शिक्षण शब्द जीवन कौशल्ये

संच या घटकातून जीवनकौशल्ये रुजवण्यासाठी तुम्ही कोणते अध्ययन अनुभव द्याल, ते १००० शब्दांत स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

संच या घटकातून जीवनकौशल्ये रुजवण्यासाठी तुम्ही कोणते अध्ययन अनुभव द्याल, ते १००० शब्दांत स्पष्ट करा?

1



जीवन कौशल्ये 
आजच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. ह्या बदलांमुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दडपला गेला आहे. त्यामुळे स्वत:ला समजून घेण्याची क्षमता विकसित होण्यास त्यास अडसर निर्माण होत आहे. व्यक्तिचा सर्वांगिण विकास करणे हे शिक्षणाचे अंतीम उद्दिष्ट मानले जाते. त्या सर्वांगिण विकासामध्ये मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षण अधिकाधिक जीवनकेंद्रित करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. व्यक्तिविकास हा चारित्र्यनिर्मितीशी निगडीत असतो. चारित्र्याची उत्तमप्रकारे जडणघडण होण्यासाठी मानवाला महत्त्वपूर्ण जीवन कौशल्यांची आवश्यकता आहे. म्हणूनच जीवन कौशल्यांचा विकास शिक्षणातून होणे गरजेचे आहे. यास मानसशास्त्रीय कौशल्य म्हणूनही ओळखले जाते.



‘स्व’ची जाणीव : व्यक्तीची स्वत:च्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याची क्षमता म्हणजे ‘स्व’ची जाणीव. या क्षमतेमुळे व्यक्तीला स्वत:च्या आवडी-निवडी, भावना व वृत्ती यांच्याबद्दल स्पष्टपणे विचार करता येतो. तसेच व्यक्तीला आपल्या जीवनाचा व अस्तित्त्वाचा खरा अर्थ समजून येतो.
समानानुभूती : दुसऱ्याच्या भूमिकेत शिरण्याची क्षमता अथवा दुसऱ्या व्यक्तीला तिच्या दृष्टिकोनातून जाणून घेण्याची प्रामाणिक जिज्ञासा म्हणजे समानानुभूती. म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण आहोत असे समजून तिचा दृष्टिकोन जाणून धेण्याची कुवत होय.
समस्या निराकरण : अनेक पर्यायांचा विचार करून त्यांतील योग्य तो पर्याय निवडणे व आपली समस्या सोडविणे म्हणजे समस्या निराकरण होय. जीवनात आपल्याला पदोपदी समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या समस्या आपण कितपत परिणामकारकपणे आणि कार्यक्षमतेने सोडवू शकतो, यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते.
निर्णयक्षमता : निर्णयक्षमता ही अशी प्रक्रिया आहे की, ज्यामध्ये व्यक्ती किंवा व्यक्तीगट एखाद्या प्रसंगाच्या किंवा समस्येच्या संदर्भात माहिती गोळा करतो. मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करून योग्य पर्यायाची निवड निश्चित करतो. व्यवहार्य दृष्टिकोनातून पाहता येाग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. ते जीवनाच्या दर्जावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करते. जीवन कौशल्य शिक्षणासाठी हे मुलभूत कौशल्य आहे.
परिणामकारक संप्रेषण : स्वत:च्या विचारांची शाब्दिक अथवा अशाब्दिक पद्धतीने प्रभावीपणे अभिव्यक्ती करता येणे म्हणजेच परिणामकारक संप्रेषण कौशल्य होय. आपण आपले विचार किती प्रभावीपणे व्यक्त करतो आणि ते दुसऱ्यांपर्यंत पोचवतो ही बाब आपल्या जीवनातील यश निश्चित करते. अपेक्षित असलेल्या पद्घतीने त्याचा संदेश ज्या वेळी स्वीकारला जातो, त्या वेळी परिणामकारक संप्रेषण घडते. परिणामकारक संप्रेषण ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. यामध्ये प्रेषक आपला संदेश प्रेषित करतो आणि प्राप्तकर्त्यास अशी खात्री करण्याची संधी असते की, पाठवणाऱ्याचा जो उद्देश होता त्याचप्रमाणे त्याला तो संदशे समजला आहे.
व्यक्ती व्यक्तींमधील सहसंबंध : व्यक्ती व्यक्तींमधील आदर, प्रामाणिकपणा, विश्वास यांवर परस्परसंबंध अवलंबून असतात. समजूतदारपणा, सहकार्य या आधारांवर परस्परांशी नाती जुळविली जातात. जेव्हा आपल्याला परस्पर संबंधाचे महत्त्व व फायदे जाणवतात, तेव्हा खरे परस्परसंबंध निर्माण होतात.
सर्जनशील विचार : काही तरी नवीन, उपयुक्त व असाधारण निर्माण करण्याचा विचार म्हणजे सर्जनशील विचार होय. जेव्हा एखादी व्यक्ती आजपर्यंत अस्तित्वात नसलेली एखादी गोष्ट शोधून काढते, तेव्हा त्यामध्ये सर्जनशीलता दिसून येते. ज्या वेळी एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करण्याची नवीन रीत शोधून काढते किंवा अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेचा नवीन गोष्टीच्या निर्मितीसाठी पूर्णपणे वापर करते, तेव्हा सर्जनशीलता अस्तित्वात येते.
चिकित्सक विचार : एखाद्या विषयाची विशिष्ट माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची विचार प्रक्रिया म्हणजे चिकित्सक विचार होय. चिकित्सक विचार हे तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतेची निर्मिती होय.
भावनांचे समायोजन : भावना हा शब्द कोणताही क्षोभ, मानसिक स्थैर्याचा भंग, सहनशीलता अथवा मनाची प्रक्षुब्धावस्था यांच्याशी संबंधित आहे. भावना समारात्मक असो की, नकारात्मक जर त्यांना विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ दिले, तर त्या अपायकारक ठरतात.
ताणतणावाचे समायोजन : एखादे कार्य करीत असतांना अनेक समस्या उद्भवतात व दडपण येते. जेव्हा अशी परिस्थिती नि‌र्माण होते, तेव्हा सामान्यपणे लोक तणावग्रस्त होतात. एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली राहिली, तर त्याचे पर्यावसान शारीरिक तसेच मानसिक स्वरूपाच्या अनेक समस्यांमध्ये होते. म्हणून ताणतणावाची यशस्वीपणे हाताळणी करण्याकरिता शिक्षणाची आवश्यकता आहे.
सर्व स्तरांतील अभ्यासक्रमांतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या वरील दहा जीवन कौशल्यांचा विकास होणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमाची रचना करतांना त्यांचा प्रामुख्याने विचार केला जात आहे.

