पर्यटन भूगोल उद्यान

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

2 उत्तरे
2 answers

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

0
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

बोरीवली
कान्हेरी लेणी
चांदोली राष्ट्रीय उद्यान

मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर (पण मुंबईच्या पंचक्रोशीत) हे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे क्षेत्रफळ १०४ चौरस किमी आहे. येथील कान्हेरी लेण्यांमुळे याला (कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ हे नाव पडले. ब्रिटिश आमदानीत वनविभागाची स्थापना झाल्यावर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचे "कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान" निर्माण झाले. १९७४ साली त्याचे नाव 'बोरीवली राष्ट्रीय उद्यान' असे झाले. १९८१ मध्ये नावात बदल परत एकदा बदल होऊन या उद्यानाला 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' असे नाव ठेवले..




संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

जैवविविधता
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे, विविध रंग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात बिबट्या हा या वन साम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक येथे वावरतो. तसेच मुंगूस, ऊदमांजर, रानमांजर, अस्वल, लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यतः करंज, साग, शिसव, बाभूळ, बोर, निवडुंग असून बांबूची बेटेनी आहेत.


विशेष
वसई खाडीला लागून उद्यानाचे 25 चौरस किलोमीटर क्षेत्राचे खारफुटीचे जंगल आहे. त्याला मंगलवन / वेलावन असे म्हणतात. खडकात कोरलेल्या कान्हेरी लेणी पहावयास मिळतात. बौद्ध काळातील ही लेणी दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली असून याठिकाणी 109 विहार आहेत.




सुविधा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परीक्षेत दर्शनाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असते. येथे प्रवेशासाठी प्रौढांना रु. २०/- तर लहान मुलांना रु. १०/- प्रवेशशुल्क आहे. पर्यटकांच्या वाहन थांब्यासाठी शुल्क आकारले जाते. सिंहविहार आणि वनराणी मिनी टॉय ट्रेन सफारींचे वेगळे शुल्क आकारतात. उद्यानात वननिवासाची सोय असून त्याकरिता विश्रामगृह आणि कुटिर पद्धतीची निवास व्यवस्था आहे.
उत्तर लिहिले · 15/2/2023
कर्म · 53815
0

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहराच्या उत्तरेकडील उपनगरात, बोरीवली येथे स्थित आहे.

हे उद्यान महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे.

हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जिथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात.

पत्ता: बोरीवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००६६

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5830

Related Questions

पर्यटन विषयक सरकारची भूमिका स्पष्ट करा.?
पर्यटनामुळे होणारे सामाजिक बदल स्पष्ट करा?
पर्यटनासाठीच्या वाहतूक विषयक माहिती सांगा.?
आपण केलेल्या पर्यटन स्थळांची माहिती सांगा?
पर्यटनाचे महत्त्व स्पष्ट करा?
पर्यटनाची व्याप्ती स्पष्ट करा?
तुम्ही भेट दिलेल्या कोणत्याही दोन पर्यटन स्थळांबद्दल माहिती लिहा?