मोक्ष
बंध (Bondage) आणि मोक्ष (Liberation) या भारतीय तत्त्वज्ञानातील आणि धार्मिक परंपरेतील दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत.
बंध (Bondage)
बंध म्हणजे 'बंधन' किंवा 'गुंतलेले असणे'. या संकल्पनेनुसार, जीवात्मा (व्यक्तीचे आत्मिक स्वरूप) हा भौतिक जगाच्या आणि त्याच्या नियमांच्या अधीन असतो. बंधनाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- कर्म (Karma): केलेल्या प्रत्येक क्रियेचे फळ भोगावे लागते, ज्यामुळे पुनर्जन्माचे चक्र सुरू राहते.
- वासना (Desires): इंद्रियांच्या सुखाची इच्छा आणि भौतिक गोष्टींची आसक्ती ही बंधनाचे मूळ कारण मानली जाते.
- अविद्या (Ignorance): आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाबद्दलचे अज्ञान आणि 'मी' म्हणजे हे शरीर, असा चुकीचा समज.
- आसक्ती (Attachment): व्यक्ती, वस्तू किंवा विचारांशी असलेले अत्यधिक भावनिक बंधन.
या बंधनांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांत अडकतो, ज्याला 'संसार' असेही म्हणतात. या अवस्थेत दुःख, कष्ट आणि अशांतीचा अनुभव येतो.
मोक्ष (Liberation)
मोक्ष म्हणजे 'मुक्ती' किंवा 'बंधनातून सुटका'. हे भारतीय तत्त्वज्ञानाचे अंतिम ध्येय मानले जाते. मोक्ष प्राप्त झाल्यावर जीव खालील गोष्टींपासून मुक्त होतो:
- जन्म-मृत्यूच्या चक्रातून (संसार): आत्मा पुनर्जन्माच्या फेऱ्यांतून पूर्णपणे बाहेर पडतो.
- दुःख आणि कष्टांतून: भौतिक जगातील सर्व प्रकारच्या वेदना आणि संकटांपासून मुक्तता मिळते.
- कर्मफलातून: चांगल्या-वाईट कर्मांच्या फळांचा प्रभाव संपतो.
- अज्ञान आणि आसक्तीतून: आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होते आणि भौतिक जगाची आसक्ती नष्ट होते.
मोक्षाची अवस्था ही शाश्वत आनंद, शांतता आणि आत्म-साक्षात्कार (Self-realization) अशी वर्णन केली जाते. वेगवेगळ्या दर्शनांमध्ये मोक्षाची व्याख्या थोडी भिन्न असली तरी, त्याचे सार हे बंधनातून मुक्ती मिळवणे हेच आहे.
बंध आणि मोक्ष यांच्यातील संबंध
बंध आणि मोक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बंध ही सध्याची अज्ञानाची आणि आसक्तीची अवस्था आहे, तर मोक्ष ही त्यातून बाहेर पडण्याची आणि अंतिम सत्य जाणण्याची अवस्था आहे. मोक्ष मिळवण्यासाठी, व्यक्तीला बंधनाची कारणे समजून घेऊन त्यावर मात करावी लागते. यासाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तियोग, ध्यानयोग यांसारख्या विविध साधनांचा अवलंब केला जातो.
थोडक्यात, बंध हे जीवात्म्याच्या संसारातील अडकण्याला सूचित करते, तर मोक्ष हे त्या अडकलेल्या अवस्थेतून पूर्ण मुक्ती मिळवून आत्मिक शांती आणि परम आनंदाची प्राप्ती दर्शवते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवा तपासू शकता:
मोक्ष:
विविध अर्थ:
- हिंदू धर्म: मोक्ष म्हणजे आत्मज्ञान. आत्मा (स्वतः) आणि ब्रह्म (विश्वाचा आत्मा) यांच्यातील संबंध ओळखणे.
- जैन धर्म: मोक्ष म्हणजे कर्म आणि आसक्तीतून मुक्ती.
- बौद्ध धर्म: मोक्ष म्हणजे निर्वाण, तृष्णा आणि अहंकाराचा नाश.
मोक्षाचा मार्ग:
- ज्ञान मार्ग: ज्ञानाद्वारे सत्य समजून घेणे.
- भक्ती मार्ग: देवावर प्रेम आणि समर्पण करणे.
- कर्म मार्ग: चांगले कर्म करणे आणि स्वार्थ त्यागणे.
- राज योग: योगा आणि ध्यानाद्वारे चित्त शुद्ध करणे.
महत्व:
अधिक माहितीसाठी:
पुरुषार्थ म्हणजे काय?
- धर्म (Duty)
- अर्थ (Wealth)
- काम (Desire)
- मोक्ष (Liberation)
मोक्ष म्हणजे काय?
मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. हे अंतिम ध्येय आहे, ज्यामध्ये आत्मा परमাত্ম्यामध्ये विलीन होतो.
मोक्ष कसा प्राप्त करायचा?
