कला नाट्यशास्त्र

भरतमुनीनी कोणते ग्रंथ लिहिला?

2 उत्तरे
2 answers

भरतमुनीनी कोणते ग्रंथ लिहिला?

0

ख्रिस्तपूर्व काळात भारतात भरत नावाचे मुनी होऊन गेले. त्यांनी नाट्यकलेवर एक ३६ अध्यायी ग्रंथ लिहिला. तोच ग्रंथ भरताचे नाट्यशास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे.

अशी आख्यायिका आहे की देवतांनी ब्रम्हदेवास सर्वसामान्यांस कळतील असे वेद निर्माण करण्यास सांगितले. त्यावर, ब्रह्मदेवाने 'नाट्यवेद' नावाचा पाचवा वेद निर्माण केला. त्यात ऋग्वेदातील पाठ्य, यजुर्वेदातील अभिनय, सामवेदातील गायन आणि अथर्ववेदातील रस घेण्यात आले. नाट्यवेदाच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने भरतमुनींना त्याचा पृथ्वीवर प्रसार करण्यास सांगितले. शिवाने भरतमुनीचे नाट्य बघून, आपला शिष्य तंडू यास भरत मुनीस नृत्याचे अधिकृत सिद्धान्त कथन करण्यास पाठविले. या सिद्धान्तांचा समावेश त्याने ’तांडव लक्षण’ या सदरात केला आहे. भरत मुनींनी शरीराच्या १० मुद्रांचा, मानेच्या व हातांच्या ३६ तर डोक्याच्या १३ मुद्रांचा त्यात समावेश केला आहे. नृत्यातील वेगवेगळ्या शाखांनी या मूळ सिद्द्धान्तांचा वापर करून व त्यांस फुलवुन, त्यांची, कंठ व वाद्य संगीताशी एकतानता करून, त्याचा एखाद्या कथेच्या/कथानकाच्या सादरीकरणासाठी विस्तृतपणे वापर केला.


उत्तर लिहिले · 2/8/2023
कर्म · 53750
0

भरतमुनींनी नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला.

हा ग्रंथ भारतीय कला आणि नाट्य परंपरेतील एक महत्त्वाचा आणि मूलभूत ग्रंथ मानला जातो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2840

Related Questions

फेअरलेस गव्हर्नर हे पुस्तक कोणी लिहिले?
तुम्हाला माहित असलेल्या गुरु शिष्यांच्या जोड्या?
भारतीय राष्ट्रीय गाणे कोणी रचले?
भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले?
अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल माहिती सांगा?
हिरवागार शालू परिधान?
सोनं गुंफा कोठे आहे?