2 उत्तरे
2
answers
बाल मानसशास्त्र म्हणजे काय?
1
Answer link
बालमानसशास्त्र (चाइल्ड सायकॉलॉजी). मानसशास्त्राची एक शाखा बालमानसशास्त्र म्हणजे मुलांच्या वर्तनाचा व शारीरिक-मानसिक विकासाचा शास्त्रोक्त अभ्यास.
बाल मानसशास्त्र हे एक व्यापक क्षेत्र आहे; ज्यात जन्मापासून ते पौगंडावस्थेपर्यंत मुलं कसे बदलतात; हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. 3 वर्षांची मुले, 7 वर्षांची मुले आणि किशोरवयीन मुलं; केवळ त्यांच्या अनुभवांमुळे भिन्न असतात. सर्वसाधारणपणे, हे मुलांच्या शारीरिक व संज्ञानात्मक विचार म्हणजे शिकणे, स्मरणशक्ती इ. आणि सामाजिक व भावनिक विकासावर आधारित आहे. बाल मानसशास्त्रज्ञ बालविकासाच्या प्रत्येक पैलूची; जाणीव करुन देण्याचा प्रयत्न करतात. ज्यात मुले त्यांच्या आसपासच्या लोकांकडून कसे शिकतात; विचार करतात, संवाद साधतात आणि भावनिक प्रतिसाद देतात, मित्र बनवतात, भावना समजून घेतात; आणि त्यांचे स्वतःचे विकसनशील व्यक्तिमत्व, स्वभाव आणि कौशल्ये समजून घेतात.
0
Answer link
बाल मानसशास्त्र हे मानसशास्त्राचे एक असे क्षेत्र आहे जे मुलांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासाचा अभ्यास करते.
यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- शारीरिक विकास: मुलांची वाढ आणि त्यांच्या शारीरिक क्षमतेचा विकास.
- मानसिक विकास: मुलांची विचार करण्याची, शिकण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता.
- भावनिक विकास: मुलांच्या भावना आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत.
- सामाजिक विकास: मुले इतरांशी कसे संबंध ठेवतात आणि सामाजिक नियम कसे शिकतात.
बाल मानसशास्त्रज्ञ मुलांच्या विकासातील समस्या ओळखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी काम करतात. ते पालक, शिक्षक आणि इतर व्यावसायिकांना मुलांना मदत करण्यासाठी मार्गदर्शन करतात.
अधिक माहितीसाठी आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:
- विकिपीडिया: बालमानसशास्त्र (Wikipedia)