Topic icon

पित्त

1
बडिशेप - बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. यात अँटी अल्सर घटक असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठता दूर होते. बडिशेपचे दाणे चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. जिरे - जिऱ्याचे दाणे चघळल्यानेही पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होते.


 

पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय
   
हल्लीच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो.

 : हल्लीच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो. झोप पूर्ण न होणे, तणावग्रस्त जीवनशैली, तसेच मोठ्या प्रमाणा फास्ट फूड खाल्ल्याने पित्तदोष निर्माण होतात. यावेळी छातीत जळजळ, उलट्या, अपचनाचा त्रास जाणवतो. पण आपण याकडे तितकेसे लक्ष देत नाही. वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 



पित्ताचा त्रास होत असेल तर घरगुती उपायाने तो बराही करता येतो. त्यासाठी हे आहेत काही घरगुती उपाय


केळी : केळ्यातून शरीराला पोटॅशियम मिळते. त्यामुळे पोटात अॅसिडची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबरमुळेही पचनक्रिया सुलभ होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खावे. याने पित्ताचा त्रास कमी होतो. 


तुळस - तुळशीमध्ये अँटी अल्सर घटक असतात. ज्यामुळे पोटातील अॅसिडपासून तयार होणारे विषारी घटकांपासून बचाव होतो. पित्ताचा त्रास जाणवत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.


दूध - दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. पित्ताचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करावे. यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.



बडिशेप - बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. यात अँटी अल्सर घटक असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठता दूर होते. बडिशेपचे दाणे चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. 


जिरे - जिऱ्याचे दाणे चघळल्यानेही पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय जिरे पाण्यात उकळून ते पाणी थंड करुन प्यायल्यानेही फायदा होतो. 


 








उत्तर लिहिले · 27/8/2021
कर्म · 121765
1
(१) जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने पाणी प्या.

(२) सकाळी उठल्यावर रोज एक ग्लास कोमट पाणी प्या.

(३) रोज एक आवळा खा.
उत्तर लिहिले · 5/3/2020
कर्म · 2660
5
घरगुती उपचार करू शकता ...

पित्ताच्या त्रासावर सोपा घरगुती उपाय जिरं हे आहे .

कृती :
सकाळी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा कप पाणी एकत्र करून खूप गरम करा व थंड झाल्यावर ते पाणी प्या व त्यातील जिरे चावून खा .

जिऱ्यामूळे पित्ताचा त्रास कमी होईल व पचन सुधारण्यात मदत होईल.एक आठवड्यात किंवा महिन्यात थोडा फरक पडेल चेक करा .

कृपया चहाचे प्रमाण कमी करा त्याच्याने पित्ताचा त्रास अधिक होतो .

माहिती स्त्रोतची लिंक पाठवतो .
https://youtu.be/JyHmbKCa6BA

https://youtu.be/JyHmbKCa6BA
उत्तर लिहिले · 3/10/2018
कर्म · 545
18
*'पित्ता'वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी !*

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा .
*1) आरामदायी केळं :*
केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल (acid ) निर्मितीची प्रक्रिया मंदावते . तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.
- पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.
2) *फायदेशीर तुळस :*
तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते.
– तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा .
3) *अमृतरुपी दुध :*
दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते . थंड दुध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.
– दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे . मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.
4) *बहुगुणी बडीशेप:*
बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते . बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.
– बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
5) *पाचक जिरं :*
जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात .
– जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो . किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.
6) *स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग :*
लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते . लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात.
- जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या . यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.
7) *औषधी वेलची:*
आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा , हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल .
8) *वातहारक पुदिना :*
पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो . पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते .
- पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा . थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील ‘मेन्थॉल’ पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास , डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.
9) *आल्हाददायक आलं :*
आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो . आल्याच्या सेवनाने पचन सुधारते . तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो . आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या . किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा गुळ टाकून चुपत रहा.
10) *पित्तशामक आवळा :*
तुरट , आंबट चवीचा आवाळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील ‘व्हिटामिन सी’ , अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते .
-रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .
- कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.
प्रसारण:राजयोग ग्रुपचे फड जि पेज पसंतकरावे👍
उत्तर लिहिले · 31/8/2018
कर्म · 569245
1
दालचिनी व साखर कुटून चगळावी ह्याने पित्त कमी होत
आणि सकाळी उठुन कमीत कमी 1km तरी चालावे सर्व पित्त नष्ट होत
उत्तर लिहिले · 30/7/2017
कर्म · 45560