जमीन खरेदी
2
Answer link
जर तुमच्या वडिलांच्या, आजोबांच्या किंवा पणजोबांच्या नावे कधी काळी शेती असेल तर तुम्ही त्याचा पुरावा देऊन शेती खरेदी करू शकता.
मात्र असे काहीही नसेल तर तुम्ही शेत जमीन विकत घेऊ शकत नाही. असा कायदा आहे.
जर पुरावा असेल तर प्रांत अधिकाऱ्याला अर्ज करून खरेदीसाठी मंजुरी मिळवून घ्या. ही मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही खरेदीखत व इतर दस्तऐवज करण्यास पात्र व्हाल.
0
Answer link
ग्रामपंचायत स्तरावर अकरा गुंठे जमिनीची खरेदी प्रक्रिया खालीलप्रमाणे होते:
- जमिनीची निवड: प्रथम आपल्याला कोणत्या जागेची खरेदी करायची आहे, ती निश्चित करावी लागेल.
- मालमत्तेची तपासणी: जमिनीचे मालक कोण आहेत, जमिनीवरील कर भरलेला आहे की नाही आणि जमिनीवर कोणताही वाद नाही ना, याची खात्री करावी लागते. यासाठी तुम्ही तलाठी कार्यालयातून माहिती मिळवू शकता.
स्रोत: महभूमी
- खरेदीखत (Sale Deed): जमीन खरेदी करण्यासाठी खरेदीखत तयार करणे आवश्यक आहे. खरेदीखतामध्ये जमिनीची किंमत, मालकाचे नाव, खरेदीदाराचे नाव आणि इतर आवश्यक माहिती नमूद केलेली असते.
- नोंदणी: खरेदीखत तयार झाल्यावर दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीच्या वेळी मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी शुल्क (Registration Fees) भरावे लागते.
- फेरफार: खरेदीखत नोंदणी झाल्यानंतर, आपले नाव जमिनीच्या मालकीच्या Records मध्ये नोंदवण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागतो. या प्रक्रियेला फेरफार म्हणतात.
- ग्रामपंचायत नोंद: ग्रामपंचायत Records मध्ये जमिनीच्या मालकीची नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा लागतो.
टीप: जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमध्ये काही कायदेशीर अडचणी येऊ शकतात, त्यामुळे वकिलाचा सल्ला घेणे उचित राहील.
7
Answer link
जमीन घेताना सर्वात आधी रस्ता कुठे आहे, काय आकार आहे,याची माहिती आपण घेतली पाहिजे. रस्ता
जमीन बिनशेती असेल तर जमीनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखविलेला असतो. परंतु जमीन बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.आरक्षित जमिनी
शासनाने सदर जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण उदा. हिरवा पट्टा, पिवळा पट्टा इत्यादी नसल्याची खात्री करावी.
वहीवाटदार- उतारावरील मुळ मालक व प्रत्यक्ष वहीवाट दार वेगवेगळे आहेत का याची खात्री करावी.
सातबाऱ्या वरील नावे उताऱ्यावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीची आहेत ना याची खात्री करावी. त्यावर एखादा मयत व्यक्ती, जुना मालक किंवा इतर वारसाची नावे असल्यास ते कायदेशीर पद्धतीने काढुन घेणे आवश्यक आहे.
कर्जप्रकरण आणि न्यायालयीन खटला
जमिनीवर कोणत्याही बँक किंवा तत्सम व वित्तय संस्था इत्यादींचा कोणत्याही प्रकारचा बोजा नाही ना याची खात्री करावी. एखादा न्यायालयीन खटला चालू असेल तर त्या बाबतीतले संदर्भ तपासून पाहावेत. यासाठी वकिलाचा सल्ला घेणे चांगले असते.
जमिनीची हद्द
हद्द ही नकाशाप्रमाणे आहे की नाही हे तपासून पाहावे आणि शेजारील जमीन मालकची काही हरकत नाही ना याची खात्री करावी.
इतर अधिकार नोंद
उताऱ्यावर इतर अधिकार या रकान्यात इतर नावे असतील तर त्याबाबतीत माहिती करून घेणे महत्वाचे आहे. या बाबतीत बक्षीस पत्रानुसार मिळालेल्या जमिनीविषयी विशेष काळजी घ्यावी.
