Topic icon

प्रशासकीय सेवा

0
IAS- इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस
(केंद्रीय लोकसेवा आयोग)
उत्तर लिहिले · 30/4/2021
कर्म · 14895
0
विश्वास नांगरे पाटील यांना महाराष्ट्र कॅडर मिळाल्यामुळे त्यांची पोस्टिंग महाराष्ट्र राज्यातच होते.
उत्तर लिहिले · 17/9/2019
कर्म · 0
6
*🇮🇳 अगदी लहान वयात आयएएस अधिकारी...*

✌देशातली प्रतिष्ठीत आणि आव्हानाची परीक्षा देऊन आयएएस बनणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होणं हे खूपच अवघड असतं पण काही तरुणांनी अगदी कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि ते देशातले सर्वात तरुण आयएएस अधिकारी झाले.
*🧭 अन्सार अहम्मद शेख :* 2015 साली आयएएस झालेल्या अन्सार अहम्मद शेखचं. अन्सारचे वडील रिक्षाचालक आहेत. अन्सार सांगतात, 'माझे वडील दिवसाला 100 ते 150 रुपये कमवायचे. अनेक वेळेला रात्रीचं जेवणही करता यायचं नाही. पण आता मात्र मी आयएएस अधिकारी होऊन माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.' अन्सार शेख हे पश्चिम बंगाल सरकारमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर काम करत आहेत.
*🧭 रोमन सैनी :*   रोमन यांनी वयाच्या 22 व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. ते देशात 18 वे आले. यूपीएससीचं कोचिंग घ्यायचं असेल तर बराच खर्च होतो. त्यामुळे प्रत्येक जण हा खर्च करू शकत नाही. म्हणूनच ऑनलाइन ट्रेनिंगच्या माध्यमातून हुशार विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ट्रेनिंग देण्याचा निर्णय रोमन सैनी यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी 2015 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.
*🧭 स्वाती मीणा नाइक :*   राजस्थानच्या स्वाती मीणा नाइक हिचं. मीणा यांनी 22 व्या वर्षीच आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. 2007 साली ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या स्वाती यांचा देशात 260 वा क्रमांक होता. सध्या त्या मध्य प्रदेश राज्य सहकारी विपणन सेवेत कार्यरत आहेत.
*🧭 अमृतेश औरंगाबादकर :* अमृतेश औरंगाबादकर यांचाही या तरुण आयएएस अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. अमृतेश यांनी 2011 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी देशात 10 वा क्रमांक मिळवला होता. पुण्याचे अमृतेश औरंगाबादकर 2012 च्या गुजरात केडरचे अधिकारी आहेत. सध्या वडोदराचे प्रादेशिक आयुक्त आहेत.
*🧭 अंकुर गर्ग :* अंकुर गर्ग हेही देशातले तरुण आयएएस अधिकारी. अंकुर गर्ग यांनी 2002 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ते सर्वात तरुण अधिकारी होते. अंकुर गर्ग हे आआयटी दिल्लीचे पदवीधर आहेत. सध्या ते हॉवर्ड विद्यापीठाचं पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
उत्तर लिहिले · 19/7/2019
कर्म · 569265
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
अन्सार शेख सध्या पश्चिम बंगाल येथे कार्यरत आहेत.
उत्तर लिहिले · 26/7/2018
कर्म · 775
7
IAS: IAS यांचे अधिकार कोणते हे उत्तर वाचा.
IPS: हा जिल्ह्यातील पोलीस डिपार्टमेंटचे नेतृत्व करतो.
IAS, IPS हे नोकरशाही मध्ये मोडतात. यांचे वरिष्ठ मंत्रालयाचे सचिव असतात. तर सचिव लोक मंत्र्याखाली काम करतात.

IAS आणि IPS अधिकारी वयाच्या ६० वर्षांपर्यंत नोकरी करू शकतात.

उत्तर लिहिले · 24/9/2017
कर्म · 283320