ललित गद्य साहित्य

ललित गद्याचे घटक कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

ललित गद्याचे घटक कोणते आहेत?

0
मराठीत विपुल म्हणावी अशी ललित साहित्याची निर्मितीही होत नाही. निबंधापासून ते गुजगोष्टी, लघुनिबंध, ललितनिबंध. ललितगद्य ते मुक्तगद्य ह्या नावानी या लेखनाचा वेगवेगळ्या काळात निर्देश केला गेला आहे. आठवणी, व्यक्तिचित्रणपर, प्रवासकथन व आत्मपर स्वरूपातून तो आविष्कृत झालेला आहे.



समकाळातील ललितगद्यललेखनाविषयीची काही निरीक्षणे इथे नोंदविली आहेत. या साहित्यप्रकाराकडे तसे पाहिले तर फार गांभीर्याने पाहिले जात नाही. मराठीत विपुल म्हणावी अशी ललित साहित्याची निर्मितीही होत नाही.समकाळातील ललितगद्यललेखनाविषयीची काही निरीक्षणे इथे नोंदविली आहेत. या साहित्यप्रकाराकडे तसे पाहिले तर फार गांभीर्याने पाहिले जात नाही. मराठीत विपुल म्हणावी अशी ललित साहित्याची निर्मितीही होत नाही. निबंधापासून ते गुजगोष्टी, लघुनिबंध, ललितनिबंध. ललितगद्य ते मुक्तगद्य ह्या नावानी या लेखनाचा वेगवेगळ्या काळात निर्देश केला गेला आहे. आठवणी, व्यक्तिचित्रणपर, प्रवासकथन व आत्मपर स्वरूपातून तो आविष्कृत झालेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गो.वि.करंदीकर, श्रीनिवास कुलकर्णी, अनिल अवचट यांनी वेगळ्या प्रकारचे ललितगद्य लेखन केलेले आहे.
रानवाटा व जंगलसंवेदनेचे ललित या काळात लिहिले गेले. व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली ते मेघःश्याम कुंटे यांनी जंगलसृष्टीची व रानवाटेची असंख्य रूपे आपल्या लेखनातून व्यक्त केली आहेत. निसर्गवाचनाची संवेद्यरूपे त्यामध्ये आहेत. चर्चबेल पासून वाऱ्याने हलते रान पर्यंत ग्रेस यांच्या ललितगद्यलेखनाने वाचकांना आकर्षित केले आहे. दंतकथा, पुराणकथांचा वापर, देशोदेशींच्या साहित्यातील अवतरणे, संदर्भ, आत्यंतिक आत्ममग्न आत्माविष्कार व संमोहित शैलीचा प्रत्यय त्यांच्या लेखामध्ये आहे. प्रकाश नारायण संत यांनी कथा व ललित या प्रकारांच्या सीमारेषा धूसर करणारे ललितलेखन केले आहे. लंपन या बालमनाची निर्मिती करून त्याच्या कुतूहलपूर्ण जगाचे संवेदन या लेखनातून मांडले.
गेल्या तीनेक दशकात ग्रामीण संस्कृतीविषयीचे ललितलेखन मोठ्या प्रमाणात झालेले आहे. चंद्कुमार नलगे, महादेव मोरे, भास्कर चंदनशिव, द.ता.भोसले, इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, अशोक कोतवाल, सदानंद देशमुख, प्रतिमा इंगोले, संजीवनी तडेगावकर, कृष्णात खोत, प्रवीण बांदेकर, अशोक कोळी यांनी ग्रामीण संवेदनेचे ललितलेखन केले. या लेखनातून महाराष्ट्राचा विविध प्रदेश, निसर्ग व जीवनरीतीचे आविष्करण झाले आहे. मात्र यातले बरेच ललितलेखन हे स्मरणरंजनातून प्रकटलेले आहे. मंतरलेल्या दिवसांपासून ते मंतरकैफपर्यंतचा हा प्रवास आहे. भूतकाळाची कमालीची ओढ या ललितगद्यात आहे. गावाकडची माती, गावाकडची माणसं, आंब्या-फणसाचे दिवस, गावाकडच्या जत्रा, खमंग हुरडयाचे दिवस, म्हाईच्या दिवसाच्या खमंग आठवणी... या शीर्षकातून ते ध्वन‌ित झाले आहे. अलीकडच्या काळात हे ललितलेखन लोकसंस्कृतीच्या अंगानेही विकसित होत आहे. द.ता. भोसले, मुकुंद कुळे यांच्या लेखनातून या जाणिवेचे प्रकटीकरण होते. नाहीशा होत चाललेल्या लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा शोधण्याचे प्रयत्न या लेखनात आहेत. लोकसाहित्य व समाजशास्त्राला उपयुक्त ठरेल अशी माहिती या ललितलेखनात आहे.मराठीत जीवनसंबध्द ललितलेखनाची परंपरा फारशी नाही. कारण मराठी लेखकांवर वाङ्मयीन संस्कृतीच्या संकेतशरण व्यवस्थेचे मोठे ओझे असते. समाजवास्तव व समकालीनतेच्या विन्मुख राहिलेले ललित लेखनच मराठीत मोठ्या प्रमाणात आहे. तरीही अलीकडे जीवनसंबध्द, समूहनिष्ठ स्वरूपाचे ललितगद्य लिहिले जात आहे. अनिल अवचट, उत्तम कांबळे, रामनाथ चव्हाण, सुनीलकुमार लवटे ते अशोक पवार यांचे लेखन या प्रकारचे आहे. ललितगद्यातील 'मी'चा लोप करून लिहिले गेलेले हे लेखन आहे. अवचटांच्या लेखनातून सामाजिक जीवनातील विविधांगे वस्तुनिष्ठ अशा रिपोर्ताज शैलीतून व्यक्त झाली आहेत. वाचनीय असे हे मराठी गद्य आहे. अनेक फिरस्त्या समूहाच्या संवेदना या लेखकांच्या लेखनात आहेत. या पार्श्वभूमीवर अनिल सुर्डीकरांच्या 'गावगाडा-शतकानंतरचा' सारख्या लेखनात गावगाड्याचा नजीकचा इतिहास व वर्तमानाविषयीचे समाजशास्त्रीय कथन आहे.