बिनशेती करणे
- जमिनीवर शेतातील घर सोडून इतर कोणतेही बांधकाम करायचे असल्यास बांधकामाचा प्रकार प्रमाणे जमीन बिनशेती करणे आवश्यक आहे.
संपदित जमिनी
-सदर जमिनीमधून नियोजित महामार्ग, रस्ता इत्यादी नसल्याची खात्री करावी किंवा याची उताऱ्यावर नोंद आहे की नाही याची खात्री करावी.
खरेदीखत
दुय्यम निंबधक कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून व शुल्क भरून खरेदीखत करावे. काही कालावधीनंतर खरेदी केलेल्या जमिनीचा नकाशा व आपल्या नावावर उताऱ्यामध्ये नोंद आहे की नाही याची खात्री करावी. महत्वाचे मुळ जमीन मालकाने आर्थिक व्यवहार पूर्ण केल्याशिवाय खरेदीखत करू नये. सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी..
धन्यवाद...
0
Answer link
शेती घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
खरेदीदारासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड: (UIDAI)https://uidai.gov.in/hi/
- पॅन कार्ड: (Income Tax Department)https://www.incometax.gov.in/iec/foportal/
- ओळखपत्र (मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स): (Election Commission of India)https://eci.gov.in/
- उत्पन्नाचा दाखला /form 16 (Income certificate): तुमच्या उत्पन्नाचा पुरावा.
- जातीचा दाखला ( Caste certificate): जर आरक्षित जागेवर खरेदी करत असाल तर.
- शपथपत्र (Affidavit): यामध्ये तुम्ही दिलेली माहिती सत्य आहे असेdeclared करणे.
- पासपोर्ट साईज फोटो
विक्रेत्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- मालकी हक्काचा पुरावा: जमिनीच्या मालकीचा पुरावा जसे की जमिनीचा मूळ कागदपत्र, ७/१२ उतारा (7/12 extract) https://bhulekh.mahabhumi.gov.in/, फेरफार (mutation पत्रक).
- भोगवटादार वर्ग (Occupancy class): जमीन कोणत्या प्रकारात येते (वर्ग १ कि वर्ग २).
- ना हरकत प्रमाणपत्र (NOC): जर जमीन बँकेत गहाण ठेवलेली असेल तर बँकेचे NOC आवश्यक आहे.
- Land convertion order: शेत जमीन बिगरशेती (Non-agricultural) करण्यासाठी रूपांतरण आदेश.
- करारनामा (Agreement to sale): खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामध्ये जमिनीच्या विक्रीचा करार.
- पॉवर ऑफ attorney: जर विक्रेता स्वतः जमीन व्यवहार करू शकत नसेल, तर त्यांनी मुखत्यारपत्र (Power of Attorney) देणे आवश्यक आहे.
इतर आवश्यक कागदपत्रे:
- location map: जमिनीचा नकाशा.
- soil testing report: माती परीक्षण अहवाल.
वरील कागदपत्रांव्यतिरिक्त, जमिनीच्या व्यवहाराच्या वेळी मुद्रांक शुल्क (stamp duty) आणि नोंदणी शुल्क (registration fees) देखील भरावे लागतात.
1
Answer link
शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांत बदल होतात. मानवी जीवनात शेती हा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. भारतामधील. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकांवर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि तीळ व उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्याadi
ठिकाणी अशा तऱ्हेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. कारण तेथील हवामान भात, आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याची पिके याच्या उत्पादनाला पोषक असते. नवीन संकरित जातींमुळेही हवामान, जमीन व भूरचना यांना योग्य अशी पिके आता घेता येतात.
पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात; पण या घटकांना जर पर्जन्यमानाचीही जोड मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक उठावदार दिसतात. खोल, सुपीक आणि सपाट जमीन असेल आणि पाऊस भरपूर व चांगला विभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते. डोंगराळ आणि पुरेशा पर्जन्यमानाच्या प्रदेशात गवताळ राने मुबलक असल्याने अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे कुरणशेती, वनशेती, गवतशेती किंवा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. माफक खोलीची जमीन व तुटपुंजा पाऊस असणाऱ्या प्रदेशांत ⇨ दुर्जल शेती किंवा जिराईत शेतीशिवाय पर्याय नसतो.
