3 उत्तरे
3
answers
संकेश्वर येथील गणपती बद्दल माहिती द्या?
0
Answer link
‼️🪢‼️🪢‼️🪢

🔅 संकेश्वर येथील नवसाला पावणारा निलगार गणपती
हा गणपती २१ दिवसाचा असतो
सविस्तर माहिती ⤵️

0
Answer link
संकेश्वरात ३०० वर्षांचा इतिहास असलेल्या 'निलगार गणपती`ची तीन राज्यात किर्ती :


संकेश्वर (बेळगाव) : साधारणतः ३०० वर्षांचा इतिहास असलेल्या येथील हेद्दूरशेट्टी घराण्याच्या निलगार गणपतीची किर्ती कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यात पसरलेली आहे. `नवसाला पावणारा` अशी या गणपतीवर भक्तांची सर्वदूर श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी उत्सवात २२ ते २५ लाखावर भाविक दर्शन घेतात. प्रत्येक वर्षी भाविकांच्या संख्येत हजोरोंनी भर पडत आहे. या उत्सवामुळे संकेश्वर शहराला महिनाभर यात्रेचे स्वरुप येते. गेल्या 20 वर्षात या उत्सवाची व्याप्ती व ख्याती खूपच वाढलेली आहे.निलगार गणपतीची माहिती खूपच रोचक आहे. मुळात हा गणपती हेद्दूरशेट्टी घराण्याचा घरगुत्ती गणपती आहे. उपलब्ध माहितीनुसार ईश्वराप्पा सिद्धाप्पा हेद्दूरशेट्टी यांच्या काळापासून हा गणपती प्रसिद्धीच्या झोतात आला. सध्या हेद्दूरशेट्टी परिवारातील शिवपुत्र, वीरभद्र व हणमंत हे तिघे बंधू उत्सवाची सर्व जबाबदारी पेलत आहेत.हेही वाचा- दोनदा सेवा समाप्ती... पुन्हा सव्वा महिन्याची मुदतवाढ... काय आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा खेळखंडोबा वाचा सविस्तर.. - व्यवसायावरून झाले `निलगार` नामकरण गणपतीचे `निलगार` असे नामकरण हेद्दूरशेट्टी यांच्या व्यवसायावरुन पडले. हेद्दूरशेट्टी घराण्याचा सुतकताई व कपड्यांना रंगकाम करण्याचा पारंपरिक व्यवसाय होता. त्यावरुन त्यांना निलगार नावाने ओळखले जात. पुढे त्यांच्या गणपतीला `निलगार गणपती` हे नाव पडले. सध्या कालपरत्वे हेद्दूरशेट्टी यांचा व्यवसाय बदलला, पण नाव मात्र कायम राहिले आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती होऊन भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. गणेश चतुर्थी दिवशी संपूर्ण हेद्दूररशेट्टी कुटुंबीय कडक उपवास करतात. मूर्ती सुतार यांच्या घरातून दुपारी वाजत-गाजत मिरवणुकीने आणली जाते. पहिल्या दिवशी घरात मंचावर ठेऊन शास्त्रोक्त पूजा केली जाते. दुसऱया दिवशी सार्वजनिक भक्तांसाठी नेहमीच्या ठिकाणी मूर्ती ठेवली जाते. त्यानंतर भाविकांकडून दर्शन सुरु होते. दररोज लाख-सव्वा लाखावर भाविक दर्शन घेतात. हेही वाचा- तुम्हीच अंत्यसंस्कार करा असे ऐकावे लागते ; परिचारिका सारिका आनंदे यांचा अनुभव - सुतार कुटुंबीयांना मूर्ती बनविण्याचा मानसुतार कुटुंबीयांना निलगार गणपतीची मूर्ती बनविण्याचा मान आहे. धोंडीबा सुतार यांचा मुलगा बाळकृष्ण सुतार व आता नातू पुंडलिक सुतार हे मूर्ती बनवितात. परंपरेप्रमाणे हेद्दूरशेट्टी कुटुंबीय सुतार यांना मानाचा विडा देऊन मूर्तीची बनविण्यास सांगतात. मूर्ती बनविण्याच्या कामाचा प्रारंभही मुहूर्त पाहूनच केला जातो. मूर्तीचा रंग लाल, उंची २७ इंचसंपूर्ण लाल रंगात रंगवलेली गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक असते. मूर्तीची उंची २७ इंच, लाल रंग व सजावट ठरलेली असते. त्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. मूर्तीकाम केलेल्यांना आहेर व मानधन दिले जाते. मूर्तीचे छायाचित्र काढण्यास बंदी असते. या गणपतीला पिठी साखर, कापुर, दुर्वा व लाल फुल प्रिय आहे. संकष्टीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी किवा सोमवारी या गणपतीचे हिरण्यकेशी नदीपात्रात श्री शंकराचार्य मठासमोर विधीवत विसर्जन केले जाते. उत्सव कालावधीत शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, मान्यवर व व्यक्तींकडून अन्नदान आणि इतर सुविधा पुरवल्या जातात. अनवट राग कोल्हापूरात घेऊन आलेल्या अल्लादियॉं खॉंसाहेबांची पाचवी पिढीही संगीत सेवेत - शंकराचार्य मठाचा आशीर्वादविसर्जन मिरवणुकीला पंचक्रोशीसह विविध राज्यातील लाखो भाविक उपस्थित राहतात. येथील महालक्ष्मी मंदिरासमोर रात्रभर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. या गणपतीला श्री शंकराचार्य मठाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हा एकच असा गणपती आहे की मठातून त्याला विसर्जन स्थळी जाण्यास प्रवेश दिला जातो. उत्सव काळात मठाधीश या गणपतीचे दर्शन घेतात. उत्सव काळात विविध भजनी मंडळे व कलाकार येथे हजेरी लावून भक्तीसह सेवा करतात. अनेक लोकप्रिय सेलिब्रेटीही येथे हजेरी लावून गेले आहेत.हेही वाचा- कोल्हापुरातील तालमीनी अशी घेतली खबरदारी ःपरवानगी असेल तरच हॉलमध्ये प्रवेश - यंदा दर्शन पूर्णपणे बंदनिलगार गणपतीच्या ख्यातीमुळे सकाळपासूनच भाविकांची दीड-दोन किलो मीटर रांग लागलेली असते. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस व स्वयंसेवक कार्यरत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र या उत्सवावर शासनाने बंदी घातली आहे. अतिशय साध्या पद्धतीने निलगार गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सार्वजनिक भाविक-भक्तांसाठी यंदा दर्शन पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे याची नोंद घेऊन कोणीही उत्सव स्थळी येऊ नये, असे आवाहन हेद्दूरशेट्टी कुटुंबीयांनी केले आहे. संकष्टीनंतरच्या गुरुवारी किंवा सोमवारी विसर्जनया गणपतीचे वास्तव्य किमान २१ दिवसांपुढे असते. गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना होऊन संकष्टीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी किंवा सोमवारी या गणपतीचे विसर्जन होते. दरम्यानच्या काळात दररोज हजारो भक्त दर्शन घेऊन नवस बोलतात. यामध्ये नवीन लग्न झालेली जोडपी व शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंनी असते. उत्सवात कोटय़वधींची उलाढालतीन राज्यातील भाविक विविध वाहनांनी उत्सवात हजेरी लावतात. त्यामुळे मंदिर परिसर अक्षरशः गजबजून जातो. पेढे, साखर, कापूरसह अन्य पूजेच्या साहित्याचे शेकडो स्टाॅल लावले जातात. त्यासह हाॅटेल व अन्य व्यवसायांची चलती असल्याने उत्सव काळात कोटय़वधींची उलाढाल होते.हेही वाचा- शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंची कारवाईची इतकी घाई कुणाच्या हितासाठी - मुळात हा गणपती आमचा घरचा गणपती आहे. पण अलीकडे येणाऱ्या भाविकांचे नवस पूर्ण करणारा निलगार गणपती म्हणून अशी त्याची ख्याती दूरवर पसरलेली आहे. भक्ताची संख्याही वाढतच चालली आहे. त्यांना दर्शन सुलभ होण्यासाठी प्रयत्नशील असतो. हेद्दूरशेट्टी कुटुबीयांच्या प्रथा, परंपरा सांभाळत आम्ही हा उत्सव साजरा करतो. शिवपुत्र हेद्दूरशेट्टी, संकेश्वर एक नजर... -`निलगार` हा हेद्दूरशेट्टी घराण्याचा घरचा गणपती -उत्सव काळात संकेश्वरला यात्रेचे स्वरूप -गेल्या २० वर्षात वाढली ख्याती -२० ते २५ लाखावर भाविकांकडून दर्शन -नवीन जोडपी, विद्यार्थी व भाविकांकडून नवस -मूर्तीचे छायाचित्र काढण्यास बंदी.
संकेश्वर (बेळगाव) : श्रीगणेशाची विविध ठिकाणं विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. त्याची ही सगळी रुपं, त्यांच्यामागच्या आख्यायिका हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. सुमारे 300 वर्षांचा इतिहास असलेल्या येथील हेद्दूरशेट्टी घराण्याच्या निलगार गणपतीची किर्ती कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यात पसरलेली आहे. `नवसाला पावणारा` अशी या गणपतीवर भक्तांची सर्वदूर श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी उत्सवात तब्बल 25 लाखांवर भाविक दर्शन घेतात. या उत्सवामुळे संकेश्वर शहराला महिनाभर यात्रेचं स्वरुप येतं. गेल्या 20 वर्षात या उत्सवाची व्याप्ती खूपच वाढलीय.

