माणुसकी भाषण समाज सामाजिक समस्या

माणुसकी हरवत चाललेला समाज यावर मराठी भाषण?

2 उत्तरे
2 answers

माणुसकी हरवत चाललेला समाज यावर मराठी भाषण?

3
  
हरवत चालली माणुसकी..!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.



सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा अतिशय वेगळा असा बुद्धिवान प्राणी आहे, असे म्हटले जाते. याच माणसाला निसर्गाने "मन" आणि "बुध्दी" बहाल केलीय... बुद्धीच्या जोरावर त्याने आज दाही दिशा आक्रंदण्यास सुरुवात केलीय. बुद्धी कल्पकतेच्या जोरावर आज मानवाने अंतराळात भरारी घेऊन अवकाशालाही गवसणी घातलीय, इतके त्याचे कर्तृत्व मोठे आहे. त्याच्या या कर्तृत्वापुढे त्याला गगन ही ठेंगणे वाटू लागलेय, इतक्या त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या सीमा अथांग पसरल्या आहेत, पण आधुनिकतेचे वारे लागलेला हाच माणूस मात्र त्याचे, आपल्या माणसांशी असलेलं नातं, आणि मातीशी असलेली नाळ मात्र विसरत चाललाय... आणि माणुसकी काळाच्या ओघात लोप पावत चाललीय...
       
खरंतर, आपले प्रियजन, शेजारी पाजारी, सगेसोयरे, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी मिळून मिसळून वागून आनंद लुटावा, सर्वांना आनंदाची खिरापत वाटून त्यांच्या सहवासात राहण्याचे, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्यात किती मोठे स्वर्गसुख दडले आहे. हेच माणूस विसरलाय... किंबहुना विसरत चाललाय. 


   
पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, नोकर चाकर यांसारख्या भौतिक सुखांमागे धावताना तो दिसत आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेटच्या कृत्रिम जगात जगण्यातच स्वतःला धन्य मानू लागलाय, तिथल्या कोलाहलात, मल्टीप्लेक्स, पार्टीहबमध्ये रमू लागलाय त्यामुळे बाहेरच्या जगाशी त्याचे एकरूप होण्याचे प्रमाण संपुष्टात येऊ पाहत आहे. समाजात वावरताना परस्परांशी असलेले संबंध, डावावर लागताना दिसत आहेत, इतकेच काय पण मानवाला खुणावणारे निसर्ग सौंदर्यही या आधुनिक युगातील मानवापुढे आता हार मानू लागले आहे.


    
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी, एकाच आईच्या उदरी जन्म घेतलेली लेकरे सुद्धा वैर भावनेने एकमेकांशी वागू लागली आहेत. हे आज समाजाचे वास्तव आहे. एकमेकांप्रति प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, ही सुखी जीवनाची त्रिसूत्री आता तो विसरत चाललाय, एकमेकांप्रति असलेल्या सद्भावनेमुळे सतत प्रकृतीचे, सृष्टीचे, निसर्गाचे, मानवी जीवनाचे सिंचन, पोषण होत असते. पण माणूस शिकून किती मोठा झाला, पण त्याचे आद्यकर्तव्यच तो विसरला याचा स्वाभाविक परिणाम त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसून येऊ लागलाय, त्यामुळे सुख, शांती, समाधान, समृद्धी, संपन्नता आनंद, दया, प्रेम या सर्व गोष्टी लोप पावत चालल्यात."एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी" अशी गत झालीय माणसाची माणसाशी वागण्याची, यावरून मला सुचलेल्या काही काव्यपंक्ती...

हरवत चालली माणुसकी..!

माणूस पेराल! उगवेल माणुसकी
ही म्हण आता खोटी होत चाललीय
मूल्यहीन समाजात माणुसकी ही
आता औषधाला पण नाही उरलीय...

खून,दरोडे,भांडणे,चोऱ्यामाऱ्या
साऱ्यांचा वाढत चाललाय कहर
बेकारी, महागाई,बेरोजगारीचा
समाजजीवनावर होतोय असर...


अमानुषपणे वागलास निसर्गाशी
प्राणवायू अभावी गुदमरला श्वास
स्वार्थासाठी वृक्षांची केली कत्तल
कोरोनाने आवळला गळ्यास फास...

दुष्काळी,अवकाळी,चक्रीवादळाने       
झालीय पिकांची अतोनात हानी
तरी येत नाही सरकारला जाग
बळीराजाच्या मात्र डोळ्यांत पाणी

भ्रष्टाचाराने पोखरलेय समाजास
आता हरवत चालली माणुसकी
एकमेकांबद्दल,माया,प्रेम,जिव्हाळा
राहिली नाही माणसास आपुलकी...


उत्तर लिहिले · 7/1/2024
कर्म · 53750
0

माणुसकी हरवत चाललेला समाज


आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,


आज मी 'माणुसकी हरवत चाललेला समाज' या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहे.


माणुसकी म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणे, त्याला मदत करणे, प्रेम, दया, सहानुभूती आणि त्याग यांसारख्या मानवी गुणांचा विकास करणे होय. पण आजकाल समाजात हे गुण कमी होत चालले आहेत, असे दिसते.


आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी देखील वेळ नाही. स्वार्थ आणि लालसा वाढत आहे. लोकांना फक्त स्वतःच्या फायद्याची चिंता आहे. गरीब, असहाय्य आणि गरजूंना मदत करायला कोणालाही वेळ नाही.


समाजात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार वाढत आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. जातीयवाद आणि धार्मिक तेढ वाढत आहे. यामुळे समाजात अशांती आणि द्वेष निर्माण झाला आहे.


माणुसकी हरवण्याची कारणे काय आहेत?

  • शैक्षणिक ऱ्हास: शिक्षण प्रणालीमध्ये नैतिक मूल्यांचा अभाव आहे.
  • आर्थिक विषमता: गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत आहे.
  • तंत्रज्ञानाचा प्रभाव: लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात आणि एकमेकांशी समोरासमोर बोलणे टाळतात.
  • कौटुंबिक विघटन: विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर योग्य संस्कार होत नाहीत.

माणुसकी जपण्यासाठी काय करावे?

  • प्रत्येकाने आपल्या मुलांना लहानपणापासूनच चांगले संस्कार द्यायला हवेत.
  • गरजू लोकांना मदत करायला हवी.
  • समाजात प्रेम आणि सलोखा वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
  • जातीयवाद आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींपासून दूर राहायला हवे.

माणुसकी हाच खरा धर्म आहे. जर आपण माणुसकी जतन केली, तरच एक चांगला समाज निर्माण करू शकतो.


धन्यवाद!

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5160

Related Questions

आदिवासी समस्या आणि आदिवासींचे हक्क?
अल्पसंख्याकांच्या समस्या सविस्तरपणे मांडा?
लिंग समानतेबाबत भारतीय दृष्टीकोन स्पष्ट करा.?
वांशिक भेदभावावर टीप लिहा?
मानव अधिकाराचा सर्वत्रिक जाहीरनामा 1948?
Social issu marathi answer?
Debate on social issu marathi answer?