आर्थिक घटक निरनिराळ्या नैसर्गिक घटकांवरून कोणत्या भूप्रदेशात काय पिकविता येणे शक्य आहे ते सांगता येईल; परंतु कोणती पिके अगर शेतीचा प्रकार किती फायदेशीर होईल ते सांगता येणार नाही. ते वेळोवेळी बदलणाऱ्या आर्थिक घटकांवरून ठरवावे लागेल. हे घटक म्हणजे उत्पादन खर्च, विक्री खर्च, दुसऱ्या उद्योगधंद्याशी स्पर्धा, शेती उत्पादनाच्या सापेक्ष किंमतीत होणारे बदल, अवास्तव उत्पादन वाढ व घट यांचे दुष्ट चक, त्या त्या बाजारपेठांच्या विशिष्ट मागण्या, जमिनीच्या किंमती, उपलब्ध भांडवल, मजूर पुरवठा, पिकावरील कीड व रोग आणि वैयक्तिक घटक वगैरे. त्यांचा सर्वांगीण होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतीचे प्रकार नियोजित केले जातात. त्यातील काही महत्त्त्वा प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत.
एकेरी अगर बहुविध पिकांची शेती एकेरी पिकाची शेती भारतात फार रूढ नाही. याला कारणेही वेगवेगळी आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील शेती ही प्राधान्याने उदरनिर्वाहाच्या हेतूने करण्यात येणारी असून शेकऱ्याचे जमीनधारणेचे परिमाण अल्प आहे. शेतकऱ्याला आपल्या लहानशा शेतीच्या तुकड्यात कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशी जवळजवळ सर्व प्रकारची शक्य ती उत्पादने काढावी लागतात. सुदैवाने भारतातील हवामान, काही थोडे प्रदेश वगळता, बहुतेक ठिकाणी वर्षभर शेती करण्याला पूरक असे आहे. कोकण विभागातील भात शेती हा एकच आणि जवळजवळ एकेरी पीक पद्घतीसारखा आहे. अमेरिकेसारख्या देशात जमीनधारणेचे परिमाण खूप मोठे असून विशेषीकरणही उच्च दर्जाचे असते. तेथे गहू, कपाशी, मका, गवत इत्यादींची एकेरी पीक पद्घत रूढ आहे. अर्थात तेथील हवामान बाराही महिने शेतीला पूरक नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे. जेथे शेतीचे लहानलहान तुकडे एकत्र करून सामुदायिक शेती अस्तित्वात आहे किंवा महाराष्ट्र राज्य कृषि महामंडळाप्रमाणे राज्य सरकारच्या व्यवस्थेखाली शेती केली जाते, अशा ठिकाणी एकेरी पीक पद्घती अवलंबिली जाते.
बहुविध पिकांची शेती अनेक दृष्टींनी फायदेशीर असते. तिच्यामध्ये उपलब्ध साधनसामगीचा अधिक कार्यक्षमतेने आणि काटकसरीने उपयोग होऊ शकतो. जमिनीची उत्पादनक्षमता टिकविण्याच्या किंवा वाढविण्याच्या बाबतीतही तिची मदत होते. बहुविध पिकांच्या शेतीत काही पिकांत आलेले नुकसान दुसऱ्या पिकांत भरून निघत असल्याने काही प्रमाणांत नुकसानभरपाई होते. मात्र एकेरी पिकांच्या शेतीत विशेषीकरणाचा जो फायदा मिळतो तो बहुविध पिकांच्या शेतीत मिळत नाही.
दुर्जल शेती संपादन करा
वार्षिक ५० सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी अशा निश्चित पर्जन्यमानाच्या प्रदेशात दुर्जल शेती करतात. ओल टिकविणे आणि भूसंरक्षण अशा प्रकारच्या शेतीतील महत्त्वाच्या समस्या होत. काही थोड्या पावसाळी महिन्यांत व त्यांच्या थोड्या मागील-पुढील काळात होणारी ही हंगामी शेती असते. पिकांची निवड मर्यादित असते. भूसंरक्षण करण्यासाठी आणि ओलावा टिकविण्यासाठी शेतीच्या मशागतीच्या काही खास शिफारस केलेल्या पद्घती वापरून ही पिके काढली जातात. उदा., समपातळीत बांध घालून त्यांना समांतर पिकांची पेरणी करणे, कमी बी पेरणे, रोपांची संख्या मर्यादित करणे, पट्टापेर पद्घतीने पीक पेरणे, आच्छादनाचा वापर करणे, खतांचा माफक वापर करणे इत्यादी.
