3 उत्तरे
3
answers
पेनिसिलिन या प्रतिजैविकचा शोध कोणी लावला?
1
Answer link
पेनिसिलिन या प्रतिजैवेकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला.
अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१] त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जीज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.
0
Answer link
पेनिसिलिन या प्रतिजैविकचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला.
ॲलेक्झांडर फ्लेमिंग हे स्कॉटिश जीवाणूशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1928 मध्ये पेनिसिलिनचा शोध लावला, ज्यामुळे वैद्यकशास्त्रात एक क्रांती झाली.
अधिक माहितीसाठी: