2 उत्तरे
2
answers
जडवादी तत्त्वज्ञानाची भूमिका स्पष्ट करा?
1
Answer link
जडवाद : ही तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची भूमिका आहे. अचेतन म्हणजे जडवस्तू हेच प्राथमिक किंवा प्रधान अस्तित्व आहे आणि आत्मा, चैतन्य किंवा मन ह्यांचे अस्तित्व फार तर दुय्यम किंवा गौण असते, हे मत ह्या भूमिकेचे सार आहे. आत्म्याचे, मनाचे तसेच मानसिक कृती, घटना, प्रक्रिया ह्यांचे अस्तित्व आत्यंतिक जडवादी समूळ नाकारतात. सौम्य जडवादी मनाचे अस्तित्व मानतात पण मानसिक घटना जडवस्तूवर, भौतिक प्रक्रियांवर आधारलेल्या असतात त्यांना स्वतंत्र, पृथक् अस्तित्व नसते, ही भूमिका स्वीकारतात.
जडवादी भूमिका सुसंगतपणे मांडायची किंवा तिचे समर्थन करायचे, तर प्रथम जडवस्तू किंवा भौतिक वस्तू म्हणजे काय, हे स्पष्ट करावे लागेल. सामान्यपणे जडवस्तू किंवा भौतिक वस्तू म्हणजे ज्या वस्तूला अवकाशात स्थान असते, जी कालात बदलत जाते आणि जिच्या ठिकाणी केवळ भौतिक धर्म असतात अशी वस्तू, असे आपण म्हणू. भौतिक धर्म म्हणजे आकार, आकारमान, वस्तूमान, घनता, गती, तपमान, विद्युत्भर इ. धर्म असे म्हणता येईल. म्हणजे ‘भौतिक धर्म’ ह्याची व्याख्या करता येणार नाही किंवा भौतिक धर्मांची संपूर्ण यादीही करता येणार नाही. पण भौतिक धर्म म्हणजे कोणत्या प्रकारचे धर्म, ह्याचे सामान्य दिग्दर्शन करता येईल. जाणीव, इच्छा, सुखदु:ख, निरीक्षणशक्ती इ. धर्म मानसिक धर्म आहेत, असे आपण म्हणू. आता भौतिक वस्तूची व्याख्या अशी करता येईल : ज्या वस्तूच्या ठिकाणी केवळ भौतिक धर्म आहेत, म्हणजे मानसिक धर्म नाहीत, अशी वस्तू म्हणजे भौतिक वस्तू. जडवादाचे म्हणणे असे, की अशा भौतिक वस्तूंनाच स्वतंत्र व स्वायत्त असे अस्तित्व असते. आत्मा, मने किंवा चैतन्य असा भौतिक वस्तूंहून वेगळा असा अस्तित्वप्रकार नाही. आत्म्याला, मनाला किंवा चैतन्याला स्वतंत्र, स्वायत असे अस्तित्व नसते. उदा., शरीराहून वेगळा असलेला आत्मा. अशा आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व असणार नाही. जडवादी भूमिका अनेक लोक स्वीकारतात. ह्याचे एक महत्त्वाचे कारण असे, की विश्वाच्या स्वरूपाचा, विश्वात ज्या घटना घडतात त्यांचा उलगडा करण्यात विज्ञानाला कल्पनातीत यश आले आहे. तेव्हा विज्ञानात विषेशतः भौतिकीत, स्वीकारण्यात आलेल्या उपपत्तीमध्ये वस्तूंच्या ज्या गुणधर्मांचा निर्देश करण्यात येतो, ते गुणधर्म म्हणजे भौतिक गुणधर्म, असे म्हणता येईल व मग जडवादी भूमिकेचा उलगडा असा करता येईल : जडवाद असे मानतो, की विश्वात ज्या ज्या घटना घडतात, त्या भौतिक असतात वा त्या केवळ भौतिक घटनांपासून निष्पन्न होत असतात. भौतिक घटना म्हणजे वरील अर्थाने जे भौतिक धर्म आहेत, असेच धर्म ज्यांच्या अंगी आहेत अशा घटना.
0
Answer link
जडवादी (Materialistic) तत्त्वज्ञानाची भूमिका खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते:
जडवाद म्हणजे काय:
जडवाद ही एक विचारधारा आहे जी मानते की फक्त भौतिक जग (physical world) अस्तित्वात आहे. या जगात विचार, भावना आणि चेतना (consciousness) यांसारख्या गोष्टी मेंदू आणि मज्जासंस्थेच्या (nervous system) कार्यांमुळे घडून येतात.
मूलभूत गृहितके:
भौतिक अस्तित्व: जडवाद केवळ भौतिक वस्तूंना सत्य मानतो. आत्मा, देव किंवा अलौकिक शक्ती (supernatural powers) यांसारख्या अमूर्त (abstract) गोष्टींना तो नाकारतो.
चेतना (Consciousness): चेतना ही मेंदूतील रासायनिक आणि भौतिक प्रक्रियांचा परिणाम आहे. त्यामुळे, मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्यास चेतनेवरही परिणाम होतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन: जडवादी विचारसरणी বিজ্ঞানের आधारावर जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करते. वैज्ञानिक पद्धतींनी (scientific methods) प्राप्त झालेल्या ज्ञानाला ते महत्त्व देतात.
जडवादाचे प्रकार:
सरळ जडवाद (Reductive Materialism): मानसिक स्थिती (mental states), जसे की विचार आणि भावना, ह्या मेंदूतील विशिष्ट भौतिक अवस्थांशी (physical states) जोडलेल्या असतात.
उत्क्रांतीवादी जडवाद (Emergent Materialism): चेतना ही भौतिक प्रणालींमधून (physical systems) उदयास येते, पण ती त्या भौतिक प्रणालींपेक्षा अधिक जटिल आणि वेगळी असू शकते.
द्वंद्वात्मक भौतिकवाद (Dialectical Materialism): हा मार्क्सवादी विचारधारेचा भाग आहे. यानुसार, भौतिक जग सतत बदलत असते आणि सामाजिक बदल आर्थिक व भौतिक शक्तींच्या संघर्षातून घडतात.
महत्व:
वैज्ञानिक प्रगती: जडवादी दृष्टिकोन বিজ্ঞানের संशोधनाला प्रोत्साहन देतो, कारण तो प्रत्येक गोष्टीचे भौतिक स्पष्टीकरण शोधतो.
नैतिकता आणि सामाजिक विचार: जडवादामुळे नैतिकता आणि सामाजिक विचारधारेला एक वास्तववादी (realistic) आधार मिळतो.
अधिक माहितीसाठी काही उपयोगी स्रोत:
स्टॅनफोर्ड तत्वज्ञान विश्वकोश (Stanford Encyclopedia of Philosophy): https://plato.stanford.edu/entries/materialism/
ब्रिटानिका ज्ञानकोश (Britannica): https://www.britannica.com/topic/materialism-philosophy
टीप: ही माहिती जडवादी तत्त्वज्ञानाची मूलभूत भूमिका स्पष्ट करते.