जिराइती शेती संपादन करा
या शेती प्रकारात ५० ते १०० सेंमी.च्या आसपास असणाऱ्या, व अधिक निश्चित असलेल्या पर्जन्यमानावर पिके काढली जातात. भारतातील काही भागांत खरीप (पावसाळी शेती) आणि रब्बी (हिवाळी शेती) अशा दोन हंगामांत पिके काढणे शक्य असते. या प्रकारच्या शेतीत खताचा मुबलक वापर करता येतो. आच्छादनाचा वापर करून जिराइती शेती जास्त फायदेशीर करता येते. भारतात अनेक राज्यांत अशा प्रकारची शेती करतात. भारत हा ७०% पाण्याने व्यापला असून जिरायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. अलिकडेच्या काळात नदीच्या पाण्यावर शेती जास्त प्रमाणात जाते.
बागायती शेती संपादन करा
वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात.पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक करून ही शेती केली जाते. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वक रीत्या अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते.
बारमाही बागायती शेती संपादन करा
या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात.बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहीर बागायत, धरणाखालील बागायत किंवा उपसा सिंचन बागायत असेही प्रकार करतात. पिकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरून बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, फवारा सिंचन, तुषार सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार करतात.
फळबाग शेती संपादन करा
या प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते; तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर केळीचे पीक उत्तम प्रकारेघेता येते. फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आंबा, चिकू, नारळ, सुपारी इत्यादी. परंतु संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते.फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रमुख प्रकार पडतात.
कोरडवाहू फळबाग शेती संपादन करा
ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा उपलब्ध सिंचन सुविधा अत्यल्प आणि हंगामी स्वरूपाची आहे, अशा ठिकाणी बोर, डाळिंब, आवळा, सीताफळ इ. फळझाडांची लागवड करून कोरडवाहू फळबाग शेती केली जाते. पाण्याची अत्यल्प उपलब्धता असूनही कोरडवाहू फळबागा चांगले उत्पन्न मिळवून देतात.ही परवदने आपेक्षित आहे. पाणी कमी लागत असल्याने ही शेती केली जाते.
बागायत फळबाग शेती संपादन करा
सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता भरपूर असेल, तर केळी, पपई, चिकू, द्राक्षे, संत्री, मोसंबी यांसारख्या फळझाडांची लागवड फायदेशीर ठरते. या फळबागांसाठी वर्षभर पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघते, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो .
भाजीपाल्याची शेती संपादन करा
भाजीपाल्याची शेती ही पूर्णपणे बागायती स्वरूपाची शेती आहे. निश्चित पर्जन्यमान, सिंचन सुविधेची उपलब्धता आणि चांगल्या बाजारपेठेची अनुकूलता असली म्हणजे या प्रकारात जमिनीचा आणि इतर साधनसामगीचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो. अशा प्रकारच्या शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने त्याची विकी व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे. जलद मालवाहतुकीची चांगली सोय असल्यास बाजारपेठ थोडी दूर असली तरी चालू शकते. मजुरांची उपलब्धता असणे हे महत्त्वाचे आहे.
फुलशेती संपादन करा
फुलशेती हासुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूर्वीपासून फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार्या केंद्रांच्या आसपास केवळ लहान प्रमाणावर फुलशेती केली जात असे; परंतु आता व्यापारी तत्त्वावर काहीशा मोठ्या प्रमाणात फुलशेतीचा अवलंब झालेला आहे. फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथापि आता फुलांच्या लांब अंतरावरील वाहतुकीसाठी वातानुकूलित वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे भारतात चांगल्या फुलबागांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात हरितगृहाचा (पॉली हाऊस) वापर मुख्यत्वे फुलशेतीसाठी केलेला दिसून येतो. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात; तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्घतीने घेतले जाते. आज व्यावसायिक दृष्ट्या फुलशेती ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नेट् शेड आणि पॉलीहाऊस चा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाधिरत फुलशेती केली जाते. मिल्चींग पेपर वर बेड तयार् करुन विशिष्ट अंतरावर लागवड केली जते. पॉलीहाऊस मध्ये अवघ्या २० गुंठ्यामध्ये वार्षिक ३ लाखांपर्य्ंत उत्पन्न घेता येते.
पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती संपादन करा
यापूर्वी उल्लेख केलेल्या पिकांपैकी कोणत्याही पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशांत किंवा परिस्थिती अनुकूल असूनही जर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्या बाबतीत तो प्रदेश पिकांच्या शेतीपेक्षा जास्त किती फायदेशीर होण्यासारखा असेल, तर तेथे पशुधन प्रधान शेतीप्रकार सुरू केलेला आढळतो. या व्यवसायासाठी जनावरांना चरण्यासाठी चराऊ राने व जनावरांना वैरण, चारा, धान्यादी खाद्य किफायतशीरपणे उत्पादन करता येण्यासारख्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. शिवाय पशुधनाच्या संवर्धनातील आणि दुग्धव्यवसायातील उत्पादने सुलभतेने व किफायतशीरपणे विकी करण्याची सोय त्या भागात असणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती या शेतीप्रकाराला पोषक असते. सामान्यतः अशाच प्रदेशात हा शेतीप्रकार आढळतो. मोठ्या शहरांचे सान्निध्य आणि वाहतुकीची चांगली सोय अत्यंत आवश्यक आहे.
जेथे अत्यंत विशेषीकृत पशुधन प्रधान अशी शेती केली जाते, तेथे दाणावैरण, आद्य पशुधन इ. गोष्टी विकत घेतल्या जातात आणि संवर्धित पशुधन आणि दुग्धोत्पादन हे विकले जाते. ज्या शेती प्रकारामध्ये जनावरांसाठी खाद्य म्हणून वनस्पतीचे उत्पादन त्या शेतीवरच करण्यात येते असा दाणावैरण व पशुधन प्रधान शेतीप्रकार बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. हे शेतीप्रकार ऑस्ट्रेलियात आणि पाश्चिमात्य देशांत सर्व ठिकाणी आढळतात. पशुधन प्रधान शेतीच्या प्रकारात आता कुक्कुटपालनाचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे.

घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:
1. जमिनीचा प्रकार:
- जमीन निवासी (Residential) वापरासाठी योग्य असावी.
- कृषी जमीन (Agricultural land) असल्यास, ती बिगरशेती (Non-agricultural) करणे आवश्यक आहे.
2. जमिनीची मालकी आणि अधिकार:
- जमिनीच्या मालकीची कागदपत्रे तपासा. उदा. 7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड.
- जमीन मालकाच्या नावावर आहे का आणि त्याचे अधिकार काय आहेत, हे तपासा.
- जमिनीवर कोणताही वाद किंवा न्यायालयीन प्रकरण (litigation) नसावे.
3. जमिनीची जागा (location):
- शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बाजारपेठ, इत्यादी मूलभूत सुविधांजवळ जमीन असावी.
- पाण्याची सोय, वीज आणि रस्त्याची उपलब्धता असावी.
- परिसरातील गुन्हेगारी दर (crime rate) आणि सुरक्षितता तपासा.
4. जमिनीचा आकार आणि भूभाग:
- जमिनीचा आकार तुमच्या घराच्या आराखड्याप्रमाणे (house plan) योग्य असावा.
- जमीन सपाट (flat) असावी, जेणेकरून बांधकाम करणे सोपे जाईल.
- जमिनीच्या भोवतालचा परिसर आणि मातीचा प्रकार (soil type) तपासा.
5. कायदेशीर प्रक्रिया:
- जमिनीच्या खरेदीखताची नोंदणी (registration) दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) करावी.
- मुद्रांक शुल्क (stamp duty) आणि नोंदणी शुल्क (registration fees) भरा.
- वकिलाचा सल्ला घ्या आणि सर्व कागदपत्रे तपासा.
6. जमिनीची किंमत:
- परिसरातील जमिनीच्या किमतींनुसार जमिनीची किंमत ठरवा.
- सरकारद्वारे निर्धारित केलेले रेडी रेकनर दर (ready reckoner rate) तपासा.
- किमतीवर वाटाघाटी (negotiation) करा.
7. इतर महत्वाचे मुद्दे:
- जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज (loan) किंवा भार (encumbrance) नसावे.
- जमिनीच्या आसपासच्या नैसर्गिक वातावरणाचा (natural environment) विचार करा.
- भविष्यात जमिनीच्या किमती वाढण्याची शक्यता तपासा.