अध्यात्म ध्यानधारणा

श्वासांत परमात्मा कसा ओळखावा?

2 उत्तरे
2 answers

श्वासांत परमात्मा कसा ओळखावा?

1
श्वासात परमात्मा कसा ओळखावा 

रोज सकाळी संध्याकाळी १०- १५ मिनिटे त्या ध्यानात रहा. सचैल स्नान करावे तसे. पाहू नका विकारांचेकडे हिप्नोटाईज करुन टाका विकारांना, विचारांना. एक कोणतीही जागा निवडा, शांतपणे, एकटेच बसता येईल, अशी घरातील जागा. तेथे आसनस्थ व्हा. शरीर स्थिर डोळे बंद. सुरुवातीला केवळ श्वास आत जातो, बाहेर येतो, याकडेच पहा. तोच सोऽहं ध्वनी समजा. श्वास हे जीवित आहेत की नाही, हे पाहाण्याचे साधन. हळुहळू श्वास घ्या, सोडा, तीही हळू सारे लक्ष त्या श्वासाकडेच ठेवा. ही ध्यानाची पहिली पायरी समजा. जसे तबला वाजविणारा सुरुवातीला ठाक ठाक करुन तबला हा स्वर संवादी होता की नाही, हे पाहातो. पण ती ठाक - ठोक म्हणजे तबल्याचे स्वर नाही. ती एक व्यवस्था आहे. संगीताकडे वाटचाल करण्याची. तसेच अगोदर शांतपणे बसा. मग श्वासाकडे पहा. तो प्रत्येक श्वास स्वतः अनुभवा हळुहळू तुमचे शरीर, मन स्थिर होत जाईल. कसलीही घाई करु नका. ध्यानात प्रतिक्षा आहे. अत्र अवतर, अवतर अत्र मम संन्निहितो भव भव त्या प्रभूंची हृदयात स्थापना करा. परमात्मा प्रभंचे येणेही पहा. त्या विशुध्द परमात्म्याचे आगमन पाहाणेही सुखाचे. अशी दृढ, स्थिर बैठक होत गेली की तुम्ही समाधीसाठी तयार झालात.

ध्यान समाधी साधताना तुम्हाला मन शरीर वासना विचार यांचा विरोध होईल पण

-

तिकडे लक्ष नका देऊ विचांराना रोकू नका. विरोध करु नका. संघर्ष नके जे येतात, ते

जातातही. शरीराला मनाला पीडा देत बसू नका. कारण तुमची आत्म उर्जा त्याच कामात खर्च

-

होऊन जाईल. राग आला, क्रोध आला, अहंकार आला तर केवळ त्योच येणे पहा. त्याच्या

परिवारात सामिल नका होऊ. मूल झोपी गेले की त्याची सारी खेळणी जवळच इतस्ततः पडलेली

दिसतात. तसे तुम्ही आता ध्यानात आहात. काही करीत नाही आहात.

विकार, वासना अति विचार यामुळे आत्मउर्जेचा नाश होतो. ते सारे आत्मप्रदूषक व चित्त प्रदूषक असतात. ते प्रदूषण घालवयाचे तर समाधी तंत्रातील एक एक श्लोक स्पष्टपणे हळूहळु म्हणावा. अर्थाकडे फार दुऊनका प्रत्येक श्लोक हा केवळ मंत्रच आहे, असे जाणा. तोच श्लोक २/३ वेळा म्हणावा तसे केल्याने चित्तशुध्दीचा । पर्गेशन्स ऑफ इमोशन) मार्ग शुध्द होतजातो. जे श्लोक सहज, सुलभ सोपे असतील ते पुनः म्हणावेत, प्रत्येक शब्द, ओळ याकडे सुरुवातीला कटाक्षाने लक्ष द्यावे. कशाचीही घाई / गडबड नसावी. ध्यानात हळुहळू आकंठ डुंबण्याची रीत सुलभतेने प्राप्त होईल.

ध्यान करताना मौन है महत्वाचे साधन आहे. बोलणे बंद. कुणाला काहीही सुचना देऊ नका. गोंगाट, गडबड जेथे नाही, अशीच अनुभवा. इतर सारे विचार / आकांक्षा हळुहळू निरस्त होत जातील. तणाव मुक्त ध्यान, तणाव रहित मौन हे अधिक उपयोगी, म्हणून धैर्य जीवन पध्दती. तुमचे मित्र आप्त इ. साऱ्यांचा तुमच्यावर प्रभाव प्रतीचे धैर्य, सहनशीलता है ध्यानाला सहाय्यक होतात.

ध्यान म्हणजे परमात्म्याच्या दिशेने होणारी यात्रा आहे. त्या यात्रेत तुम्ही एकटेच आहात. एकअयानेच जायचे आहे. हळूहळू सारी इंद्रिये, मन व त्यांचे सर्व विषय हे निरस्त करीत जातील.. केवळ तुम्हीच, एकटेच त्या यात्रेत आहात. डोळेही बंद व त्या डोळ्याने जे पाहात होता, बाहेरचे विश्व तेही बंद. गहन अंधारात तुम्ही प्रवेशत आहात. त्या अंधारात सारे विश्व बुडाले आहे. तेथे तुम्हीच काय ते प्रकाशमान आहात. अशी एकटेपणची एकत्वाची स्थिती येईल. ,

ध्यान ही क्रिया नाही, हे अगोदर घ्यानात घ्या. शरीर पूर्णतः शिथिल, शांत स्थिर व पूर्ण विश्रामात असावे. मनही तसेच. कसल्याही टोकाच्या भूमिकेत राहू नका. कारण मग तुम्ही परमात्म्च्या प्रत जाऊच शकणार नाही. म्हणून सारे ताण तणाव इच्छा, वासना, विचार यांना बाहेरच ठेवावे. ध्यान साध्य झाले वा नाही, याचाही विचार नको. केवळ एका शांत स्वभावात तुम्ही श्वास घेता आहात, तो श्वासही जाणवू घेत आहात, अनुभवत आहात . ध्यान प्रक्रियेत तन, मन विचार शांत होत जातील. प्रतिक्षा करा. घाई करु नका.

