मराठी भाषा

ललित गद्य म्हणजे काय ते सांगून गो. वि. करंदीकर व इरावती कर्वे यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

3 उत्तरे
3 answers

ललित गद्य म्हणजे काय ते सांगून गो. वि. करंदीकर व इरावती कर्वे यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

4

समकाळातील ललितगद्यललेखनाविषयीची काही निरीक्षणे इथे नोंदविली आहेत. या साहित्यप्रकाराकडे तसे पाहिले तर फार गांभीर्याने पाहिले जात नाही. मराठीत विपुल म्हणावी अशी ललित साहित्याची निर्मितीही होत नाही. निबंधापासून ते गुजगोष्टी, लघुनिबंध, ललितनिबंध. ललितगद्य ते मुक्तगद्य ह्या नावानी या लेखनाचा वेगवेगळ्या काळात निर्देश केला गेला आहे. आठवणी, व्यक्तिचित्रणपर, प्रवासकथन व आत्मपर स्वरूपातून तो आविष्कृत झालेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गो.वि.करंदीकर, श्रीनिवास कुलकर्णी, अनिल अवचट यांनी वेगळ्या प्रकारचे ललितगद्य लेखन केलेले आहे.

*******************************************



एखादा विषय,अनुभव यावर असलेले मुक्तचिंतन याला ललित गद्य म्हणता येईल. त्याचा फॉर्म आणि कंटेंट या दोन्हीवर कसलीही बंधने नाहीत. पण त्याला कथा-कादंबरीचे स्वरुप नसले पाहिजे
या क्षणी माबोवर 'ललित' या सदरात असलेले बरेच काही 'ललित गद्य' म्हणता येईल.
मला वाटतं काणेकरांनी वगैरे ललितलेखनाची अशी एक परंपरा रुजवणे चालु केले. चु भु द्या. घ्या.
काणेकर, कुसुमावती देशपांडे, इरावतीबाई, दुर्गाबाई, फडके, खांडेकर,(आनंदीगोपाळवाले) जोश्यांपासुन विंदा/शांताबाई आणि बोरकरांपर्यंत ते आताआतापर्यंतच्या टिपीकल दवणे, पिंगेंपर्यंत ललितलेखांचा सुळसुळाट झाला मराठी भाषेत. प्राध्यापकांची, टीकाकारांची प्रतिभा (कथा, कादंबरी, कविता, नाटक सारख्या साहित्यप्रकारांना)अपुरी पडली पण ललिताच्या फॉर्म ने त्यांना तारलं असावं, इतकं की ललितलेखन वॉनॉबे साहित्यिकांचे आणि प्राध्यापकांचे राखीव कुरण बनलं. पूर्वीचे ललितनिबंध तसे ठाशीव वाटतात. ते साधारण विषयाभोवती रिंगण घालतात, म्हणुनच लघुनिबंधात त्यांचे बीज आढळते. अलिकडचे नुसते भाषेची वीण उलट सुलट घालतात. स्मृतीरंजनाच्या शिळ्या कढीला बरंका कोणाचे तरी काहीतरी वाक्याची फोडणी घालावी, चांगली संस्कारांची उकळी आणावी आणि वर गोडगोड शब्दांची कोंथींबीर भुरभुरावी- झाले ललित तयार
उत्तर लिहिले · 13/5/2022
कर्म · 53700
0
नाशिक
उत्तर लिहिले · 13/5/2022
कर्म · 0
0
ललित गद्य म्हणजे काय:

ललित गद्य म्हणजे एक प्रकारचे लेखन आहे, ज्यामध्ये लेखक आपल्या भावना, विचार आणि कल्पनांना सुंदर आणि कलात्मक पद्धतीने व्यक्त करतो. हे गद्य वाचकाला आनंद देणारे, विचार करायला लावणारे आणि त्याला वेगळ्या जगात घेऊन जाणारे असते. ललित गद्यामध्ये भाषेचा वापर सौंदर्यपूर्ण असतो आणि लेखकाचा दृष्टिकोन विशेष महत्त्वाचा असतो.

गो. वि. करंदीकर यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये:
  • अनुभव आणि चिंतन: करंदीकरांच्या ललित गद्यात त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचे आणि चिंतनाचे मिश्रण असते. ते जगाकडे अधिक सूक्ष्मपणे पाहतात आणि त्या अनुभवांना शब्दांत मांडतात.
  • भाषाशैली: त्यांची भाषाशैली सोपी पण प्रभावी असते. ते कमी शब्दांत खूप काही सांगून जातात. त्यांच्या लेखनात लय आणि संगीत असतो.
  • विषयांची विविधता: करंदीकरांनी विविध विषयांवर लेखन केले आहे, जसे निसर्ग, माणसे, समाज आणि जीवन. त्यांच्या लेखनात एक प्रकारची सामाजिक जाणीव असते.
इरावती कर्वे यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये:
  • संस्कृती आणि समाज: इरावती कर्वे यांनी मुख्यतः संस्कृती, समाज आणि मानववंशशास्त्र यांवर लेखन केले. त्यांच्या ललित गद्यात भारतीय समाजाचे आणि संस्कृतीचे सखोल निरीक्षण असते.
  • विश्लेषणात्मक दृष्टी: त्यांचे लेखन केवळ भावनांवर आधारित नसते, तर त्यामध्येObject reference not set to an instance of an object. समाजाचे विश्लेषण असते. त्याObject reference not set to an instance of an object. प्रत्येक गोष्टीकडेObject reference not set to an instance of an object. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतात.
  • भाषा आणि शैली: त्यांची भाषाशैली स्पष्ट आणि नेमकी असते. त्या क्लिष्ट कल्पनांना सोप्या शब्दांत समजावून सांगतात. त्यांच्या लेखनात माहिती आणि विचार यांचा समन्वय असतो.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860

Related Questions

भैयाजी जोशी यांनी मराठीविरोधात काय वक्तव्य केले?
व्यावसायिक बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे या विधानाची माहिती स्पष्ट करा?
व्यावसायिक बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे, या विधानावर सविस्तर चर्चा करा.
मराठी भाषा आणि संगणक यांची मैत्री कशी घडवून आणता येईल?
मराठी भाषा कोणी लिहीली?
व्यावसायिक बोली मराठी भाषा समृद्धी झाली आहे या विधानाची थोडक्यात माहिती?
निमंत्रण पत्राला उत्तर कसे देतात?