सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थशास्त्र

सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

2 उत्तरे
2 answers

सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

2
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये I features of micro Economics...-


१ ] वैयक्तिक घटकांचा अभ्यास : [ The study of individual factors ]
             सूक्ष्म अर्थशास्त्रात्रात विशिष्ट उदयोग संस्था , कुटुंब संस्था , वैयक्तीक किंमती या सारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा वर्तनाचा अभ्यास केला जातो . 

२ ] किंमत सिध्दांत : [ Price theory ] 
                 सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिध्दांत किंवा मूल्य सिध्दांत असे म्हणतात कारण या मध्ये वस्तू व सेवांची किंमत तसेच उत्पादन घटकांच्या किंमत कशा ठरतात याचा अभ्यास केला जातो .
 
३ ] आंशिक समतोल: [ Partial equilibrium ] 
                    सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय . आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता , एका उत्पादन संस्था , विशिष्ट उद्योग इ . वैयक्तीक आर्थिक घकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते आंशिक समतोलात वैयक्तीक घटकांला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा अभ्यास स्वतंत्रपणे केला जातो .

४ ] विशिष्ट गृहितकांवर आधारित : [Based on specific assumptions]
                            सूक्ष्म अर्थशास्त्राचे विवेचन "इतर परिस्थिती कायम " या मूलभूत गृहितांचा आधार घेवून सुरुवात केली जाते . हे अर्थशास्त्र पूर्ण रोजगार , शुद्ध भांडवलशाही , पूर्ण स्पर्धा , सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इ. गृहितकांवर आधारित आहे 

५ ] विभाजन पध्दत : [ Partition Method ]
                 सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो . म्हणजेच या अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो . उदा . राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्न , समग्र मागणीतील वैयक्तिक मागणी इ . चा अभ्यास केला जातो .

६ ] सीमांत तत्वाचा वापर : [ Use of marginal principle ] 
                     सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे . सीमांत परिणाम म्हणजे एक वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल होय . सीमांत तत्वाचा वापर , सूक्ष्म बदलांचा परिणाम , उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेतांना केला जातो.
 
७ ] बाजार रचनेचे विश्लेषन : [ Analysis of market structure ] 
                           सूक्ष्म अर्थशास्त्रात पुर्ण स्पर्धा मक्तेदारी युक्त स्पर्धा , मक्तेदारी , अल्पाधिकार , बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषन करते .

८ ] मर्यादित व्याप्ती : [ Limited scope ] 
                           सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपूरती मर्यादित आहे . उदा . वैयाक्तीक वेतन , वैयाक्तीक किंमत , वैयाक्तीक मागणी , व वैयाक्तीक पुरवठा इ .
                     अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल . 



धन्यवाद...!!
उत्तर लिहिले · 17/9/2022
कर्म · 19610
0

सूक्ष्म अर्थशास्त्राची (Microeconomics) वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

  1. वैयक्तिक घटकांचा अभ्यास: सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक ग्राहक, उत्पादन संस्था आणि बाजारपेठा यांसारख्या लहान घटकांचा अभ्यास करते.
  2. किंमत सिद्धांत: हे मागणी आणि पुरवठा यांच्या आधारे वस्तू व सेवांची किंमत निश्चित करते.
  3. विशिष्ट गृहितके: सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण सुलभ करण्यासाठी काही गृहितके वापरते, जसे की पूर्ण स्पर्धा आणि स्थिर उत्पन्न.
  4. सीमित दृष्टिकोन: हे फक्त वैयक्तिक घटकांवर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे व्यापक आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष होते.
  5. उपयोगी: व्यवसाय निर्णय, किंमत धोरण आणि संसाधन वाटप यासाठी उपयुक्त.

सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला विशिष्ट बाजारपेठ आणि उद्योगांचे विश्लेषण करण्यास मदत करते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1020

Related Questions

आर्थिक चलचे सूक्ष्म परिणाम?
सरासरी प्राप्ती व सीमांत प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा?
आंशिक समतोल आणि समग्र समतोल मध्ये काय फरक आहे?
सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा?
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती?
ECO218: अंशालक्षी अर्थशास्त्र?
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती?