भूगोल रेखांश

रेखावृत्ते म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

रेखावृत्ते म्हणजे काय?

4
पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताचा रेखांश शून्य समजतात. त्याच्या पूर्वेकडे पूर्व रेखांश आणि पश्चिमेकडे पश्चिम रेखांश असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव होत.

           
 
                               पृथ्वीवरील रेखावृत्ते दर्शवणारी आकृती


अक्षांशाप्रमाणे एका रेखांशाचेही साठ समान भाग करतात. त्या प्रत्येक भागाला एक मिनिट (') म्हणतात. एका मिनिटाचे साठ भाग केल्यास प्रत्येक भाग हा एक सेकंद (") मोजमापाचा होतो.


धन्यवाद...!!
उत्तर लिहिले · 9/10/2022
कर्म · 19610
1
रेखावृत्ते म्हणजे पृथ्वीवरील काल्पनिक रेषा होय.
उत्तर लिहिले · 7/10/2022
कर्म · 740
0

रेखावृत्ते:

रेखावृत्ते म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्तर-दक्षिण दिशेने असणाऱ्या काल्पनिक रेषा आहेत. ह्या रेषा उत्तर ध्रुवापासून सुरू होऊन दक्षिण ध्रुवावर संपतात. प्रत्येक रेखावृत्त हे पृथ्वीच्या मध्यामधून जाते.

महत्वाची रेखावृत्ते:

  • शून्य अंश रेखावृत्त (Prime Meridian): या रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त देखील म्हणतात. हे रेखावृत्त इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेतून जाते.
  • १८० अंश रेखावृत्त (International Date Line): या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात. या रेषेच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील वेळेत २४ तासांचा फरक असतो.

रेखावृत्तांचे उपयोग:

  • रेखावृत्तांचा उपयोग ठिकाणांचे स्थान निश्चित करण्यासाठी होतो.
  • रेखावृत्तामुळे दोन ठिकाणांमधील वेळेचा फरक काढता येतो.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

दोन लगतच्या एक अंश अंतरावरील रेखावृत्तांमध्ये किती मिनिटांचा फरक असतो?
पृथ्वी वरील दोन रेखावृत्ता मधील अंतर किती आहे?
पृथ्वीवरील दोन रेखावृत्त तील अंतर?
पृथ्वीवरील दोन रेखावृत्तांमधील अंतर किती कि.मी. आहे?
जगाच्या नकाशावर प्रत्येक 1 अंशाने काढलेल्या रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते?
1 तासात किती रेखावृत्त सूर्यासमोरून सरळ रेषेत जातात?
मिर्झापूर येथील रेखावृत्ताचे अंशात्मक मूल्य किती आहे?