फरक मानसशास्त्र भावना

अभिनंदन व आभार यात फरक कोणता आहे?

2 उत्तरे
2 answers

अभिनंदन व आभार यात फरक कोणता आहे?

0
अभिनंदन म्हणजे स्पर्धेचा विजेता किंवा एखाद्याच्या कामाचं यश मिळाले तर त्याचा अभिनंदन केले जाते गुणवत्ता विद्यार्थ्यांना अभिनंदन केले जाते
आभार म्हणजे एखाद्याने आपले चांगले काम केले किंवा कोणी मदत केली तर त्याचेही आभार मानतात


अभिनंदन 
उत्तर ॲप वर राबविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या सर्व संयोजकांचे खूप खूप आभार आणि विशेष अभिनंदन,आपल्याकडून राबविले जाणारे उपक्रम हे अतिशय स्तुत्य आणि वाखण्याजोगे आहेत,माझ्यासारख्या असंख्य लिहिणाऱ्या ना व्यासपीठ दिल्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे.असेच नवनवीन उपक्रम राबवित रहा नव्या जुन्या सर्वानाच तुमच्या प्रेरणेची गरज आहे तुमच्या शाबासकीची गरज आहे....
त्याचबरोबर इथे लिहिणाऱ्या सर्व लेखकांचे मला आभार मानायचे आहेत,खूप सुंदर विषयावर अतिशय मार्मिक लिखाण करणाऱ्या सर्व लेखकांचे विशेष अभिनंदन,सगळेच लेखक कवी फार सुंदर लिखाण करत आहेत,स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देत आहेत त्याबददल हि सर्वांचे विशेष कौतुक, लिखाणाला सीमा नसावी सगळे विषय मांडावेत हे इथेच अनुभवायला मिळालं त्याचा अतीव आनंद आहे
त्याचप्रमाणे या स्पर्धेत नंबर येणाऱ्या सर्व स्पर्धकांचे अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन,असेच सुंदर लेखन करून आणखी यश आणि कीर्ती मिळवत रहा, लिखाणाचा आनंद घेत रहा,त्याचबरोबर सर्व वाचकांचे हि खूप खूप आभार वाचकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे लिहिण्याची प्रेरणा मिळते,वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियाच एक चांगला लेखक घडवतात, लाईक आणि कमेंट खूप मोलाचा आत्मविश्वास देऊन जातात.....
खरंच मनापासून वाटलं सगळ्यांना एकदा धन्यवाद द्यावेत म्हणून लिहिलं,कोणाचा उल्लेख बाकी असेल तर शेवटी आपणा सर्व सहभागी सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विशेष आभार
                                              धन्यवाद

