लोकशाही

लोकशाही मध्ये लोकमताला महत्व असते का?

1 उत्तर
1 answers

लोकशाही मध्ये लोकमताला महत्व असते का?

0
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. परंतु लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर लोकशाही म्हणजे, प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य. लोकशाही हा ‘डेमॉक्रसी’ या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द. डिमॉस (Demos) म्हणजे सामान्य लोक आणि क्रसी (Cracy) म्हणजे सत्ता. अथेन्समध्ये लोकशाही राज्यपद्धतीचं बीज आढळतं. ग्रीकांप्रमाणे प्राचीन रोमनांनी प्रजासत्ताकाद्वारे रोममध्ये लोकशाहीचा प्रयोग केला. लोकशाहीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार सामान्यतः मानले जातात. आधुनिक काळात ‘लोकशाही’ हा शब्दप्रयोग सामान्यपणे अप्रत्यक्ष लोकशाही या अर्थानेच केला जातो. पण स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांतून मात्र प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्षातून काही दिवस सर्व नागरिक एकत्र जमतात. यावेळी सर्वच विधेयकं चर्चेसाठी जनतेपुढे ठेवण्यात येतात आणि बहुमताने निर्णय घेतात. ही पद्धत ऑस्ट्रेलियाच्या संविधानातही नमूद केलेली आहे; परंतु तिचा प्रामुख्याने उपयोग संविधान दुरूस्तीच्या संदर्भातच करण्यात येतो.
उत्तर लिहिले · 9/1/2023
कर्म · 7440

Related Questions

समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकशाही आवश्यक आहे सkaran?
'संज्ञापन क्रांती' आणि 'लोकशाही' या दोहोतील स्वरूपा (परिणामा) विषयी माहिती?
Sadnyapan क्रांतिसंज्ञापन क्रांती आणि लोकशाही संज्ञापन क्रांती प्रज्ञापन क्रांती म्हणजे काय?
संज्ञापन क्रांती आणि लोकशाही या दोहोतील स्वरूप विषयी माहिती लिहा.?
‘संज्ञापन क्रांती’ आणि ‘लोकशाही’ या दोहोतील स्वरुपा (परिणामा) विषयी माहिती मिळेल का?
लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता हे एकमेकांना कसे आहेत?
संज्ञापन क्रांती व लोकशाही?