क्रीडा खेळाडू धावणे

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये पदक हुकले, तो प्रकार कोणता होता?

2 उत्तरे
2 answers

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये पदक हुकले, तो प्रकार कोणता होता?

0
मिल्खा सिंग यांनी 1965, 1960 आणि 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. यात 1960 ला झालेल्या रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंह 400 मीटरच्या अंतिम शर्यतीत फक्त 0.01 सेंकदामुळे पराभूत झाले होते. तेव्हा मिल्खा सिंगच सुवर्णपदक जिंकतील असं वाटत होतं. अगदी शर्यतीत ते पुढेही होते. पण अखेरच्या क्षणी ते चौथ्या स्थानावर राहिले.
             रोम ऑलिम्पिकच्या पाचव्या हिटमध्ये मिल्खा सिंग हे दुसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्येही त्यांनी दुसरं स्थान कायम राखलं. सेमीफायनलनंतर फायनल दोन दिवसांनी झाली होती. या शर्यतीत कार्ल कॉफमॅन पहिल्या लेनमध्ये तर अमेरिकेचे ओटिस डेव्हिस हे दुसऱ्या लेनमध्ये होते. मिल्खा सिंग पाचव्या आणि जर्मनीचा धावपटू सहाव्या लेनमध्ये होते. फायनल शर्यतीत मिल्खा सिंग 200 मीटरपर्यंत पुढे होते. त्याचेवळी आपण वेगानं धावत आहे आणि शर्यत पूर्ण करता येणार नाही अशी शंका आली. त्यामुळे आपला वेग कमी केल्याचं मिल्खा सिंग यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. तसंच एकदा मागे वळून पाहिलं होतं. त्यानंतर तीन ते चार खेळाडू त्यांच्या पुढे निघून गेले. मिल्खा सिंग यांनी त्यानंतर पुढे जाण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र तोपर्यंत शर्यत संपली होती.
उत्तर लिहिले · 16/12/2022
कर्म · 5510
0

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक (Bronze medal) अत्यंत थोडक्या फरकाने हुकले.

निकाल:

  1. ओटिस डेव्हिस (अमेरिका): 44.9 सेकंद (सुवर्णपदक)
  2. कार्ल कॉफमन (जर्मनी): 44.9 सेकंद (रौप्यपदक)
  3. मिल्खा सिंग (भारत): 45.6 सेकंद

मिल्खा सिंग यांचा फोटो फिनिशमध्ये पराभव झाला आणि ते चौथ्या स्थानी आले.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3480

Related Questions

सराव नसताना 17 वर्षाखालील गटातील लांब उडी 4.20 मीटर जाते, तर सराव करून अंदाजे किती लांब जाईल?
आशिया कप कोणी जिंकला?
पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धा 2025 विजेती?
पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धा 2025?
पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धा?
तुम्हाला माहित असलेल्या धावपटूंची नावे लिहा. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत?
तुमच्या शाळेतील खो-खो खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.?