संस्कृती सण

मकर संक्रांत या दिवशी काळे कपडे का घालतात?

2 उत्तरे
2 answers

मकर संक्रांत या दिवशी काळे कपडे का घालतात?

2


मकरंसंक्रांत या दिवशी काळे कपडे का घालतात




 भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो. विशेषत: सण-उत्सव, लग्न सोहळ्याला काळ्या रंगाचे कपडे वापरत नाहीत, पण तरीही संक्रांतीला काळ्याच रंगाचे कपडे घातले जातात. या मागे नक्की काय कारण आहे? चला तर मग जाणून घेऊ या.
हिंदू धर्मात प्रत्येक सणाला काही ना काही महत्त्व आणि शास्त्रीय कारणे आहेत. संक्रांत सणाला ऋतुमानानुसार वेगळे महत्व प्राप्त आहे. 
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो असे ज्योतिषशास्त्रामध्ये मानले जाते. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच संक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते. मोठ्या काळोख्या रात्रीला निरोप देण्यासाठी काळे कपडे घातली जातात. संक्रांतीला काळे कपडे वापरण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो. पांढरा रंग कसा उष्णता शोषून घेत नाही, तसा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे  म्हणजे संक्रांतीला काळे कपडे वापरतात. तसेच तिळ खाल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्यास उपयुक्त ठरतात त्यामुळे  सांस्कृतिक तिळगुळ खाल्ला जातो. आजच्या काळात आता काळ्या रंगाकडे शुभ अशुभ या पलिकडेही पाहिले जाते. आता  संक्रांती शिवाय देखी काळ्या रंगांचे कपडे वापरले जातात. त्यामुळे मुलींची खासकरून काळ्या रंगाला पसंती असते. आता मुलांना देखील काळा रंग उठून दिसतो. आता काळ्या रंगाकडे फॅशन म्हणून पाहिले जात आहे.
उत्तर लिहिले · 13/1/2023
कर्म · 53710
0

मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालण्याची प्रथा आहे, याचे काही कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत:

  • उष्णता: काळा रंग उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांतीचा सण साधारणपणे थंडीच्या दिवसात येतो, त्यामुळे काळे कपडे घातल्याने शरीराला उष्णता मिळते.
  • नकारात्मक ऊर्जा: असे मानले जाते की काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि आपले वाईट नजरेपासून संरक्षण करतो.
  • शक्ती आणि समृद्धी: काही समुदायांमध्ये काळा रंग शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
  • महाराष्ट्रीयन परंपरा: महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी महिला काळ्या रंगाची साडी परिधान करतात.

याव्यतिरिक्त, काही लोकांचे असे मत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते, कारण हा दिवस नवीन सुरुवात आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे.

टीप: काही ठिकाणी काळे कपडे अशुभ मानले जातात, त्यामुळे स्थानिक मान्यतांनुसार निर्णय घेणे उचित ठरते.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1780

Related Questions

जगातील सर्वात छोटे मंदिर कोणते?
राम राम चा उच्चार काय होतो?
ग्रामीण देवळांचे महत्त्व थोडक्यात लिहा?
कोरकू जमातीच्या कुल संघटनावर थोडक्यात माहिती लिहा?
चार आश्रमा विषयी माहिती द्या?
धर्म आणि संस्कृती यांचे परस्पर संबंध सांगा?
वैदिक लोकांच्या देवदेवता स्पष्ट करा?