अलीकडच्या काळातील ललितलेखनातून विविधक्षेत्री अनुभवांचे प्रकटीकरण होते आहे. वैद्यक क्षेत्रातील अनुभवापासून चित्रकला, चित्रपट अशा अनुभवक्षेत्रांचे हे प्रकटीकरण आहे. विशेषतः चित्रकला व चित्रपटविषयक लेखनास या काळात नवे धुमारे फुटले आहेत. यासंदर्भात अरुण खोपकर, प्रभाकर कोलते ते विजय पाडळकर यांचे लेखन महत्त्वाचे आहे. खोपकर यांनी अलीकडे केलेले लेखन कलाविषयक जाण समृद्ध करणारे आहे. चिंतनशीलता, जगभरातील वाङ्मयकलेचे संदर्भ, भाषेच्या यथार्थ वापरातून साकारलेले चिरेबंद स्वरूपाचे ललित लेखन त्यांनी केले आहे. जीवन जाणून घेण्याच्या प्रेरणेतून लिहिले गेलेले चिंतनशील स्वरूपाचे ललित लेखन वसंत आबाजी डहाके (यात्रा-अंतर्यात्रा, मालटेकडीवरून, गोष्ट : न सांगता येण्या‌विषयी) व महेश एलकुचवारांचा (मौनराग, पश्चिमप्रभा) अपवाद वगळता असे लेखन या काळात पाहायला मिळत नाही. एलकुंचवारांच्या ललितगद्य देशोदेशीच्या वाङ्मयाचे-कलांचे अनुभवसमृद्ध संदर्भ आहेत. डहाके यांच्या ललितगद्य लेखनात भूतकाळ व वर्तमानकाळाविषयीचे विशिष्ट मूल्यभान आहे. भाषेचा व कथनाचा लक्षणीय वापर या लेखनात आहे.मराठीतील ललितलेखन हे वृत्तपत्रांतून वा वाङ्मयीन नियतकालिकातून सदर रूपाने प्रकाशित झालेले आहे. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीय लेखनाची मर्यादा या लेखनाला आहे. तात्कालिक विषय तीमधून सतत आलेले आहेत. अपवाद काही दाखवता येतील. या काळात वैचारिक स्वरूपाच्या लेखनास विविध संदर्भ प्राप्त होत आहेत. अरुण टिकेकर, डॉ. सदानंद मोरे, जयदेव डोळे यांचे लेखन या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अरुण टिकेकरांचे सांस्कृतिक इतिहासाच्या व कालबदलाच्या पार्श्वभूमीवरील लेखन महत्त्वाचे ठरावे. तर सदानंद मोरे यांच्या लेखनातून आधुनिक महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जाणीवेचा प्रदीर्घ पट निष्पन्न झालेला आहे. अशी वैचारिक लेखनाची धारा या काळात निर्माण होते आहे. तसेच अरुणा ढेरे यांच्या ‘विस्मृतिचित्रे’ मधील लेखनाचे स्वरूपही याच प्रकारचे आहे. अशा विविध प्रकारच्या ललितलेखनातून विविध तऱ्हेची बोलीभाषा येते आहे. तावडी बोलीपासून ते कोकणी बोलींची रूपे आहेत. या ललितलेखनावर आधीच्या ललितगद्याच्या रूपाचा व वाङ्मयीन संकेतबध्द व्यवस्थेचा प्रभाव आहे.
तसेच या रूपात खुली लवचीकताही गृहीत धरलेली आहे. तसेच मराठी ललितगद्य हे नेहमी भूतकाळात रममाण झालेले आहे. त्यात स्मरणरमणीयता मोठ्या प्रमाणात आहे. व्यक्तिचित्रणपर व आत्मपर लेखनाचा या ललतिलेखनावर मोठा प्रभाव आहे. यातील 'मी' या लेखकांना सतत महत्त्वाचा वाटत आलेला आहे. तो आस्वादपर, काव्यात्मक व आत्मनिष्ठ स्वरूपाचा आहे. जीवनसंबध्दतेचा व चिंतनशीलतेचा मोठा अभाव यात आहे. वाङ्मयीन अभिरुचीचा व ललितगद्य निर्मितीचा जवळचा संबंध आहे. मध्यमवर्गीय वाङ्मयीन अभिरुचीचा तीवर मोठा प्रभाव आहे. मराठीतील ललितगद्यलेखन हे स्थिर अशा वाङ्मयीन संकेतशरण जाणिवांपुरते सीमित राहिले आहे. अलीकडे त्यास समूहनिष्ठ जाणिवेचा पदर प्राप्त झाला आहे. समकालीन मराठी ललितगद्य लेखनात वैचारिकता व व्यापक समाजदर्शनाच्या खुणा उमटत आहेत. काहीएक प्रमाणात तो सामाजिक व वैचारिक अंगाने विकसित होतो आहे. तसेच कलेविषयीचे प्रगल्भ स्वरूपाचे लेखन होते आहे.
उत्तर लिहिले · 22/2/2023
कर्म · 9415
0

