ब्रिटिश भारत इतिहास

1905 मध्ये बंगालची फाळणी कोणी केली?

2 उत्तरे
2 answers

1905 मध्ये बंगालची फाळणी कोणी केली?

0
बंगालची फाळणी (१९०५)

बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा १९ जुलै १९०५ रोजी भारताने तत्कालीन वाइसराय लॉर्ड कर्झन द्वारा केली गेली होती. फाळणीला १६ ऑक्टोबर १९०५ पासून सुरुवात झाली. १९११ मध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय जनतेच्या दबावामुळे बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग पुन्हा एक झाले.


पूर्व बंगाल व आसामचा एकत्रित नकाशा



उत्पत्ति

बंगाल प्रांताचे क्षेत्रफळ ४८९५०० वर्ग किलोमीटर आणि लोकसंख्या ८ कोटी अधिक होती. पूर्व बंगाल भौगोलिक रूपाने आणि कमी संप्रेषण साधने असल्यामुळे तो पश्चिम बंगाल पासून वेगळा होता. १८३६ मध्ये,अप्पर प्रांतांमध्ये एका लेफ्टनंट गव्हर्नरचे शासन स्थापित केले होते ते १८५४ मध्ये गव्हर्नर जनरल-इन-कौन्सिलने रद्द केले. या फाळणीमागे इंग्रजांची "फोडा आणि राज्य करा" ही दुष्ट निती होती.



बंगालची फाळणी (१९०५) बद्दल महत्त्वाचे मुद्धे

  1. लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या हेतूने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
  2. बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
  3. बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.
  4. आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली. टिळकांनी यालाच चतुःसूत्री असे नाव दिले.
  5. सन १९०५ ते १९२० नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.
  6. बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंग-भंग आंदोलन असे म्हणतात.
  7. 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंग्जने भरविलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली.
उत्तर लिहिले · 28/2/2023
कर्म · 9435
0

1905 मध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन (Lord Curzon) यांनी केली. ते त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय (Viceroy) होते. त्यांनी प्रशासकीय कारणांसाठी बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला, परंतु या निर्णयामुळे भारतीय राष्ट्रवाद्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला, ज्यामुळे स्वदेशी चळवळीला चालना मिळाली.

अधिक माहितीसाठी: विकिपीडिया - बंगालची फाळणी (इंग्रजी)

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2480

Related Questions

कोणत्या कायद्यान्वये बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला?
बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली?
विल्यम बेंटिक कोणत्या वर्षी गव्हर्नर जनरल बनले?
लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे का ठरवले?
कंपनीच्या राजवटीतील प्रमुख दोन प्रांत कोणते?
ऑगस्ट घोषणा कधी करण्यात आली?
ड्युरँड रेषा कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत निश्चित करण्यात आली?