भूगोल देश हवामान

आपल्या देशातील मुख्य ऋतू कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

आपल्या देशातील मुख्य ऋतू कोणते आहेत?

1
आपल्या देशातील मुख्य ऋतू l उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे मुख्य ऋतू मानले जातात. तर 
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंमध्येही आपण वर्षाची विभागणी करतो.  .प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे काहीशे किंवा काही हजार किलोमीटर अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही त्याकरिता महत्त्वाची ठरते. उदा. काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ यांमधील हवामान एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहे, तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत. पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि कन्याकुमारी दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच अंतरे काही हजार किलोमीटरपर्यंत वाढविल्यास विविधता आणखी वाढते.

वर्षभरातील तापमानानुसार पृथ्वीचे अनेक भाग कल्पिलेले आहेत. पैकी शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध हे तीन मुख्य विभाग आहेत..
उत्तर लिहिले · 12/3/2024
कर्म · 765
0

भारतामध्ये मुख्यत्वे करून खालील ऋतू आढळतात:

  • उन्हाळा (Summer): मार्च ते मे या काळातMainly found in this period.
  • पावसाळा (Monsoon): जून ते सप्टेंबर या काळात.
  • हिवाळा (Winter): नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात.
  • शरद ऋतू (Autumn): ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला.
  • वसंत ऋतू (Spring): फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरुवातीला.

हे ऋतू भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या वेळी आणि तीव्रतेने जाणवतात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
महाराष्ट्रातील घाट व त्यांची माहिती?
गाव हे समुद्राचा भाग आहे का?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
जमीन म्हणजे काय?