- ज्ञानयोग (मार्ग ज्ञानाचा)
- भक्तियोग (भक्तीचा मार्ग)
- कर्मयोग (कर्माचा मार्ग)
- राजयोग (योगाचा मार्ग)
संदर्भ:
मोक्ष सहज मिळत नाही. मोक्ष प्राप्त करण्याचे दोन मार्ग आहेत.
पहिला मार्ग ज्ञान आणि दुसरा मार्ग भक्ति होय. कलियुगात भक्तिद्वारे मनुष्य सहज मोक्ष प्राप्त करून भवसागर तरुण जाऊ शकतो.
सच्चिदानंद भगवान श्रीकृष्ण जे परब्रह्म आहे. तेच सर्वप्रथम पुरूष आहे. भगवान श्रीकृष्ण आणि राधारानी हे गोलोकधाम मध्ये राहतात. म्हणजे तेच परमधाम आहे. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर आत्मा गोलोकधाम ला जाते आणि परम आनंदाला प्राप्त होते.
भगवान श्रीकृष्ण पासून अक्षरब्रम्हाची उत्पत्ती होते. अक्षरब्रम्हापासुन अव्याकृतब्रम्ह ची उत्पत्ती होते. अव्याकृतब्रम्ह च्या मनातुन ज्योतीस्वरुप आणि सुमंगला शक्तीची उत्पत्ती होते. सुमंगला शक्ति ज्योतीस्वरुपला प्रेरणा देते की तुम्ही सृष्टी ची रचना करावी. ज्योतीस्वरुप पासुन मोहसागरची उत्पत्ती होते. मोहसागरात करोडो सुवर्ण अंड्याची निर्मीती होते. करोडो वर्षांनंतर त्या सुवर्ण अंड्यातुन महाविष्णू ची उत्पत्ती होते. करोडो महाविष्णू ची उत्पत्ती होते. त्यातील एका महाविष्णू ला समजुन घेतले की बाकीचे सर्व तसेच आहे. महाविष्णू ला आदिनारायण, कारोणदकशायी विष्णु , तसेच क्षर पुरूष म्हणतात. एका महाविष्णू पासुन अनंत ब्रम्हांड ची उत्पत्ती होते. त्यातील एका ब्रम्हांडला समजुन घेतले की बाकीचे सर्व तसेच आहे. एका ब्रम्हांड मध्ये एक विराट स्वरुप असते. तर बाकीच्या ब्रम्हांड मध्ये दुसरे विराट पुरूष असतात आणि बाकिच्या सुवर्ण अंड्यातून बाकीचे महाविष्णू.
एका ब्रम्हांड मध्ये एक विराट पुरूष. एका विराट पुरूष मध्ये 14 लोक असतात. सर्वात खाली गर्भोदकशायी विष्णु असतात जे जीवन प्रदान करतात. गर्भोदकशायी विष्णु पाताल मध्ये राहतात.
त्यावर 6 लोक आहेत. आणि पृथ्वीच्या वर 7 लोक आहेत.
गर्भोदकशायी विष्णु च्या नाभीकमळातुन ब्रम्हाची उत्पत्ती होते. सर्वात वर सतलोक आहे. जिथे ब्रम्हा विष्णू महेश राहतात. क्षीरोदकशाही विष्णु अवतार घेतात. भगवान श्रीकृष्णाचे गुण अवतार क्षीरोदकशायी विष्णु, कारोणकदकशायी विष्णु, गर्भोकदशायी विष्णु होय.
क्षर से परे अक्षर, अक्षरं से परे अक्षरारतीत.
अक्षरारतीत परब्रह्म सच्चिदानंद भगवान श्रीकृष्ण होय. यांची भक्ति तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देऊ शकते.
भागवत पुराण, ब्रम्हसंहिता मध्ये तुम्हाला याची माहिती मिळु शकते. मनाने लिहिलं यामुळे मला क्षमा करा. त्यांचे ज्ञान मोठे आहे पण माझं ज्ञान लहान आहे.

मोक्ष म्हणजे ब्रम्हप्राप्ति आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष असे म्हणतात.
संदर्भ : विचार सागर रहस्य ग्रंथ
याचा विचार हमेशा आपण केला पाहिजे, जो आनंद कशामध्ये तो आनंद परमार्था मध्ये आहे, गोरगरिबांना मदत करण्यामध्ये आहे, मुक्या प्राण्यांना जपण्यात आहे, आई बाबा याची सेवा करण्यात आहे, आणि ज्यांनी आई बाबा जाणले त्यांना कोणत्या हि अडचणीला सामोरे जावे लागत नाही त्या मुळे जन्म आणि मृत्यू या चक्रव्हीवा मध्ये वेळ न घालता चालू घडी कशी छान सुंदर बनवता येइल या कडे लक्ष केंद्रित करा
,,,,,,,,,,,,,,,,,धन्यवाद,,,,,,,,,,,,,,,