गाव
भाषण
विकास
ग्राम विकास
गावाच्या सर्वांगीण विकास आराखड्यावर ग्रामसभेत भाषण करण्यासाठी शासनाची संहिता लिहा.
2 उत्तरे
2
answers
गावाच्या सर्वांगीण विकास आराखड्यावर ग्रामसभेत भाषण करण्यासाठी शासनाची संहिता लिहा.
2
Answer link
- शाश्वत ग्रामविकास
- गावाचा विकास आराखडा तयार करताना तो शाश्वत ग्रामविकास आराखडा असणं गरेजचं आहे. भावी पिढ्यांच्या गरजा भागवता याव्यात यासाठी आताच्या आपल्या गरजा सीमित ठेवून विकास करणं, पर्यावरण लक्षात ठेवून विकास करणं याला शाश्वत विकास आराखडा असं म्हणतात.
ग्रामविकास आराखड्यासाठी निधीचे स्रोत
1. ग्रामपंचायतीचा स्वनिधी विकास आराखड्यासाठी वापरता येतो. यात मालमत्ता कर, पाणी कर यांचा समावेश होतो.
2. दुसरा स्रोत म्हणजे राज्य शासनाकडून प्राप्त होणारा महसुली हिस्सा. यात जमीन महसूल उपकर, मुद्रांक शुल्क अनुदान, या राज्य शासनाच्या रकमांचा समावेश होतो.
3. मनरेगा योजनेअंतर्गत जी विकासकामं गावात घेतली जातात, त्याच्यासाठी मिळणारा जो निधी आहे, तो तिसरा प्रकार आहे.
4. वित्त आयोगाचा निधी ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठीचा महत्त्वाचा निधी आहे. चालू स्थितीत पंधराव्या वित्त आयोगाचा विचार करता येईल.
5. स्वच्छ भारत अभियान आणि त्याअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर होणारी कामं, त्याला प्राप्त होणारा निधीही यामध्ये येतो.
6. ग्रामपंचायतीला मिळणारी बक्षीसं आणि त्यातून येणारा निधी ग्रामविकास आराखड्यात वापरता येतो.
7. लोकसहभागातून मिळणाऱ्या वर्गणीचाही वापर करता
येतो.
ग्रामसभेचं महत्त्व
ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी गावपातळीवर संसाधन गट असला पाहिजे. यात गावातील शिक्षक, वकील, आरोग्याचे जाणकार, ज्येष्ठ नागरिक, अर्थशास्त्राचे प्राध्यापक, एनजीओचे प्रतिनिधी म्हणजे गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकारांना एकत्र करणं म्हणजे संसाधन गट होय. संसाधन गट आणि शासकीय कर्मचारी यांनी विचारमंथन करणं अपेक्षित असतं.
ज्या ग्रामसभेमध्ये अंतिम ग्रामविकास आराखडा मंजूर केला जातो त्याच्याआधी वेगवेगळ्या ग्रामसभा घ्याव्यात, असं शासनानं नमूद केलंय.
महिलांची ग्रामसभा ज्यात महिलांच्या समस्या घेतल्या जातील. बाल ग्रामसभा घ्यावी. यात प्राथमिक, माध्यमिक असे 18 वर्षांच्या खालील विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या समजतील.
वंचित घटकांची ग्रामसभा घ्यावी. त्यांचे प्रश्न, समस्या, निधी कसा उपलब्ध करून द्यायचा, हे समजतं. वॉर्डनिहाय ग्रामसभा घ्यावी म्हणजे यातून वॉर्डनिहाय प्रश्न समजून घेता येतात.
0
Answer link
विषय: गावाच्या सर्वांगीण विकास आराखड्यावर ग्रामसभेत भाषण
आदरणीय ग्रामस्थ,
आज आपण इथे गावाच्या सर्वांगीण विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. मला खात्री आहे की, आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागातून आपण एक उत्कृष्ट आराखडा तयार करू.
गावाच्या विकास आराखड्याची गरज:
- गावाचा विकास एका विशिष्ट दिशेने व्हावा.
- गावातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाव्यात.
- गावात रोजगार संधी निर्माण व्हाव्यात.
- गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व्हावे.
विकास आराखड्यामध्ये काय काय असावे:
- पायाभूत सुविधा: रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
- आर्थिक विकास: शेती, उद्योग, व्यवसाय, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांचा विकास करणे.
- सामाजिक विकास: शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बाल विकास, सामाजिक न्याय यावर भर दिला जाईल.
- पर्यावरण: पाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण यावर लक्ष दिले जाईल.
ग्रामसभेचे महत्त्व:
- ग्रामसभा हे गावातील सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
- ग्रामसभेत सर्वांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे.
- ग्रामसभेच्या माध्यमातून विकास आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाते.
माझी भूमिका:
- मी तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून काम करेन.
- तुमच्या सूचना आणि अपेक्षा शासनापर्यंत पोहोचवेन.
- विकास आराखडा तयार करताना पारदर्शकता आणि जबाबदारी जपली जाईल.
चला, आपण सगळे मिळून एक असा विकास आराखडा तयार करूया, ज्यामुळे आपले गाव एक आदर्श गाव बनेल.
धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!