2 उत्तरे
2 answers

आई म्हणजे काय?

0


.




आई


आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलाला भरपूर प्रेमळ काळजी देते. मूल म्हणजे आईसाठी सर्वकाही.[१]


स्टाग्लियानोच्या स्मारक स्मशानभूमीत मुलांसह आईची प्रतिमा
ती एक चांगली श्रोता आहे आणि आम्ही म्हणत असलेल्या आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ऐकत आहे. ती आम्हाला कधीही रोखत नाही आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला बांधत नाही. ती आम्हाला चांगल्या आणि वाईट मधील फरक शिकवते. आई आम्हाला प्रत्येक आनंदात आणि दुःखात मदत करते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आपल्यासाठी रात्रभर जागी राहते आणि आपल्या चांगल्‍या आरोग्‍यासाठी देवाची प्रार्थना करते.

शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते.

आई ही शांतादुर्गा चे रूप आहे, जी प््ऐ मराठी भाषेतला "आई" हा आई मायेचा सागर आहे.या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक कविता रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
आई
किती करावे तुझे कौतुक

शब्द अपुरे पडती माझे।

परतफेड नाही करू शकत

त्या उपकारांची तुझे ।।

 

अमृतवाणी मला तू

पाजीलास ग पान्हा।

जसे यशोदेच्या मांडीवर

कृष्ण बाळ तान्हा।।

 

गुण अवगुणांचा माझ्या

केला तू विलय।

सर्व गुन्हे माफ होती

असे तुझे न्यायालय।।

 

तुझ्या कुशीतली झोप

आजच्या संसारात नाही।

पुढचा जन्मही तुझ्या गर्भात मिळो

हि वाट मी पाही।।

 

जगावे पुन्हा पुन्हा

येऊनी तुझ्या मी पोटी।

सर्वच दुनिया तुझ्या विना

वाटे मला खोटी।।

 

तूच माझ्या जीवनाची

पालटलीस ग काया।

साष्टांग नमन करुनी

पडतो तुझिया पाया।।

 

प्रेम तुझे आहे आई

या जगाहून भारी।

म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा

आई विना भिकारी।।

 

म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा

आई विना भिकारी।।

 
उत्तर लिहिले · 20/12/2022
कर्म · 53750
0
आई म्हणजे काय हे सांगणे खूप कठीण आहे, तरीही काही माहिती खालीलप्रमाणे:

आई: आई हा शब्दच खूप मोठा आहे. आई म्हणजे प्रेम, वात्सल्य, त्याग आणि समर्पण. आई आपल्या मुलांसाठी सर्वस्व असते. ती आपल्या मुलांवर নিঃस्वार्थ प्रेम करते आणि त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकायलाही तयार असते.

आईची भूमिका: आई आपल्या मुलांची पहिली शिक्षक असते. ती त्यांना जगायला शिकवते, चांगले संस्कार देते आणि त्यांच्यावर प्रेम करते. आई आपल्या मुलांसाठी एक आधारस्तंभ असते. ती त्यांना नेहमी साथ देते आणि त्यांच्या अडचणींमध्ये मदत करते.

आईचे महत्त्व: आईचे महत्त्व शब्दात सांगणे शक्य नाही. आई आपल्या जीवनातील एक अनमोल व्यक्ती असते. तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

आई विषयी काही विचार:

  • आई म्हणजे मंदिराचा कळस.
  • आई म्हणजे वात्सल्याचा सागर.
  • आई म्हणजे त्यागाची मूर्ती.
  • आई म्हणजे जीवनातील आनंद.

थोडक्यात, आई म्हणजे प्रेम, वात्सल्य, त्याग आणि समर्पणाचा सागर!

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5160

Related Questions

आई दिनांक 25/11/25 मंगळवार संधयाकाळी 8.45 रोजी मयत झाली तो दिवस हिंदू धर्म शास्त्रानुसार मृतात्म्यासाठी व कुटुंबासाठी कसा होता त्याची माहिती मिळेल का?
आई दिनांक 25/11/25 मंगळवार संधयाकाळी 8.45 रोजी मयत झाली तो दिवस मृतात्म्यासाठी व कुटुंबासाठी कसा होता त्याची माहिती मिळेल का?
आधी कुटुंब संस्था?
सुतक साधारण किती पिढ्यांपर्यंत पाळावे?
आपल्या मुलीचा जर वाढदिवस असेल तर आपण तिला कशा शुभेच्छा द्याव्यात?
एकाच दिवशी दोन्ही बहिणींचा वाढदिवस असेल तर कोणकोणत्या शुभेच्छा द्याव्यात?
आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे हे समजून आपण तिला कोणकोणत्या शुभेच्छा देऊ?