2 उत्तरे
2
answers
नियुक्ती म्हणजे काय?
1
Answer link
नियुक्ती म्हणजे निवड नेमणूक असा अर्थ होतो.
निवड व नियुक्ती हे दोन शब्द साधारणपणे नोकरीच्या बाबतीत नेहमी कानावर पडतात. नोकरी साठी प्रयत्न करताना प्राथमिक पातळीवर प्रथम निवड होते. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवरापैकी पात्र व्यक्तीची सदर पदासाठी निवड केली जाते. निवड झाली म्हणजे नियुक्ती झाली असे नाही. नियुक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामावर हजर राहण्याचे आदेश होय.
उदा. 1) महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे विविध पदासाठी स्पर्धा परीक्षा घेऊन पात्र उमेदवाराची निवड करत असते, तर या पात्र उमेदवारांना नियुक्ती राज्य सरकार देत असते.
2) तलाठी पदासाठी जिल्हा निवड मंडळ परीक्षा घेऊन पात्र उमेदवाराची निवड करते तर जिल्हाधिकारी नियुक्ती देतात.
0
Answer link
नियुक्ती (Appointment) म्हणजे काय:
नियुक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पद, अधिकार किंवा जबाबदारी देण्यासाठी निवडणे किंवा नेमणूक करणे.
उदाहरणार्थ:
- एखाद्या कंपनीमध्ये नवीन कर्मचाऱ्याची निवड करणे.
- शासकीय संस्थेत अधिकाऱ्याची नेमणूक करणे.
- कोणत्याही संस्थेत विशिष्ट कामासाठी एखाद्या व्यक्तीची निवड करणे.