वैशिष्टे :

व्यक्तींमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती आणि गुणवैशिष्ट्यांची जाणीव होण्यास मदत करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यात बदल घडवून आणण्यास प्रेरित करणे.
दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी व समस्या यांवर विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांमधून योग्य यशस्वी मार्ग काढण्यास समर्थ करणे.
परिसरातील माहिती, ज्ञान, इतरांचे चांगले विचार इत्यादी आत्मसात करून त्यानुसार स्वत:चे मत बनविण्यास, ते योग्यप्रकारे मांडण्यास आणि इतरांशी प्रभावी संवाद साधण्यास सक्षम करणे.
परिस्थितीची जाणीव करून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.
इतरांबद्दल कोणत्याही प्रकारे द्वेष, मत्सर, दूषित विचार मनात न बाळगता त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, सहानुभूती बाळगून समाजहिताची वृत्ती निर्माण होण्यास तसेच एकमेकांप्रती वैयक्तिक व सामाजिक संबंध निकोप ठेवण्यास प्रवृत्त करणे.
परिसरातील घटना, कृती, प्रसंग इत्यादींबाबत सहज व विचारपूर्वक निर्णय घेण्याची, तसेच ताणतणावविरहित जीवन जगता येण्याची क्षमता निर्माण करणे. त्याचप्रमाणे सखोल माहितीच्या आधारे घटनांचा विचार करून त्यावर तर्क, निष्कर्ष काढण्याची क्षमता निर्माण करणे.
आपल्या स्वत:च्या सुखदु:खाच्या प्रसंगात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे.
एखादी कृती, विचार हे पारंपारिकपणे मांडण्यापेक्षा त्यामध्ये नावीन्य, सोपेपणा, उत्साह निर्माण करून ते वेगळेपणाने मांडण्यास साह्य करणे इत्यादी.
विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य व्यक्तीला जीवन आणि शिक्षण यांची सांगड घालतांना जीवन कौशल्यांचा उपयोग होत असून त्यामध्ये आणखी मोठ्याप्रमाणात विकास होणे अपेक्षित आहे. यशस्वी जीवन जगण्यासाठी विचारपूर्वक शिक्षणाची, प्रशिक्षणाची व कौशल्य विकसनाची अत्यंत गरज आहे. तसेच जीवन कौशल्यांमुळे जीवन जास्तीतजास्त कार्यक्षमपणे व यशस्वीपणे जगता येते. विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण हे जीवनकेंद्रीत केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावात्मक व कार्यात्मक एकंदरीत सर्वांगिण विकास होण्यासाठी जीवन कौशल्यांचा विकास शाळांमध्ये, वर्गांमध्ये योग्य त्या वातावरण निर्माण करण्याची गरज असते.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये भारतीय शिक्षण पद्धतीत संभाव्य बदलावर काळानुरूप भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्ष २००९ पासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात दहा जीवन कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. आजच्या आधुनिक युगात व्यक्तीला प्रभावीपणे जीवन जगण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाद्वारे जीवन कौशल्यांच्या अध्यापनाची आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 22/7/2023
कर्म · 53715
0