संकेश्वरातील निलगार गणपतीची माहिती खूपच रोचक आहे. मुळात हा गणपती हेद्दूरशेट्टी घराण्याचा घरगुती गणपती आहे. उपलब्ध माहितीनुसार, ईश्वराप्पा सिद्धाप्पा हेद्दूरशेट्टी यांच्या काळापासून हा गणपती प्रसिद्धीच्या झोतात आला. सध्या हेद्दूरशेट्टी परिवारातील शिवपुत्र, वीरभद्र व हणमंत हे तिघे बंधू उत्सवाची सर्व जबाबदारी पेलत आहेत. हा उत्सव थाट साजरा केला जातो.

0
Answer link
संकेश्वरचा गणपती हे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. संकेश्वर हे बेळगावपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे.
मंदिराचा इतिहास:
- या मंदिराची स्थापना 1898 मध्ये झाली.
- श्री स्वामी समर्थांनी या मंदिराच्या स्थापनेची प्रेरणा दिली, असे मानले जाते.
- गणपतीची मूर्ती संगमरवरी असून ती अतिशय सुंदर आहे.
उत्सव आणि कार्यक्रम:
- गणेश चतुर्थीला येथे मोठा उत्सव असतो.
- दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला भाविक दर्शनासाठी येतात.
- मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि पूजा आयोजित केल्या जातात.
कसे पोहोचावे:
- बेळगावहून संकेश्वरसाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहे.
- जवळचे रेल्वे स्टेशन बेळगाव आहे.
संकेश्वरचा गणपती हे एक जागृत देवस्थान मानले जाते आणि येथे दर्शनासाठी भाविकांची नेहमीच खूप गर्दी असते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
टीप: दिलेल्या माहितीमध्ये बदल संभवतात. त्यामुळे, अधिकृतwebsite ला भेट देऊन खात्री करावी.