अगदी सुरुवातीच्या स्थितीत एखादया मंत्राचाही आश्रय घेतला तरी तो योग्य होय. उदाहरणार्थ ओम णमो अरिहंताणं हा मंत्र उच्चारत राहावा त्या मंत्राशी एकरूप व्हावे. सा-यआविचारांची चक्रे आपोआप थांबतील. काही दिवसांनी तुम्ही शांत होत आहात, तणावमुक्त होत आहात. स्थिर होत आहात.

या समाधि तंत्रातून हाच विचार मांडला आहे. शरीर व आत्मा एक आहे, ही भावना सर्वाची असते. म्हणून देह भिन्न, वेगळा, अशी मानसिक धारणा आचार्य तयार कतात. देह वेगळा, माझा आत्मा वेगळा अशा विचारांच्या लहरीी तयार होतहल. हळुहळू त्या विचारांच्या लहरी तयार 1 होतील. हळुहळू त्या विचारांची परिपक्वता, दृढता मनात निर्माण होईल. वेळ खूपच लागेल. असे समजा. पण अशी भाव स्थिती आतून हृढ होत जाईल. तशी भावस्थ्तिी पक्की व्हावी म्हणून आचार्यानी वेगवेगळे दृष्टांत, उदाहरणे दिली आहेत. त्यातून मन मोकळे होईल, प्रसन्न होईल व हळुहळू ते मनही शंत व निरस्त होईल. असा दृढ अभ्यास- साधना होत गेल्यावर तुम्ही समाधी तंत्रात प्रवेश करीत जाल.

अशी शांत अवस्था प्राप्त होत असताना समाधी शतकाचे भक्ती पूर्वक, तल्लीनतापूर्वक पठण करावे. जे श्लोक मनाला अधिक प्रिय अधिक प्रेरक असतील त्यांची निवड करावी व तेच श्लोक १० १५ नित्य म्हणत जावेत. सारेच श्लोक एकाच बैठकीत म्हटले पाहिजे असे नाही. जेवढे शक्य, तवेढे नित्य करावे. आपल्या ध्यान साधनेची चर्चाही कुणाशी करु नये. काय प्राप्त इ झाले हे देखील पाहत बसू नये. ध्यान व तुम्ही असे एकरुप णालात की मग ते ध्यान तुम्ही चालता बोलता वा इतर सा-या क्रिया करताना देखील सहज साध्य होईल. ध्यान सहज घडावे. कारण ध्यान करणारा व ध्यान दोन असणार नाहीत. असो.

तुमच्या जीवनात अशी ध्यान ज्योत पेटावी, तुमचे जीवन सुंदर, शांत प्रसन्न, निर्लेप व्हावे यासाठी हा छोटासा ग्रंथ तयार करुन तुम्हाला अर्पण केला आहे.


उत्तर लिहिले · 26/2/2023
कर्म · 53715
0

श्वासांमध्ये परमात्मा ओळखण्यासाठी, काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे:

  1. श्वासावर लक्ष केंद्रित करा:

    श्वासावर लक्ष केंद्रित करणे ही पहिली पायरी आहे. आपले लक्ष श्वासावर केंद्रित करा, श्वास कसा आत जातो आणि कसा बाहेर येतो यावर लक्ष ठेवा.

  2. श्वासाची जाणीव:

    श्वासाची जाणीव जागृत ठेवा. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या संवेदनांवर लक्ष ठेवा.

  3. विचार थांबवा:

    श्वासावर लक्ष केंद्रित करताना, मनात येणारे विचार थांबवण्याचा प्रयत्न करा. विचार थांबवणे हे ध्यानाचे महत्त्वाचे अंग आहे.

  4. श्वासातील लय:

    श्वासातील लय अनुभवा. श्वास नैसर्गिक गतीने चालू द्या, त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका.

  5. आत्म-अनुभूती:

    श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने हळूहळू आत्म-अनुभूती यायला लागते. ही अनुभूती परमात्म्याशीConnection साधण्यास मदत करते.

टीप:

  • हे एक ध्यान (Meditation) तंत्र आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या आत डोकावून पाहू शकता.

  • हे नियमितपणे केल्यास, तुम्हाला अधिक चांगली अनुभूती येऊ शकते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील पुस्तके आणि Websites चा वापर करू शकता:

  • भगवतगीता: भगवतगीतेत ध्यान आणि योगाबद्दल (Yoga) मार्गदर्शन दिलेले आहे.

  • पातंजली योग सूत्र: हे योग (Yoga) शास्त्रावरील एक महत्त्वाचे पुस्तक आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

गोसावी लागणे म्हणजे काय?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
ब्रह्मचर्य पालन केल्यावर नेमके काय फायदे होतात?
ब्रह्मचर्य पालन म्हणजे नेमके काय करावे?
जो व्यक्ती मनोभावे पूजा करतो, दानधर्म करतो, सरळमार्गी राहतो, भविष्याबद्दल विचार न करता दुसर्‍यांसाठी खिसा रिकामा करतो, तर त्याच्याच वाटेला दुःख आणि अडचणी का येतात?
देवाचे गुरू बृहस्पति यांचे मंदिर कोठे आहे?
स्वर्गात जागा बुक करणार्‍या व्यवसायाबद्दल माहिती द्या?