संच किंवा घटकातून जीवन कौशल्ये रुजवण्यासाठी अध्ययन अनुभव:

विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये (Life Skills) विकसित करण्यासाठी विविध अध्ययन अनुभव (Learning Experiences) तयार करणे महत्त्वाचे आहे. खाली काही अध्ययन अनुभव दिले आहेत, जे संच (Set) किंवा घटकांच्या (Component) माध्यमातून जीवन कौशल्ये रुजवण्यास मदत करतील.

  1. समस्या-आधारित शिक्षण (Problem-Based Learning):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील समस्या (Real-life problems) गटांमध्ये सोडवण्यास सांगाव्यात.
    • कौशल्ये:
      • समस्या निराकरण (Problem-solving): समस्या ओळखणे, विश्लेषण करणे आणि उपाय शोधणे.
      • निर्णय घेणे (Decision-making): माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेणे.
      • सहकार्य (Collaboration): गटात काम करणे, विचारविनिमय करणे.
      • kritisheel चिंतन (Critical Thinking): माहितीचे विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढणे.
    • उदाहरण: शाळेच्या परिसरात कचरा व्यवस्थापनाची समस्या देणे आणि त्यावर उपाय शोधायला सांगणे.
  2. प्रकल्प-आधारित शिक्षण (Project-Based Learning):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना एखादा प्रकल्प (Project) पूर्ण करण्यासाठी देणे, ज्यात ते संशोधन (Research), नियोजन (Planning) आणि अंमलबजावणी (Implementation) करतील.
    • कौशल्ये:
      • वेळेचे व्यवस्थापन (Time management): वेळेनुसार काम पूर्ण करणे.
      • संघटन कौशल्ये (Organizational skills): माहिती आणि संसाधनांचे व्यवस्थापन करणे.
      • सर्जनशीलता (Creativity): नवीन कल्पना आणि उपाय शोधणे.
      • स्वयं-अध्ययन (Self-learning): स्वतःहून नवीन गोष्टी शिकणे.
    • उदाहरण: स्थानिक इतिहास (Local history) किंवा पर्यावरण (Environment) संवर्धन (Conservation) यावर आधारित प्रकल्प देणे.
  3. भूमिका-निर्वहन (Role-Playing):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना विविध भूमिका (Roles) देऊन त्या भूमिकांमध्ये संवाद (Communication) साधण्यास सांगणे.
    • कौशल्ये:
      • संप्रेषण (Communication): प्रभावीपणे बोलणे आणि ऐकणे.
      • सहानुभूती (Empathy): इतरांच्या भावना समजून घेणे.
      • संघर्ष व्यवस्थापन (Conflict management): मतभेद शांतपणे सोडवणे.
      • आत्मविश्वास (Confidence): स्वतःच्या मतांवर ठाम राहणे.
    • उदाहरण: ग्राहक आणि विक्रेता (Customer and seller), डॉक्टर आणि रुग्ण (Doctor and patient) अशा भूमिका देणे.
  4. गट चर्चा (Group Discussions):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयांवर गटांमध्ये चर्चा (Group discussion) करण्यास सांगणे.
    • कौशल्ये:
      • विचार मांडणे (Expressing thoughts): आपले विचार स्पष्टपणे मांडणे.
      • इतरांचे ऐकणे (Listening to others): इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकणे.
      • समन्वय (Coordination): गटात समन्वय साधून काम करणे.
      • भिन्न मतांचा आदर करणे (Respecting different opinions): इतरांच्या मतांचा आदर करणे.
    • उदाहरण: सामाजिक समस्या (Social issues), शिक्षण (Education) किंवा तंत्रज्ञान (Technology) यावर चर्चा आयोजित करणे.
  5. खेळ आणिsimulation (Games and Simulations):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना खेळ (Games) आणिsimulation मध्ये सहभागी करणे, जेथे ते निर्णय घेतात आणि परिणामांचा अनुभव घेतात.
    • कौशल्ये:
