तंत्रज्ञान

उत्तर.co वर काम करून मला काय फळे मिळणार आहेत?

4 उत्तरे
4 answers

उत्तर.co वर काम करून मला काय फळे मिळणार आहेत?

291
कर्म काय आहे ?
कर्म हे तुमच्या चांगल्या कामाचा आलेख आहे. तुम्ही लिहिलेले उत्तर जर कुणाला आवडले तर तुमचे कर्म वाढतात. तसेच जर कुणाला तुमचे उत्तर नावडले तर तुमचे कर्म कमी होते.
आपण एक कम्युनिटी आहोत. म्हणून सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते बरे किंवा वाईट ठरवण्याचा देखील अधिकार आहे. जर काही लोक वाईट उत्तरे देत असतील तर त्यांचे उत्तर बाकीचे लोक नावडले मार्क करतील आणि अशा लोकांचे कर्म कमी होईल. अशा लोकांवर काही निर्बंध लादण्यास uttar.co ला सोपे जाईल.
तसेच ज्या लोकांचे कर्म अधिक असेल अशा लोकांचे उत्तरे वाचताना वाचकांना एक प्रकारचा विश्वास देखील राहील.

कर्माचे फळ:
uttar.co च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या व्यवसाय केला जात नाही. म्हणजे हा एक ज्ञान सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दिलेल्या उत्तराने जर एखाद्याला योग्य दिशा सापडणार असेल तर त्याहून अधिक चांगले फळ माझ्यामते तरी दुसरे कुठले असणार नाही.
उत्तर लिहिले · 29/10/2016
कर्म · 33910
16
कर्म जितके जास्त कराल तितके तुमचं ज्ञान वाढेल, ज्ञान हेच तुमचं फळ आहे.
उत्तर लिहिले · 3/8/2017
कर्म · 9895
0

उत्तर.co वर काम करून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

  • ज्ञान आणि कौशल्ये: विविध विषयांवर उत्तरे शोधून आणि ती स्पष्टपणे समजावून सांगून, तुमचे ज्ञान वाढेल आणि नवीन कौशल्ये शिकायला मिळतील.
  • आत्मविश्वास: जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता, तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास मिळतो.
  • शिकण्याची संधी: उत्तरं शोधताना तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.
  • सामाजिक संबंध: तुम्ही इतर सदस्यांशी संवाद साधू शकता आणि तुमच्या ज्ञानात भर घालू शकता.
  • ओळख आणि प्रशंसा: तुमच्या उत्कृष्ट योगदानासाठी तुम्हाला ओळख आणि प्रशंसा मिळू शकते.

याव्यतिरिक्त, काही प्लॅटफॉर्म्स (platforms) आर्थिकincentives देखील देतात. त्यामुळे, तुम्ही किती सक्रिय आहात आणि किती योगदान देता यावर अवलंबून फायदे बदलू शकतात.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1440

Related Questions

Uttar.com ads चे पैसे कोण कमावतो, मालक कोण आहे? उत्तर देणाऱ्यांना काही मिळेल का?
Contentmart या वेबसाईट बद्दल माहिती मिळेल का? या वेबसाईटवर आपण मोबाईलवरून काम करू शकतो काय आणि काम केल्यावर आपल्याला पैसे खरंच मिळतात काय?