मनोरंजन चित्रपट वैद्यकीय

लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्तला कोणता आजार झालेला आहे, ज्यात त्याला महात्मा गांधी दिसत होते? असा आजार खरंच होऊ शकतो काय?

2 उत्तरे
2 answers

लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्तला कोणता आजार झालेला आहे, ज्यात त्याला महात्मा गांधी दिसत होते? असा आजार खरंच होऊ शकतो काय?

3
लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्तला  स्किझोफ्रेनिया हा आजार दाखवला आहे.
हो, असा आजार होऊ शकतो. त्यावर उपचारही आहे.
स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार असून त्यामुळे भास, भ्रम, गोंधळलेली विचार पद्धती आणि वर्तन यामध्ये परिणाम जाणवतात. या आजाराची सुरूवात तरूणपणात होते. हा आजार दीर्घकालीन असला तरी योग्य आणि लवकर उपचार केल्यास रूग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो.
आरोग्य मंत्र स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार असून त्यामुळे भास, भ्रम, गोंधळलेली विचार पद्धती आणि वर्तन यामध्ये परिणाम जाणवतात. या आजाराची सुरूवात तरूणपणात होते. हा आजार दीर्घकालीन असला तरी योग्य आणि लवकर उपचार केल्यास रूग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. लक्षणं : अभ्यासात एकदम मागे पडणं, विनाकारण चिडचिड, एकलकोंडेपणा, स्वतःकडे नीट लक्ष न देणं, स्वच्छता न पाळणं, (अंघोळ रोज न करणं) याच बरोबर विचित्र भास होणं, मनात शंका संशय येणं, स्वतःशी पुटपुटणं, हातवारे करणं अशी लक्षणे जर ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ जाणवली तर याला ‘स्किझोफ्रेनिया’ आजार झाला आहे असं म्हणता येईल. ज्या अस्तित्त्वात नाहीत अशा गोष्टी ऐकणं किंवा दिसणं (भास) समज किंवा अनुभव याचा चुकीचा अर्थ लावणं, शंका संशय, कोणी करणी केली आहे किंवा माझे विचार इतरांना समजतात. डोक्यात/अंगात काही चिप्स लावून इतर लोक माझ नियंत्रण करतात. कॅमेरे लावलेत माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी इत्यादी विचार जाणवतात. रोजच्या क्रिया, अंघोळ, जेवण, स्वच्छता यामध्ये स्वारस्य नसणं, भावनांचा अभाव किंवा कधी अतिरेक-उद्रेक-चिडचिड योजना आखण्यामध्ये कमतरता, स्वतःहून काही करण्याची इच्छाशक्ती कमी होणं अशी लक्षण दिसू शकतात. कारणं : मुख्यतः आनुवंशिकता, मेंदूत होणारे रासायनिक बदल आणि आजूबाजूची परिस्थिती (ताणतणाव, गांजा सारख्या अमलीपदार्थाचे व्यसन, जन्माच्या वेळी काही त्रास इ.) घरात, जवळच्या नातेवाईकांमध्ये आजार असल्यास तर शक्यता वाढते. आई वडिलांपैकी कोणाला असेल तर १० ते २० टक्के आजार होण्याची शक्यता असते. मेंदूमधील डोपामाईन नावाचे रसायनाचे प्रमाण वाढल्यास त्रास होऊ शकतो. उपचार : जरी आजार गंभीर असला तरी लवकर निदान होऊन योग्य, दीर्घकालीन उपचार आणि जीवनशैलीमधील बदल केल्यास रूग्ण सर्वसामान्य जीवन जगू शकतो. ३०-४० टक्के रूग्ण पूर्णपणे बरे होतात. ३०-४० टक्के रूग्णांमध्ये मधून-मधून लक्षणं जाणवतात. २० टक्के रूग्ण मात्र पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत आणि त्यांना आयुष्यभर उपचार सुरू ठेवावे लागतात. उपचारपद्धतीत प्रामुख्याने औषधोपचार (अँटीसायकोटीक)चा वापर केला जातो. आधुनिक औषधांनी आजार त्वरित आटोक्यात येऊ शकतो. जर औषधांनी फरक पडला नाही किंवा रूग्ण खूपच हिंसक झाला किंवा औषधोपचार घेण्यास नकार दिल्यास रूग्णालयात दाखल करून इ.सी.टी. (इलेक्ट्रोकल्टसिव्ह थेरपी) उपचार करावा लागतो. काही रूग्णामध्ये औषधं देण्यात अनियमितता असेल तर दीर्घकाळ शरीरात राहणारी इंजेक्शन उपलब्ध आहेत. औषधोपचाराबरोबर रूग्ण आणि रूग्णाचे नातेवाईक यांचं समुपदेशन महत्त्वाचं असतं काही रूग्णांच्या बाबतीत पुनर्वसनाच्या सोयींचा (रिहॅबिलिटेशन) वापर करावा लागतो ज्यामुळे दैनंदिन आयुष्याला शिस्त लावणं, कामाकरीता प्रोत्साहित करणं, स्वावलंबी बनवणं ज्यामुळे रूग्ण पुन्हा समाजात मिसळण्यासाठी तयार होऊ शकतो. नातेवाईक किंवा रूग्णाचा सांभाळ करणारे यांचे सहकार्य - नियमित औषधोपचारात रूग्णाला समजून घेण्यात आणि सतत प्रोत्साहित करण्यात आवश्यक असते. म्हणजे उपचार यशस्वी होतात.
उत्तर लिहिले · 5/10/2022
कर्म · 11785
0

लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्तला कोणता मानसिक आजार झालेला आहे हे स्पष्टपणे सांगितले नाही, ज्यात त्याला महात्मा गांधी दिसत होते.

परंतु, चित्रपटात दाखवलेला आजार delusion ( भ्रम ) नावाचा मानसिक आजार असू शकतो.

Delusion (भ्रम): या आजारात, व्यक्तीला अशा गोष्टींवर विश्वास असतो ज्या खऱ्या नसतात.

उदाहरणार्थ, कुणीतरी त्याच्यावर पाळत ठेवत आहे किंवा तो खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे.

असा आजार होऊ शकतो का?

होय, delusion (भ्रम) नावाचा मानसिक आजार होऊ शकतो.

हा आजार स्किझोफ्रेनिया (schizophrenia), स्किझोफेक्टिव्ह डिसऑर्डर (schizoaffective disorder), डिप्रेशन (depression) किंवा बायपोलर डिसऑर्डर (bipolar disorder) सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांशी संबंधित असू शकतो.

Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीपर आहे. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

श्रवण प्रक्रक्रयेतील अडथळे थोडक्यात क्रलहा.?
बायकोच्या मुस्लिम मैत्रिणीला गेल्या पंधरा वर्षांपासून मूल होत नाही, तर मी काय मदत करू शकतो आणि ती कशी?
दाताचे डॉक्टर कोणता आरसा वापरतात?
श्रवण प्रक्रियेतील अडथळे थोडक्यात लिहा?
असेपसिस म्हणजे काय?
शरीराचे पोस्टमार्टम म्हणजे काय, ते का बरं करतात?
डॉक्टर बनण्यासाठी काय करायला हवे?