      • धैर्य (Courage): धोका पत्करण्याची तयारी.
      • सामूहिक जबाबदारी (Collective responsibility): गटाच्या यशासाठी काम करणे.
      • परिस्थितीचा अंदाज घेणे (Anticipating situations): भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेणे.
      • लवचिकता (Flexibility): बदलत्या परिस्थितीला जुळवून घेणे.
    • उदाहरण: व्यवसाय simulation games, team-building games.
  6. कला आणि craft (Arts and Crafts):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना कला आणि craft उपक्रमांमध्ये (Activities) सहभागी करणे, जेथे ते त्यांची सर्जनशीलता वापरू शकतात.
    • कौशल्ये:
      • सर्जनशीलता (Creativity): नवीन कल्पनांना मूर्त रूप देणे.
      • कल्पनाशक्ती (Imagination): नवनवीन कल्पनांचा विचार करणे.
      • एकाग्रता (Concentration): लक्ष केंद्रित करून काम करणे.
      • अभिव्यक्ती (Expression): भावना आणि कल्पना व्यक्त करणे.
    • उदाहरण: चित्रकला (Painting), शिल्पकला (Sculpture), नाटक (Drama).
  7. समुदाय सेवा (Community Service):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना समुदाय सेवा (Community service) उपक्रमांमध्ये सहभागी करणे, ज्यामुळे त्यांना समाजाची जाणीव (Awareness) होते.
    • कौशल्ये:
      • सामाजिक जाणीव (Social awareness): समाजातील समस्यांची जाणीव असणे.
      • जबाबदारी (Responsibility): समाजाप्रती जबाबदारी निभावणे.
      • समर्पण (Dedication): निस्वार्थपणे सेवा करणे.
      • संवेदनशीलता (Sensitivity): इतरांच्या भावना समजून घेणे.
    • उदाहरण: स्वच्छता मोहीम (Cleanliness campaign), वृक्षारोपण (Tree plantation), गरजू लोकांना मदत करणे.
  8. कथाकथन (Storytelling):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना कथा (Stories) सांगण्यास आणि ऐकण्यास प्रोत्साहित करणे, ज्यामुळे त्यांची भावनिक बुद्धिमत्ता (Emotional intelligence) वाढते.
    • कौशल्ये:
      • भावनिक बुद्धिमत्ता (Emotional intelligence): स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणे.
      • नैतिकता (Morality): चांगले-वाईट समजून योग्य आचरण करणे.
      • संवाद कौशल्ये (Communication Skills): प्रभावीपणे संवाद साधने.
      • सर्जनशीलता (Creativity): कथेला नवीन रूप देणे.
    • उदाहरण: प्रेरणादायी कथा (Inspirational stories), ऐतिहासिक कथा (Historical stories), काल्पनिक कथा (Fictional stories).
  9. तंत्रज्ञानाचा वापर (Use of Technology):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा (Technology) उपयोग करून नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करणे.
    • कौशल्ये:
      • डिजिटल साक्षरता (Digital literacy): तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे.
      • माहिती विश्लेषण (Information analysis): ऑनलाइन माहितीचे विश्लेषण करणे.
      • समस्या निराकरण (Problem-solving): तांत्रिक समस्या सोडवणे.
      • सहकार्य (Collaboration): ऑनलाइन साधनांचा वापर करून गटात काम करणे.
    • उदाहरण: ऑनलाइन संशोधन (Online research), शैक्षणिक ॲप्स (Educational apps), व्हिडिओ निर्मिती (Video creation).
  10. तज्ञांचे मार्गदर्शन (Expert Guidance):

    • अनुभव: विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील तज्ञांशी (Experts) संवाद साधण्याची संधी देणे.
    • कौशल्ये:
      • प्रश्न विचारणे (Asking questions
    उत्तर लिहिले · 25/3/2025
    कर्म · 980

Related Questions