2 उत्तरे
2
answers
लोक साहित्य म्हणजे काय ते थोडक्यात सांगून लोक साहित्याचे लक्षण कोणते आहे?
0
Answer link
लोकसाहित्याची लक्षणे
लोकसाहित्याचा अभ्यास हा कोणत्याही एका अंगाने न करता अनेक अभ्यासविषयाच्या साहाय्याने अनेक अंगांनी त्याचा अभ्यास करता येतो. त्यामुळे त्याची लक्षणेही अनेक आहेत. डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याची पुढील प्रमुख लक्षणे सांगितली आहेत.
● लोकसाहित्य मौखिक किंवा अलिखित स्वरूपात असते.
ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत याप्रमाणे चालत येते.
• परंपारिकता हा लोकसाहित्याचा महत्त्वाचा विशेष असतो.
• पूर्वकालीन संस्कृतीच्या अवशेषरूपाने जे समाजजीवन प्रचलित आहे, ते संस्कृतीचे किंवा पूर्वकालीन जीवनाचे अवशेष असले तरी मृत अवशेष नसतात, तर वर्तमानकालीन जीवनाच्या संदर्भात त्याला अर्थपूर्णता असते. यामुळेच या अवशेषांना सजीव अवशेष मानण्यात येते.
● ते लोकसमूहाचे किंवा समाजगटाचे असते. ती समूहाची निर्मिती असते. व्यक्तीने निर्माण केलेले असले तरी त्याला असे स्वरूप प्राप्त होते की ती व्यक्तीची निर्मिती न राहता सर्व समूहाची बनते. त्याचा मूळ निर्माता हा अज्ञात असतो. व्यक्तीचे व्यक्तिविशिष्टत्व त्यात व्यक्त न होता समूहविशिष्टत्व व्यक्त होते.
• लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार होतो. त्यामुळे ते लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे एक महत्त्वपूर्ण साधन असते. मौखिक संस्कृतीत सर्व काही लोकसाहित्यच असते.
• लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असते.
लोकसाहित्य हे भौतिक (Material) किंवा मनोमय स्वरूपात असते.
● लोकसाहित्यातून परंपरा टिकवणे आणि पुनरुज्जीवित करणे या क्रिया घडतात. त्यात पारंपरिकता आणि परिवर्तनशीलता असते.
• लोकसाहित्य हे लोकसमूहाच्या भ्रमातून किंवा आभाससृष्टीतून निर्माण झालेले असते.
● लोकसाहित्य हे लौकिकज्ञान असते. जे मानवाने युगायुगे घेतलेल्या अनुभवांचे साररूप असते. ते पारंपरिक ज्ञान असते.
● लोकसाहित्य हे कला व वाड्मय यांचे स्त्रोत असते.
• लोकसाहित्याचे संपादन, विकसन आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंतचे संक्रमण स्वाभाविकपणे व सहजपणे होत असते.
● लोकसाहित्याच्या अभ्यासाचा समावेशही लोकसाहित्यात होतो. इतिहासात ज्याप्रमाणे सामग्री आणि त्याचे अध्ययन या दोहोंचा समावेश असतो. त्याचप्रमाणे लोकसाहित्य या संकल्पनेत पारंपरिक लोकजीवनाचा विविध माध्यमांतून झालेला आविष्कार आणि त्यांचे अध्ययन या दोहोंचा अंतर्भाव होतो. म्हणूनच अध्ययन सामग्री आणि अध्ययन या दोहोंना लोकसाहित्य असेच म्हणतात. -
0
Answer link
sicher, मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात आनंद होईल.
लोक साहित्य:
लोक साहित्य म्हणजे लोकांच्या परंपरेतून निर्माण झालेले साहित्य. हे साहित्य पिढ्यानपिढ्या मौखिक स्वरूपात जतन केले जाते. यात लोकगीते, लोककथा, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, आणि पारंपरिक ज्ञान यांचा समावेश होतो.
लोक साहित्याची लक्षणे:
- मौखिक परंपरा: लोक साहित्य हे लेखी स्वरूपात नस्ता.
- सामूहिकता: हे साहित्य कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नस्ता, तर ते संपूर्ण समाजाचे असते.
- परिवर्तनशीलता: लोक साहित्यात काळानुसार बदल होतो.
- सादगी: लोक साहित्याची भाषा सोपी आणि सरळ असते.
- जीवनशैलीचे प्रतिबिंब: लोक साहित्यात लोकांच्या जीवनशैली, Reet रिवाजांचे प्रतिबिंब दिसते.