ललित गद्याचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत:

  1. अनुभव: ललित गद्य हे लेखकाच्या स्वानुभवावर आधारित असते. लेखकाने अनुभवलेल्या गोष्टी, त्याचे विचार आणि भावना यातून व्यक्त होतात.
  2. कल्पना: ललित गद्यात लेखकाची कल्पनाशीलता महत्त्वपूर्ण असते. तो अनुभवांना आपल्या कल्पनेच्या रंगात रंगवून अधिक आकर्षक बनवतो.
  3. भावना: ललित गद्य भावनाप्रधान असते. लेखकाच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना, जसे की प्रेम, दुःख, आनंद, आश्चर्य, इत्यादी प्रभावीपणे व्यक्त केल्या जातात.
  4. भाषाशैली: ललित गद्याची भाषाशैली वैशिष्ट्यपूर्ण असते. अलंकारिक भाषा, विविध प्रतिमांचा वापर आणि लयबद्धता हे ललित गद्याला सौंदर्य प्रदान करतात.
  5. व्यक्तिनिष्ठता: ललित गद्य व्यक्तिनिष्ठ असते. लेखक स्वतःच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहतो आणि त्याचे अनुभव व्यक्त करतो.
  6. संवेदनशीलता: ललित गद्य संवेदनशील असते. लेखकाची संवेदनशीलता त्याला जगातील सौंदर्य, दुःख आणि वेदना जाणवून त्यांची अभिव्यक्ती करण्यास मदत करते.
  7. सर्जनशीलता: ललित गद्य हे लेखकाच्या सर्जनशीलतेचा आविष्कार आहे. तो आपल्या लेखणीतून नवीन विचार, कल्पना आणि भावनांना जन्म देतो.

या घटकांच्या आधारावर ललित गद्य वाचकाला एक वेगळा अनुभव देण्यास सक्षम असते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

ललित गद्याचे स्वरूप स्पष्ट करा?
ललित गद्य या साहित्य प्रकारची संकल्पना आणि स्वरूप समजावून सांगा?
ललित गद्याचे स्वरूप काय आहे?
ललित गद्य म्हणजे काय ते सांगून आधुनिक मराठीतील ललित लेखनाचा सविस्तर आढावा घ्या?
ललित गद्य म्हणजे काय ते सांगून गो. वि. करंदीकर व इरावती कर्वे यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये सांगा?
ललित गद्य म्हणजे काय ते सांगून गो. वि. करंदीकर व इरावती कर्वे यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
ललित गद्य म्हणजे काय?