आभार 


‘आभारी आहे’ किंवा ‘थँक यू’ हे आपल्या जीवनात नेहमी वापरले जाणारे शब्द आहेत. अगदी सकाळी घरातून बाहेर जाताना किंवा ट्रेनमधील मित्र, ऑफिसमधील मित्र रस्त्यावर जाता-येता आपल्याला मदत करणारी व्यक्ती अशा सर्वांचे आपण आभार मानतो. आपल्या घरी पेपर देणारा किंवा घराची रखवाली करणारा, आपल्या कामात मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आपण आभार मानत असतो. कळत नकळत दिवसातून अनेकवेळा आपल्याकडून ‘थँक यू’ म्हटलं जातं. कोणीतरी आपल्या मार्गावर सतत सावली बनून आपल्याला हात देत जगण्याचा मार्ग सुकर आणि आनंददायी करत असते. अशा व्यक्तीचे खरंतर आभार मानायलाच हवेत. आभार मानल्यामुळे आपल्याला आनंदी राहायला मदत होते. इतरांचे आभार मानण्याची सवय विकसित करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला मदत होते. जेव्हा एक व्यक्‍ती एखाद्या गोष्टीसाठी आभार व्यक्‍त करते तेव्हा तिला तर चांगलं वाटतंच, पण त्यासोबत ज्या व्यक्‍तीचे आभार मानले जातात तिलाही चांगलं वाटतं.
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे,…. ’ असं म्हटलं जातं आणि ते बरोबरच आहे. जेव्हा आपण आपल्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये जगणाऱ्या लोकांना बघतो तेव्हा जे आपल्याला मिळाले ते किती चांगले आहे त्याची जाणीव होते. खरंच, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा. खूप काही आपल्या पदरात नशिबाने पडलेले आहे. कदाचित त्या वेळी त्याची किंमत समजली नसेल पण ज्यावेळी ती व्यक्ती किंवा वस्तू आपल्यापासून दूर जाते तेव्हा त्याची किंमत आपल्याला समजते. म्हणून नेहमी जे आपल्याला लाभले त्याचा सन्मान करा, आभार व्यक्त करा. आपले आई-वडिल, गुरूजन, मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक यांचेही आभार मानायला हवेत. आपण खासकरून देवाचे आभार मानले पाहिजेत. यात काहीच शंका नाही, की त्याने आतापर्यंत आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक गरजा पूर्ण केल्या आहेत आणि तो आजही करत आहे. आभार मानण्याचं आणखी एक चांगलं कारण म्हणजे त्यामुळे मैत्रीचं नातं घट्ट होतं. लोकांनी आपली कदर करावी असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं. जेव्हा एखाद्याने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या कामाबद्दल आपण मनापासून त्याचे आभार मानतो तेव्हा आपल्यातलं मैत्रीचं नातं आणखी घट्ट होतं. आभार मानणारे लोक सहसा इतरांना मदत करणारेही असतात. लोक त्यांच्याशी दयाळूपणे वागत आहेत हे पाहून त्यांनाही इतरांशी दयाळूपणे वागण्याची प्रेरणा मिळते. खरंच, इतरांना मदत केल्यामुळे आपल्याही आनंदात भर पडते. हीच गोष्ट येशूनेही सांगितली आहे. घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे असं येशू म्हणतात.
आपल्या शरीराचे तर रोजच आभार माना. जर हे शरीर स्वस्थ नसेल तर जीवनाचा प्रवास कसा बरं चालेल? शरीराची साथ असेल तर सर्व काही प्राप्त करणे सहज शक्य आहे. ‘हेल्थ इज वेल्थ’, असं म्हटलं जातं. स्वास्थ्य ठीक नसेल तर छोटी छोटी कामे ही कठीण वाटू लागतात. म्हणून रोज शरीराशी संवाद साधा. प्रत्येक अवयवांना प्रेमाचा स्पर्श द्या, त्यांच्या स्वस्थ होण्याने मी किती सुखी आहे हे स्वतःला समजवा. असे केल्याने शरीराचे सर्व अंग नीट काम करू लागतील. जसे एखाद्या कंपनीचा मालक जर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन लहान मोठ्या सर्वांची काळजी घेत असेल तर ती कंपनी चांगली प्रगती करताना दिसते. तसेच शरीर ही आत्म्याची कंपनी आहे. आपण या तनाची चांगली देखभाल केली तर आपल्या कार्याची गती वाढून सर्वोपरी विकास होऊ लागेल. म्हणून शरीराचे आपल्या जीवनातले महत्व समजून त्याची काळजी घ्यावी. रोज मनापासून त्याचे आभार मानावेत.
वस्तु, पदार्थ, प्रकृती सर्वांची आवश्यकता आपल्याला आहे. त्यांच्या शिवाय आपले जीवन नीरस आहे. म्हणून त्यांना ही हृदयाच्या निर्मळ भावनांनी धन्यवाद द्यायला हवा. तसेच ज्या ईश्वराने वेळोवेळी आपल्याला मदत केली. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या अशा वेळी जीवन सुखांनी भरून टाकले त्याला कधीही विसरू नका. आभार व्यक्‍त करण्याच्या विषयावर अभ्यास करणाऱ्‍यांच्या मते आपण जेव्हा नेहमी आभार व्यक्‍त करतो तेव्हा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतो आणि त्यामुळे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला मदत होते. कृतज्ञ व्यक्‍ती जास्त आनंदी असते. तेव्हा, तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांवर मनन करा, तुमच्या जीवनातल्या चांगल्या अनुभवांबद्दल विचार करा आणि नेहमी आभार माना. हा लेख वाचणाऱ्यांचे मनापासून आभार...
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 53750
0

अभिनंदन आणि आभार यात काही महत्वाचे फरक आहेत, ते खालीलप्रमाणे:

अभिनंदन (Congratulations):
  • अर्थ: अभिनंदन म्हणजे कोणालातरी एखादे यश मिळाल्याबद्दल किंवा चांगली गोष्ट घडल्याबद्दल त्याचे कौतुक करणे.
  • कधी वापरतात: जेव्हा कोणीतरी परीक्षेत पास होतो, नवीन नोकरी मिळते, बढती मिळते, लग्न होते किंवा इतर कोणत्याही प्रकारची चांगली गोष्ट घडते, तेव्हा अभिनंदन केले जाते.
  • भावना: यात आनंद, कौतुक आणि प्रोत्साहन या भावना व्यक्त होतात.
  • उदाहरण: "तुमचं नवीन नोकरीसाठी अभिनंदन!"
आभार (Thank You):
  • अर्थ: आभार म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी केले, मदत केली किंवा आपल्याप्रती चांगली भावना दर्शवली, त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे.
  • कधी वापरतात: जेव्हा कोणी आपल्याला मदत करते, भेटवस्तू देते, आपल्यासाठी काहीतरी करते किंवा आपल्याप्रती दयाळूपणा दाखवते, तेव्हा आभार मानले जातात.
  • भावना: यात कृतज्ञता, आदर आणि appreciation या भावना व्यक्त होतात.
  • उदाहरण: "तुमच्या मदतीसाठी खूप खूप आभार!"
मुख्य फरक:
  • अभिनंदन हे यश किंवा चांगल्या गोष्टींसाठी देतात, तर आभार हे मदतीसाठी किंवा केलेल्या उपकारांसाठी मानले जातात.
  • अभिनंदनात कौतुक असते, तर आभारामध्ये कृतज्ञता असते.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2220

Related Questions

मी मोह मायेच्या दुनियेत हरवलो आहे का?
माणसा व्यतिरिक्त इतर सगळ्या सजीवांना, उदाहरणार्थ वृक्ष, वेली, झाडे, पशू, पक्षी, जनावरे यांना देखील माणसाप्रमाणेच 'अहंकार' किंवा अहंकाराची 'जाणीव' असते का?
भावनाशून्य माणसे असू शकतात का?
खरा आनंद म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो?
स्वतःच्या भावना समजून घ्यायला इतकं कठीण का वाटतं?
पराजय कोणाचा होतो खरा की खोट्याचा?
म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण काय?